MB NEWS:मानवता धर्माचे उद्घारक महात्मा बसवेश्वर

 मानवता धर्माचे उद्घारक महात्मा बसवेश्वर


महात्मा बसवेश्वर हे बाराव्या शतकात एक महान मानवतावादी , समतावादी संदेश देणारे एक संत होऊन गेले ,पण त्यांचे समग्र साहित्य,संदेश प्रामुख्याने कन्नड भाषेत असल्याने व त्यांची शिकवण विशेषकरून कर्नाटकातील संप्रदायांमध्येच प्रसारित झाल्याने एवढ्या मोठ्या महात्म्याचे देशभर, तसेच जगात म्हणावे तसे योग्य मूल्यमापन झालेले नाही.

म. बसवेश्वरांचे आयुष्य केवळ 35 वर्षांचे होते. एवढ्या कमी काळात ज्ञानसाधना करून विषमता, कर्मकांड ,अंधश्रद्धेच्या विरोधी आणि समानतेचा आवाज बुलंद करीत विविध जाती धर्मातील लाखो स्त्री, पुरुष, पददलितांना, शोषितांना मुख्य धारेत आणणे ही त्या काळातील महान क्रांतीच होती. 

बसवेश्वरांनी स्त्रियांना त्याकाळी बरोबरीने अधिकार  प्रदान केले होते .महिलांना प्रतिनिधित्व  मिळाल्यानेच त्यांच्या धर्म कार्याला सामर्थ्य प्राप्त झाले . त्यांनी त्याकाळी बालविवाहाला विरोध केला ,पण विधवा विवाहाला मान्यता दिली .एवढेच नव्हे तर ,त्यांनी आठशे वर्षांपूर्वीच आंतरजातीय  विवाहाचा श्री गणेशा अनुभव मंडपातून केला. याला विशेष महत्त्व प्राप्त होऊन त्यामुळे रक्त क्रांती ही झाली होती. त्यावेळी शिवशरण स्त्रिया देखील समाजकार्यात अग्रेसर होत्या .त्यांच्या पत्नी राणी गंगाबिकादेवी  यांनी तर बहुजन स्त्रियांसाठी उद्योग केंद्रे व साक्षरता केंद्रे सुरू केली होती. बसवेश्वरांच्या धर्मकार्यात अनेक स्त्रियांचे मोलाचे योगदान आहे. बसवेश्वरांनी त्यावेळच्या समाजाचे निरीक्षण केले .अंधश्रद्धा त्यांना जाणवली त्यावर त्यांनी कडक प्रहार केले अज्ञानी लोकांच्या स्थितीचे वर्णन करताना ते म्हणतात की ,अज्ञानी लोक बकऱ्याला बळी  देतात. तो बकरा बळी जाण्यापूर्वी सजावटीच्या तोरणाचे पान खाण्यात मग्न असतो .नंतर थोड्याच वेळात त्याच्या त्याचा बळी जातो. तद्वतच पामर व अज्ञानी जिवांचा बळी घेणारे लोक तरी वाचतील काय?  देवी देवता त्यांना वाचवतील काय ? लोक दगडी नागाला दूध पाजतात: पण नाग जिवंत दिसला की त्याला हातात काठी घेऊन ठार मारतात. भुकेल्या व्यक्तीस हाकलून देतात व दगडाला नैवेद्य दाखवितात ही मूर्खता होय.

अस्पृश्य व दलितोद्धाराचा स्वयंपूर्ण सर्वांग सुंदर आणि सर्वश्रेष्ठ असा विचार त्यांनी मोठ्या धाडसाने ८०० वर्षांपूर्वी मांडला .दलित प्रेम हे त्यांच्या जीवनाचे अविभाज्य अंग होते आणि त्याच तत्त्वासाठी त्यांनी प्रधानमंत्री पदाचा त्याग केला, महात्मा ज्योतिबा फुले ,शाहू महाराज ,डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि अनेक संत महात्म्यांचा वारसा लाभलेल्या महाराष्ट्रातच मंगळवेढा येथे बसवेश्वरांच्या कार्याचा पहिला प्रारंभ झाला .त्यांनी बौद्ध ,इस्लाम, जैन इ.अनेक धर्मांचा सखोल अभ्यास केला आणि सतत चिंतनातून हिंदू धर्मातील चातुर्यवर्ण ,भेदाभेद, अस्पृश्यता ,अनेक देवतावाद, स्त्री अत्याचार इत्यादी गोष्टींवर प्रहार केल्याशिवाय मानवता नांदू शकणार नाही ,माणूस माणसाच्या जवळ येऊ शकणार नाही ,तो सुखी समृद्ध होऊ शकणार नाही, असे त्यांना वाटू लागले म्हणून त्यांनी त्या दिशेने आपल्या जीवनाची वाटचाल प्रत्यक्ष आचरणातून केली. महात्मा बसवेश्वराचा जन्म इसवी सन ११३२ मध्ये कर्नाटकात विजापूर जिल्ह्यातील बसवंत बागेवाडी येथे वै.शु.अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर नंदीव्रत धारी माता मादलांबिका व पिता मादरस यांच्या पोटी झाला शैव कुळात झाला.

महात्मा बसवेश्वर हे भारतीय विभूती पुरुषांच्या मालिकेत तेजाने चमकणारा तारा आहे ,श्रेष्ठ समाज विज्ञान, अर्थशास्त्रज्ञ आणि धार्मिक नेता असलेले श्री. महात्मा बसवेश्वर हे विचारवादाला माणुसकीची पूर्ण दृष्टी दिलेले महापुरुष आहेत. माणसाची योग्यता ही त्याच्या जातीवरून नसून गुणवत्तेवर आहे. हा क्रांतिकारी विचार बाराव्या शतकात सांगून जातीची निरर्थकता त्यांनी पटवून दिली. समाज आणि धर्माबद्दल मधील दुरावा नष्ट करून त्यामध्ये समानता घडवून आणली, विचार आणि आचार या दोन्हींना एक करून सर्व जीवांच्या उद्धारासाठी प्रयत्न केलेल्या महात्मा बसवेश्वराने युगप्रवर्तक शक्ती होऊन वीरशैव लिंगायत धर्माचा आणि मानवता धर्माचा उद्धार केला ."तुम्हाला काही होता येईल, पण महात्मा बसवेश्वर होता येणार नाही "हे त्या काळातील शिवशरणांचे मत महात्मा बसवेश्वराचे मोठेपणा दाखवून देते. महात्मा बसवेश्वरांच्या तत्त्वानुसार दया हेच वीरशैव लिंगायत धर्माचे मूळ तत्व आहे. शास्त्र हे धर्माचे हत्यार नव्हे, धर्मयुद्धाला केव्हाही अवकाश देत नाही .सर्व धर्मातील चांगल्या चांगल्या विचारप्रवाहांचा संगम महात्मा बसवेश्वरांच्या विचारात झाल्याने ते विचार विश्वधर्मांचे रूप धारण करता किंवा धर्म समन्वयाची भावना जोपासण्यासाठी त्यांनी आपल्या तत्त्वांना दिलेला आकार त्यांच्या विश्वप्रज्ञेची साक्ष आहे.

समग्र क्रांतीच्या कल्पनेला जगामध्ये पहिल्यांदा आकार दिलेला आणि आपल्या क्रांतीला आपणच तोंड देऊन त्यामध्ये लीन झालेल्या महात्मा बसवेश्वर हा पहिला महापुरुष आहे .एक जात, एक देव ,समानता, बंधुत्व आणि व्यक्ती स्वातंत्र्य हे सर्व त्यांच्या समग्र क्रांतीची पायाभूत तत्वे आहेत. सामाजिक ,धार्मिक क्रांतीमुळे हे सर्व साध्य होते, म्हणून त्यांनी अस्पृश्यता आणि जातीयता निर्मूलनासाठी एकदेव उपासनेला महत्त्व दिले. समाज आणि देशाच्या ऐक्यासाठी इष्टलिंग उपासनेला महत्त्व दिले.

दारिद्र्याचे निर्मूलन आणि उत्पन्नाचे समान वाटप करून माणुसकीची वैज्ञानिक पद्धत अं मलात आणली सर्वोदयाला योग्य असे वातावरण निर्माण केले. महात्मा बसवेश्वरांनी सांगितलेल्या मार्गाचे अनुकरण केले तर जगामध्ये शांती, दया ,सुख आणि बंधुत्व नांदू शकेल .साहित्याने सामाजिक क्रांती होऊ शकते हे महात्मा बसवेश्वरांनी दाखवून दिले. समाजमनाची नांगरणी करून सद़विचाराचे  बीज पेरण्याचे कार्य महात्मा बसवेश्वरांनी केले. महात्मा बसवेश्वरांच्या जीवन चरित्राची ,आदर्शाची ,शाश्वत चिरंतन मूल्यांची व शिकवणुकीची  संपूर्ण समाजाला व देशाला आज नितांत गरज आहे ,अशा महान क्रांतिकारक बसवेश्वर जयंती निमित्त विनम्र अभिवादन.


प्रा.सौ. स्वाती संतोष सरडे (खके)जामखेड

---------------------------------


Click:● *खळबळजनक: अतिकचे लावले पोस्टर:शहीदाचा दिला दर्जा;धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न*

Video 




Advertise 




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !