MB NEWS:परळी आगारातून आजपासून विविध ठिकाणी प्रवाशांसाठी बस सेवा सुरू*

 

*परळी आगारातून आजपासून विविध ठिकाणी प्रवाशांसाठी बस सेवा सुरू*

 परळी वैजनाथ/ प्रतिनिधी

        राज्य शासनाने आंतरजिल्हा बस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर परळी आगारातून नाही आज 22 पासून विविध ठिकाणी जाण्यासाठी बस सेवा सुरू करणार असल्याचे परळी आगाराचे आगारप्रमुख आर बी राजपूत यांनी सांगितले आहे.     

            याबाबतचे परळी बस स्थानकातून सुटणाऱ्या गाड्यांचे वेळापत्रक ही त्यांनी जाहीर केले असून यामध्ये बीड अंबाजोगाई सोनपेठ लातूर नागपूर औरंगाबाद भुसावळ याठिकाणी बसेस उपलब्ध असणार आहेत. नागपूर व भुसावळ सकाळी साडेसहा वाजता बस सुटेल औरंगाबाद ची बस सकाळी साडेपाच वाजता सुटेल लातूर साठी सकाळी आठ वाजल्यापासून दुपारी दोन वाजेपर्यंत दर दोन तासाला परळी बस स्थानकातून बस सुटणार आहे तसेच सोनपेठ साठी सकाळी नऊ वाजल्यापासून दर दोन तासाला पाच वाजेपर्यंत बसवण्यात येतील. बीड साठी सकाळी सात वाजल्यापासून दुपारी दोन वाजेपर्यंत दर दोन तासांनी बस सुटेल. अंबाजोगाई साठी सकाळी सात ते सायंकाळी पाच या दरम्यान दर दोन तासांनी बस सोडण्यात येईल. कमीत कमी वीस प्रवाशी असल्याशिवाय बस सोडण्यात येणार नाही दिनांक 22 पासून नियमितपणे परळी आगारातून बस सेवा सुरू करण्यात आली असून प्रवाशांनी सहकार्य करावे असे आवाहन परळी आगाराच्या वतीने करण्यात आले आहे.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !