विद्यार्थ्यांनी साकारल्या महापुरुषांच्या वेषभूषा

 मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या अमृत महोत्सवा निमित्त' अरविंद फुलारी यांच्या व्याख्यानातून उलगडला इतिहास 




विद्यार्थ्यांनी साकारल्या महापुरुषांच्या वेषभूषा

                           

परळी वै.(प्रतिनिधी):


मराठवाडा मुक्ति दिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षा निमित्त आज मिलिंद माध्यमिक व ज्युनियर कॉलेज येथे सुप्रसिद्ध लेखक,कवी तसेच १९६५ च्या भारत पाकिस्तान युद्धात सक्रिय सहभाग घेतलेले सैनिक श्री.अरविंद गणपतराव फुलारी सर यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.  


कार्यक्रमाची सुरुवात मराठवाडा मुक्तिसंग्रातील स्वातंत्र्य सैनिकांच्या प्रतिमेस व देशाच्या पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून झाली.


आजच्या या अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिन वर्षा निमित्त शाळेतील विद्यार्थ्यांनी महापुरुषांच्या वेशभुषा परिधान करत कार्यक्रमात वेगळीच रंगत आणली. 


कार्यक्रमाचे प्रास्ताविक व मुख्य व्याख्याते यांचा परीचय पर्यवेक्षक श्री.धायगुडे सर यांनी विद्यार्थ्यांस करून दिला. कार्यक्रमाचे मुख्य वक्ते श्री.फुलारी सर विद्यार्थ्यांस मार्गदर्शन करताना सांगीतले की, '१९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला ; त्यावेळी संपूर्ण देश विविध संस्थानांमध्ये विखुरलेला होता. त्यावेळच्या ५६५ पैकी ५६२ संस्थांनांनी स्वतंत्र भारतात सामाविष्ट होण्याची संमती दर्शविली आणि तशी कार्यवाही देखील केली. मात्र *जुनागड,जम्मू आणि काश्मीर व हैदराबाद* संस्थान ही ३ संस्थाने स्वतंत्र भारतात सामाविष्ट झाली नव्हती. १९४८ पुर्वी जम्मू- काश्मीर संस्थानचा राजा हरिसिंग हा होता. जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देत भारतात सामिल केले गेले. जम्मू-काश्मीरचे सामाजिक व राजकीय दृष्टीने तीन भाग पडत ज्यात जम्मू , काश्मीर, व लडाख.जम्मू विभागात हिंदू व शीख अशी मिश्र लोकसंख्या, काश्मिरी खोऱ्यात मुस्लिम बहुल लोकसंख्या होती तर लडाखमध्ये प्रामुख्याने बौद्ध बहुल लोकसंख्या होती.

गुजरात मधील जुनागड संस्थान हे हिंदुस्थानातील पश्चिमेला सौराष्ट्राचा समुद्र किनारा व इतर बाजूंना भारतीय भू असलेले संस्थान होते. तसेच ते पाकिस्तानशी भौगोलिक सलगता नसणारे संस्थान होते. या संस्थानाच्या  राजाने पाकिस्तानमध्ये विलीन होण्याची तयारी केली होती. महाबतखान हा या संस्थानचा राजा होता. जुनागडचे क्षेत्रफळ ३०,३३७ चौ. मैल. होते, तर लोकसंख्या सहा लाख सत्त्तर हजार सातशे एकोणीस (६,७०,७१९) एवढी होती. त्यापैकी ८० टक्के हिंदू तर २० टक्के प्रजा मुसलमान होती. १५ ऑगस्ट १९४७ रोजी नबाब महाबतखान याने जुनागड संस्थान पाकिस्तानमध्ये सामील होत असल्याचे जाहीर केले. व बॅरिस्टर जीनांशी त्याने गुप्तपणे पत्रव्यवहार केला. पाकिस्तान सरकारने १३ सप्टेंबर १९४७ जुनागड संस्थान पाकिस्तानात विलीन होत असल्याचे भारत सरकारला कळविले. काही राजकीय घडामोडींनंतर तत्कालीन सरकारने जुनागडशी जैसे थे (स्‍टॅड स्टिल) करार झाल्याचे जाहीर केले.                         

३ रे संस्थान म्हणजे हैदराबाद.

हैदराबाद संस्थानावर तब्बल सहा पिढ्यांपासून निझाम वंशाचे राज्य होते. निजामाच्या राज्यातून मुक्त होऊन भारतीय संघराज्यात सामाविष्ट होण्यासाठी *स्वामी रामानंद तीर्थ* यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण हैदराबाद संस्थानात मुक्ती संग्राम चालू झाला.


हैदराबाद संस्थानची त्यावेळची लोकसंख्या १ कोटी ६० लाख होती. यात आंध्रप्रदेश, मराठवाडा आणि कर्नाटकचा काही भाग येत होता. मराठवाडा मुक्ती संग्राम सुरू झाल्यावर निजामाचा सेनापती कासीम रझवीच्या विरूद्ध मराठवाडयाच्या गावागावात हा संग्राम लढला गेला. या लढ्यातील सर्व हुतात्म्यांचे आणि मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्य सैनिकांनी केलेल्या संग्रामाचे मोल करणे शक्य नाही. 


भारताचे तात्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी चिघळलेली परिस्थिती पाहता निझाम शासनाच्या रजाकार सैन्याच्या विरोधात पोलीस कार्यवाही केली. तसेच भारतीय सैन्यापुढे रझाकारांचे सैन्य फार वेळ टिकू शकले नाहीत. शेवटी निजामीशाही सैन्यास माघार घ्यावे लागले आणि सेनाप्रमुख कासीम रझवीला अटक झाली. १७ सप्टेंबर १९४८ रोजी हैदराबादचे सैन्यप्रमुख जनरल इद्गीस यांनी शरणांगती स्वीकारली; आणि निझामाचा पराभव झाला. हैदराबाद संस्थान भारतात विलीन झाले.', अशी मौल्यवान माहिती जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक श्री. फुलारी सर यांनी आपल्या व्याख्यानातून विद्यार्थ्यांस दिली. 


मुख्यव्याख्याते श्री.फुलारी सरांनंतर अध्यक्षीय समारोप मुख्याध्यापक श्री.कदरकर सर यांनी केले.  कार्यक्रमाच्या संचालनाची धुरा जेष्ठ सहशिक्षिका सौ.सुनिता कोम्मावार मॅडम यांनी सांभाळली व आभार प्रदर्शन मिलिंद ज्युनियर कॉलेजचे भौतिकशास्त्र विषयाचे  प्राध्यापक श्री.डोंगरे सुजीत सर यांनी केले.

---------------------------------------------------

Click:■ खळबळजनक:लग्न केल्याचे भासवून २१ वर्षिय तरुणीवर १५ दिवस शारिरीक अत्याचार : गुन्हा दाखल


Click:■ *तळेगाव-पांगरी दरम्यान आपघात: एक जण जागीच ठार*


Click: ■ *बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना धनंजय मुंडेंची 7 कोटी 17 लाखांची अशीही मदत...


Click:● *अमित शहा यांचा उद्याचा छत्रपती संभाजीनगर दौरा रद्द* https://majhibatmi.blogspot.com/2023/09/blog-post_58.html

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !