MB NEWS:उद्या सकाळी ७ वाजता पृथ्वीवर संकट कोसळणार; शास्त्रज्ञांना टेन्शन

 उद्या सकाळी ७ वाजता पृथ्वीवर संकट कोसळणार; शास्त्रज्ञांना टेन्शन

मुंबई: पृथ्वीवर एक संकट कोसळणार आहे. उद्या १९ एप्रिलला सकाळी ७ वाजता एक निरुपयोगी उपग्रह अवकाशातून पृथ्वीवर कोसळणार आहे. NASA ने हा उपग्रह २१ वर्षांपूर्वी फेब्रुवारी २००२ मध्ये सोडला होता. त्याचे नाव RHESSI स्पेसक्राफ्ट आहे. शास्त्रज्ञ त्याच्या पडण्याची अचूक वेळ आणि मार्ग शोधू शकले नाही, ही चिंतेची बाब आहे. हा उपग्रह सकाळी सात वाजल्यानंतर कधीही पृथ्वीवर पडू शकतो.जर हा उपग्रह समुद्रात पडला तर काही हरकत नाही.


Click:*राज्यात खळबळजनक घडामोडी: 'अशक्यही शक्य करतील स्वामी' पंकजा मुंडेंच्या ट्विटची चर्चा*


 मात्र, जर हा उपग्रह निवासी भागात पडल तर मोठा अनर्थ घडू शकतो. या उपग्रहाचे वजन २७३ किलो आहे, या उपग्रहाचा बहुतेक भाग हा तो कोसळताना जळेल असा अंदाज शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे. फक्त एखादा लहान भाग पडू शकतो. रेसी स्पेसक्राफ्टचे पूर्ण नाव Reuven Ramaty High Energy Solar Spectroscopic Imager आहे. हा काही फार मोठा उपग्रह नाही. पण अंतराळातून येणारी छोटी वस्तूही मोठी हानी पोहोचवू शकते. कारण, या उपग्रहाचा काही भाग वातावरणातून निसटून पृथ्वीवर पडेल असा नासाचा अंदाज आहे. परंतु एखाद्याला हानी पोहोचवण्याची शक्यता २४६७ मध्ये १ आहे.RHESSI उपग्रह कोसळण्याच्या या घटनेवरून असे दिसून येते की पृथ्वीवर नेहमीच अवकाशात तरंगणाऱ्या उपग्रह कोसळण्याच्या घटना घडत राहातील. अवकाशात अधिक उपग्रह असल्याने त्यांच्यातील धडकही वाढणार आहे. अशा परिस्थितीत पृथ्वीवर अवकाशातील कचरा कोसळण्याचा धोका वाढणार आहे. 


 click:● *मोठा अनर्थ टळला: बुट्टेनाथ घाटात बस पलटी;25 प्रवाशी जखमी*


सध्या ३० हजारांहून अधिक कचरा पृथ्वीभोवती फिरत आहे. काहींचा आकार तर इतका लहान आहे की त्यावर लक्ष्य ठेवणंही कठीण आहे.युरोपियन स्पेस एजन्सीच्या म्हणण्यानुसार, ०.४ ते ४ इंचापर्यंतच्या दहा लाख वस्तू अवकाशात पृथ्वीभोवती फिरत आहेत. पण ०.४ इंचीचा कचरा १.३० कोटी किंवा त्याहून अधिक असू शकतो. हे छोटे तुकडे आपल्या उपग्रहांचा स्फोट करू शकतात. त्यांचा नाश करू शकतात. यामुळे स्पेस स्टेशनचे नुकसान होऊ शकते. सूर्याच्या ज्वाळांचा अभ्यास करण्यासाठी हा उपग्रह पाठवण्यात आला होताRHESSI उपग्रह फेब्रुवारी २००२ मध्ये पेगासस XL रॉकेटने प्रक्षेपित करण्यात आला होता. सूर्यापासून निघणाऱ्या सौर लहरी आणि कोरोनल मास इजेक्शन यांचा अभ्यास करणे हा यामागचा उद्देश होता. त्यात फक्त एक इमेजिंग स्पेक्ट्रोमीटर होतं, जो एकाच वेळी क्ष-किरण आणि गॅमा किरणांची मोजणी करतो. त्याच्या संपूर्ण मोहिमेदरम्यान, रेसी स्पेसक्राफ्टने १ लाख क्ष-किरण इव्हेंट्सना कव्हर केलं. त्यामुळे नासाच्या वैज्ञानिकांनी सूर्याविषयी बरीच माहिती गोळा केली.

Click:● *खळबळजनक: अतिकचे लावले पोस्टर:शहीदाचा दिला दर्जा;धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न*

Video 




Advertise 





टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार