पोस्ट्स

नोव्हेंबर ९, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

अन्यथा करावी लागणार तुरुंगवारी...

इमेज
  बीड जिल्ह्यात निवडणूक निकालानंतर मिरवणुकांवर बंदी - पोलीस अधीक्षकांनी दिले सक्त निर्देश बीड : पोलीस अधीक्षक नवनीत कावत, बीड जिल्हा यांच्याकडून सर्व नगरपरिषद उमेदवारांना तसेच त्यांच्या समर्थकांना सक्त निर्देशित करण्यात आले आहे.बीड जिल्ह्यात निकालानंतर मिरवणुकांवर बंदी असुन कायद्याच्या विरोधात जाईल असे कोणतेही कृत्य करण्याचे टाळावे असे पोलीस अधीक्षकांनी  सक्त निर्देश दिले आहेत.        आज होणाऱ्या मतमोजणीच्या निकालानंतर कोणत्याही प्रकारची मिरवणूक, रॅली, विजयी जल्लोष, घोषणा, फटाके फोडणे किंवा जमाव जमविण्यास पोलीस प्रशासनातर्फे कोणतीही परवानगी देण्यात येणार नाही.तसेच  जिल्हाधिकारी, बीड यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 चे कलम 37(1)(3) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश निर्गमित केले असून, सदर आदेश दि. 19/12/2025 रोजी रात्री 00.01 वा. पासून ते दि. 02/01/2026 रोजी रात्री 24.00 वा. पर्यंत लागू राहतील. विनापरवाना मिरवणूक काढणे, जमाव करणे, रस्ते अडविणे किंवा सार्वजनिक शांतता भंग होईल असा कोणताही प्रकार पूर्णतः प्रतिबंधित आहे.         आदेशाचे उल...

नगर परिषद निवडणुक....

इमेज
  नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकांसाठी ऑफलाईनसुद्धा नामनिर्देशनपत्र भरण्याची सवलत मुंबई, दि. १४ (रानिआ): नगरपरिषदा व नगरपंचायतीच्या निवडणुकांसाठी इच्छुक उमेदवारांना ऑनलाईनबरोबरच ऑफलाईन पद्धतीनेसुद्धा नामनिर्देशनपत्र सादर करण्याची सवलत देण्यात आली आहे. त्याचबरोबर सुट्टीच्या दिवशी शनिवारी (ता. १५) आणि रविवारी (ता. १६) देखौल नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्याचे आदेश सर्व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत. राज्यातील २४६ नगरपरिषदा व ४२ नगरपंचायतींच्या सदस्यपदासाठी आणि थेट अध्यक्षपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता राज्य निवडणूक आयोगाने ऑनलाईन पद्धतीने नामनिर्देशपत्र भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे; परंतु विविध राजकीय पक्ष आणि इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने नामनिर्देशनपत्रे सादर करण्याची सवलत देण्यात यावी, अशी मागणी केली होती. त्याबाबत क्षेत्रीय स्तरावर आढावा घेऊन ऑफलाईन पद्धतीनेसुद्धा नामनिर्देशनपत्र भरण्याची सवलत देण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घेतला आहे. नामनिर्देशनपत्रे शनिवारी (ता. १५) आणि रविवारी (ता. १६) या दोन्ही सुट्टीच्या दिवशीसही सकाळी ११ ते दुप...

नगर परिषद निवडणुक

इमेज
वार्ड क्र. 11 मधून यशपाल वाघमारे यांच्या नावाची जोरदार चर्चा परळी / प्रतिनिधी : परळी नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीची तयारी आता जोर धरू लागली असून विविध प्रभागांत इच्छुकांच्या नावांवर चर्चा रंगत आहे. वार्ड क्र. 11 मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा कार्यकर्ते यशपाल वाघमारे यांच्या उमेदवारीची जोरदार चर्चा सध्या शहरात सुरू आहे. यशपाल वाघमारे हे गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवा संघटनेत सक्रिय असून सामाजिक, शैक्षणिक व जनसंपर्क क्षेत्रात त्यांनी भरीव कामगिरी केली आहे. स्थानिक पातळीवर युवकांमध्ये त्यांचा चांगला संपर्क आणि जनआधार असल्याने त्यांना उमेदवारी मिळावी, अशी मागणी वार्डातील नागरिक व कार्यकर्त्यांकडून होत आहे. वार्डातील स्थानिक समस्यांवर त्यांनी नेहमीच पुढाकार घेतला असून नागरिकांशी सलोख्याचे संबंध टिकवले आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीत वार्ड क्र. 11 मधून यशपाल वाघमारे हे एक बलाढ्य दावेदार ठरतील, असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

निवडणूक आयुक्तांनी काढले पत्र...

इमेज
  नगर परिषद निवडणुक : सुट्टी नाही; रविवारीही स्वीकारणार उमेदवारी अर्ज  राज्यातील नगर परिषद  निवडणूक कार्यक्रम सुरु झाला आहे. या निवडणुकांमध्ये कमी कालावधीअभावी उमेदवारांची गैरसोय होऊ नये, म्हणून सुटीच्या दिवशीही उमेदवारी अर्ज स्वीकारण्याची सोय निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिली आहे.      राज्यातील २४६ नगरपरिषदा व ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम दि.४/११/२०२५ रोजी प्रसिध्द करण्यात आलेला होता. या निवडणूक कार्यक्रमानुसार नामनिर्देशन पन्ने संगणकप्रणालीद्वारे ऑनलाईन पध्दतीने स्विकारण्यात येत आहेत. परंतु या संगणक प्रणालीद्वारे स्विकारण्यात येणाऱ्या नामनिर्देशन पत्रामध्ये अडचणी येत असल्याचे निदर्शनास आले आहे. नामनिर्देशन पत्रे सादर करण्याकरिता शेवटचे दोन दिवस शिल्लक राहीले आहेत. अशा परिस्थितीत संगणकप्रणालीवर भार येण्याची शक्यता लक्षात घेता आणि उमेदवारांना समान संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीकोनातून राज्य निवडणूक आयोगाने महत्त्वपूर्ण  निर्देश देत आहेत         दि.१५/११/२०२५ ते दि. १७/११/२०२५ या कालावधीमध्ये (तीनही दिवस), (रविवार द...

आजपर्यंत एकूण दाखल अर्जांची संख्या : एकूण 38 नामनिर्देशन पत्रे दाखल

इमेज
परळी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुक : आज एकूण 27 नामनिर्देशनपत्र आले- नगराध्यक्ष पदाकरिता 3 तर  सदस्य पदाकरिता 24 अर्ज दाखल परळी वैजनाथ, प्रतिनिधी...         परळी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज एकूण 27 नामनिर्देशनपत्र दाखल झाले आहेत. नगराध्यक्ष पदाकरिता 3 तर सदस्य पदाकरिता 24 अर्ज दाखल झाले आहेत. नगराध्यक्ष पदाकरिता 3 अर्ज दाखल झाले असुन यामध्ये शेख कौसरबेगम अश्फाक, महंमद फरजाना सुलेमान, शेख  नूरजहाँ बेगम मैनोद्दीन यांचा समावेश आहे. नगरपरिषद  सदस्य पदाकरिता 24 नामनिर्देशनपत्र दाखल झाले आहेत.प्रभाग क्रमांक 2-  तीन नामनिर्देशनपत्र  दाखल सर्वसाधारण  प्रवर्गातून कुरेशी वहाब हमीद , शेख जुबेर लालामिया (यांचे कडून 2 नामनिर्देशनपत्र) , प्रभाग क्रमांक 3-  पाच नामनिर्देशनपत्र दाखल शेख  खैरुनिसा बेगम युसूफ, तांबोळी अजीम इसाक ,शेख सोहेल मुख्तार,शेख हुसेनाबी अमीन,शेख आयेशा मोसीन प्रभाग क्रमांक 6- दोन नामनिर्देशनपत्र दाखल. सर्वसाधारण प्रवर्गातून आंधळे गोपाळकृष्ण रावसाहेब आणि पद्मराज बलभीम गुट्टे  प्रभाग क्रमांक 7-सर्वसाधारण प्...
इमेज
  राष्ट्रवादीच्या संध्याताई दिपक देशमुख यांचा परळी नगर परिषदेच्या प्रचाराचा धुमधडाका  शहरातील मतदारांच्या गाठीभेटीची पहिली फेरी पूर्ण  परळी वैजनाथ, प्रतिनिधी - राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाच्या नगराध्यक्ष पदाच्या संभाव्य उमेदवार सौ.संध्याताई दिपक नाना देशमुख यांनी परळी नगर परिषदेच्या 2 डिसेंबर रोजी होणाऱ्या निवडणूक प्रचाराचा धुमधडाका सुरू असून सौ.संध्याताई देशमुख यांनी परळी शहरातील सर्व प्रभागातील मतदारांच्या गाठीभेटीची पहिली फेरी पूर्ण केली आहे.      परळीचे माजी नगराध्यक्ष दीपक नाना देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकताच पक्षप्रवेश केला होता. पक्षाच्या वतीने सौ.संध्याताई देशमुख यांनाच उमेदवारी देण्यात येणार आहे.त्यापूर्वीच दिपक देशमुख यांनी परळी शहरात आपला प्रचार सुरू केला होता.पक्ष प्रवेशा नंतर सौ.संध्याताई देशमुख यांनी परळी शहरातील सर्व प्रभागातील मतदारांच्या गाठीभेटी वर भर दिला.त्यांच्या सोबत कैसर शेख, फरजाना शेख,रोजाना शेख, उमा गर्जे,शिवकन्या भोसले,सीता ताई हिंगणे,सावित्री क...
इमेज
  माकप तालुक्यातील जिप चे तीन गट व त्याअंतर्गतच्या सहा गणात उमेदवार देणार-  कॉ गंगाधर पोटभरे  परळी वैजनाथ ता 12 प्रतिनिधी        परळी तालुक्यातील जिल्हा परिषदेचे तीन गट व त्याअंतर्गत येणारे पंचायत समितीच्या सहा गणात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष उमेदवार उभा करणार असल्याची माहिती पक्षाचे तालुका सचिव कॉ गंगाधर पोटभरे यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.        मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची बुधवारी दि 12 रोजी सिरसाळा येथे तालुका कमीटीची बैठक झाली. त्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती च्या संभाव्य निवडणुकीवर चर्चा करण्यात आली. माकप कायम भाजप व त्यांच्या युतीच्या विरोधातील पुरोगामी विचाराच्या पक्षां सोबत निवडणुक आघाडी करीत आला आहे. या निवडणुकीत माकप ची तसीच भुमिका राहणार आहे. मागील काही वर्षात तालुक्यात माकप च्या वतीने शेतकऱ्यांरी, शेतमजुरांच्या प्रश्नांवर लढे आंदोलने केलेले आहेत. 2018 साली पिक विम्याच्या प्रश्नावर केलेल्या आंदोलनामुळे हजारों शेतकऱ्यांना कोट्यावधी रुपये मिळाले. तसेच तालुक्यातील विज, घरकुल, गायरान, रेशन यासह विविध प...
इमेज
  बस स्थानकावर गर्दीचा गैरफायदा घेऊन दागीने चोरी करणाऱ्या आरोपींचा संभाजीनगर, परळी पोलीसांकडून पर्दाफाश, मु‌द्देमालासह आरोपी ताब्यात।.. फिर्यादी नामे प्रतिक विलास वाघमारे रा. अंकुश नगर तालुका जिल्हा बीड यांनी पोलीस स्टेशन संभाजीनगर येथे फिर्याद दिली की, त्याची आई सुनिता विलास वाघमारे दिनांक-04/11/2025 रोजी नांदेडहून बीड येथे जात असताना परळी बस स्टॅन्ड येथे बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेऊन अनोळखी आरोपीने तिचे गळ्यातील 13 ग्रॅम वजनाचे 1,45,000/ रुपयाचे मिनी गंठण चोरून नेले आहे, वगैरे फिर्यादीवरून पो.स्टे. संभाजीनगर गुरनं 230/2025 कलम 303 (2) बीएनएस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून वरीष्ठांनी तपास अधिकारी यांना सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याच्या सुचना दिल्या. त्यावरून तपासीक अंमलदार पोह/416 साजीद पठाण यांनी गुन्हयाचे तपासात बस स्थानक परळी येथील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज पाहून आरोपी निष्पन्न केले. आरोपी ऑटो मधून गेल्याचे दिसून आले. सदर मार्गावरील परळी शहरातील सीसीटीव्ही फुटेज चेक करून त्यांचा मार्ग शोधला असता शहराच्या बाहेर दोन किलोमीटर गेले व ते...
इमेज
  परळी रेल्वे स्थानकावर मानवतेचा सुंदर आदर्श  सामाजिक कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांतून हरवलेली अल्पवयीन मुलगी सुखरूप घरी पोहोचली पुणेहून दिनांक 10 नोव्हेंबर 2025 रोजी रात्री पनवेल–नांदेड एक्सप्रेसने प्रवास करणारी एक अल्पवयीन मुलगी प्रवासादरम्यान एकटीच आढळली. त्या वेळी एका संशयास्पद व्यक्तीने तिला फूस लावण्याचा प्रयत्न केला. हे दृश्य ताईबाई रोहिदास मुंडे या जागरूक महिलेच्या नजरेस पडताच त्यांनी तत्काळ त्या व्यक्तीस हटकले व मुलीला आपल्या जवळ घेत विचारपूस केली. यानंतर त्या मुलीसह त्या परळी वैजनाथ येथे उतरल्या आणि सामाजिक कार्यकर्ते राजन वाघमारे यांच्या सहकार्याने परळी रेल्वे पोलिस ठाण्यात मुलीस सुरक्षित सुपूर्द केले. सदर घटनेची माहिती मिळाल्यानंतर भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष ॲड. अरुण पाठक यांनी मुलीशी संवाद साधून संपूर्ण परिस्थिती जाणून घेतली. चौकशीतून समजले की सदर मुलगी मूळची हुसेनियाबाद, जिल्हा बलिया (उत्तर प्रदेश) येथील असून तिचे नाव उषा सुनील तिवारी आहे. ती आपल्या बहिणीकडे दापोडी (पुणे) येथे राहण्यासाठी आली असता घरातील किरकोळ वादामुळे रागाच्या भरात घर सोडून निघून ...

सर्वस्तरातून अभिनंदन!!!!!!!

इमेज
समाजवादी पक्षाच्या परळी शहर अध्यक्षपदी काजी सिराजोद्दीन यांची नियुक्ती परळी (प्रतिनिधी) : समाजवादी पक्ष बीड जिल्हा शाखेच्या वतीने परळी तालुक्यात पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी नवीन नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. काजी सिराजोद्दीन यांची परळी शहर अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हाध्यक्ष मोहम्मद सुफयान इमाम खान यांनी नुकतेच त्यांना नियुक्तीपत्र प्रदान केले.          पक्षाच्या कार्यात निष्ठा आणि संघटनबांधणीचे कार्य करून समाजवादी विचारधारेचा प्रसार करावा. पक्षाच्या धोरणांचा प्रचार करून लोकांमध्ये जनजागृती करावी असे या नियुक्तीपत्रात म्हटले आहे. काजी सिराजोद्दीन यांनी नियुक्तीनंतर प्रतिक्रिया देताना सांगितले की, पक्षाने आपल्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी  आपण पूर्ण ताकदीने काम करणार आहोत. समाजवादी पक्षाचे विचार घराघरात पोहोचवू असे सांगितले.     अंया प्रसंगी पक्षाचे कार्यकर्ते आणि स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते. परळीतील या नियुक्तीमुळे पक्ष कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंद...
इमेज
  परळी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुक : आज ५ अर्ज आले आजपर्यंत एकूण ११अर्ज दाखल  नगरपरिषद सदस्य पदाकरिता 5 नामनिर्देशन पत्र दाखल. आज नगराध्यक्ष पदा करिता एकही अर्ज दाखल करण्यात आला नाही. प्रभाग क्रमांक 6- सर्वसाधारण प्रवर्गातून लोखंडे दत्ता विष्णू यांचा उमेदवारी अर्ज दाखल प्रभाग क्रमांक 8 - अनुसूचित जाती महिला प्रवर्गातून कांबळे नंदिनी विश्वजीत यांचा उमेदवारी अर्ज दाखल प्रभाग क्रमांक- 8 सर्वसाधारण प्रवर्गातून आचार्य रवि किशन यांचा उमेदवारी अर्ज दाखल प्रभाग क्रमांक 9-सर्वसाधारण महिला प्रवर्गातून  शेख इरशाद रजियोद्दिन  आणि शेख यास्मीन बेगम शमशोद्दीन यांचा उमेदवारी अर्ज दाखल ------------------------------------------------------------------------ आज दिनांक 13 नोव्हेंबर पर्यंत नगरपरिषद सदस्य पदाकरिता 10 अर्ज आणि नगराध्यक्ष पदाकरिता 1 असे एकूण 11 नामनिर्देशनपत्र परळी वैजनाथ नगरपरिषद निवडणूक विभागात दाखल करण्यात आले आहेत. ---------------------------------------------------------------------
इमेज
  परळी नगर परिषद निवडणुक ; पहिल्या दिवशी एकही अर्ज दाखल नाही परळी वैजनाथ (प्रतिनिधी):परळी नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली असून, राज्य निवडणूक आयोगाने 4 नोव्हेंबर 2025 रोजी कार्यक्रम जाहीर केल्यानंतर आचारसंहिता लागू झाली. नगर परिषद क्षेत्रातील 79,569 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत, त्यात 41,023 पुरुष, 38,543 महिला आणि 3 इतर मतदार आहेत. मतदानासाठी 88 केंद्रे निश्चित केली आहेत. नामनिर्देशन दाखल करण्यास 10 नोव्हेंबरपासून सुरुवात झाली असली तरी पहिल्या दिवशी एकही अर्ज दाखल झाला नाही, अशी माहिती निवडणूक विभागाकडून मिळाली. अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 17 नोव्हेंबर, छाननी 18 नोव्हेंबर, अर्ज मागे घेण्याची मुदत 19 ते 21 नोव्हेंबर, चिन्ह वाटप 26 नोव्हेंबर, मतदान 2 डिसेंबर, आणि मतमोजणी 3 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता होईल.                या निवडणुकीत 17 प्रभागांमधून प्रत्येकी दोन सदस्य, तर प्रभाग क्रमांक 10 मधून तीन सदस्य निवडले जातील, म्हणजे एकूण 35 नगरसेवक निवडले जातील. तसेच थेट नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक होणार आहे. नगराध्यक...

करम येथे घडली घटना; १ लाख 59 हजार रु.सोयाबीन चोरी

इमेज
शेतकऱ्याचे घामाचे पीक, चोरट्यांच्या हाती;३७ क्विंटल सोयाबीनवर रातोरात डल्ला! करम येथे घडली घटना; १ लाख 59 हजार रु.सोयाबीन चोरी परळी/सोनपेठ, (प्रतिनिधी):- शेतकऱ्याच्या घामाच्या पाण्याने पिकवलेल्या सोयाबीनवर चोरट्यांनी डल्ला मारत तब्बल ३७ क्विंटल सोयाबीन लंपास केल्याची धक्कादायक घटना करम शिवारात उघडकीस आली आहे. या चोरीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून शेतकरी वर्गात तीव्र संताप व्यक्त होत आहे. याप्रकरणी सोनपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अशोक गित्ते यांच्या मार्गदर्शनाखाली सोनपेठ पोलीस करीत आहेत.      याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, शुभम आत्माराम धुमाळ (वय ३१, रा. शंकर पार्वतीनगर, परळी वैजिनाथ, जि. बीड) हे शेतकरी आपल्या करम येथील गट क्र. ७२ क आणि १०१ ब मधील दोन हेक्टर शेतजमिनीत शेती व्यवसाय करतात. त्यांनी यावर्षी सोयाबीनचे पीक घेतले होते. दि. ३० ऑक्टोबर २०२५ रोजी त्यांनी पिकाची मळणी करून, त्यातील ११५ पोती सोयाबीन आपल्या चुलते शरद दगडोबा धुमाळ यांच्या आखाड्यावर ३१ ऑक्टोबर रोजी साठवून ठेवली होती. परंतु, ...

Crime News....

इमेज
  पहिलीशी भांडण झाले म्हणून दुसरी केली; अन् तिने जाब विचारताच वस्तऱ्याने वार केज :- किरकोळ कारणा वरून नवरा बायकोत भांडण झाल्याने चार महिन्या पासून पहिली बायको माहेरी राहत असल्याची संधी साधून चक्क एकाने अवघ्या चार महिन्यात दुसरी बायको केली. पहिलीने त्याला दुसऱ्या लग्नाचा जाब  विचारताच नवऱ्याने तिला मारहाण करू धारदार वस्तऱ्याने कपाळावर वार  करून इतर तिघांच्या मदतीने तिला बेदम मारहाण केल्याची घटना केज शहरात घडली आहे. केजच्या क्रांतीनगर भागात राहात असलेले सतीश लांडगे आणि त्यांची पत्नी अंजना लांडगे यांच्या मागील चार महिन्या पूर्वी किरकोळ कारणाने भांडण झाल्याने अंजना लांडगे ही तिच्या विवाहित मुलगा आणि सून यांच्या सोबत क्रांतीनगर येथे मुलाच्या घरी राहत होती. दरम्यान याच काळात तिच्या नवऱ्याने दुसऱ्या एका महिले सोबत लग्न करून तो तिच्या सोबत एकत्र राहत असल्याची माहिती अंजना हिस मिळाली. म्हणून अंजना हिने नवऱ्याला त्याचा जाब विचारला आणि त्याने असे का केले ? माझे सर्व सामान आणि घर बांधायला दिलेले दोन लाख रु परत द्या. असे म्हणताच सतीश लांडगे यांनी तिला हाकलून दिले. त्या नंतर दि. ७ नो...

शरद पवार पक्षाला मिळाला परळीत नगराध्यक्ष पदाचा चेहरा....

इमेज
अपेक्षीत राजकीय घडामोड: दीपक देशमुखांच्या हाती तुतारी : मुंबईत शरद पवारांच्या पक्षात केला प्रवेश  परळी वैजनाथ, प्रतिनिधी.             नगरपरिषद निवडणुकीच्या तोंडावर अनेक राजकीय घडामोडी घडत असतात. राजकीय पक्षांतरे व उलथापालथी या घडामोडी सुरू असतात.  त्या अनुषंगाने परळी शहराच्या राजकारणात अपेक्षित राजकीय घडामोड घडली असुन धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय राहीलेल्या माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जाहीर प्रवेश केला आहे.    आ.धनंजय मुंडे यांच्यासोबत गेल्या अनेक वर्षापासून काम करणारे माजी नगराध्यक्ष तसेच नगरपरिषदेत नगरसेवक म्हणून अनेक वेळा निवडून आलेले दीपक देशमुख यांनी  गेल्या काही महिन्यांपासून राजकीय  सावतासुभा उभा केला होता.  धनंजय मुंडे यांच्यापासून दूर जात त्यांनी आपली स्वतंत्र चूल मांडत वेगळी राजकीय भूमिका घेतली होती. एवढेच नाही तर आपण नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवणारच असा ठाम निर्धार करत त्यांनी निवडणुका घोषित होण्यापूर्वीच प्रचाराची हवा निर्माण केली.  राष्ट्रवादी काँग्रेसमध...
इमेज
  पुण्य कर्म करण्याकरिता मन शुद्ध पाहिजे- पुज्य भीक्खुनी प्रा.धम्मदर्शना महाथेरी बीड( प्रतिनिधी) आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा ह्या तीन महिन्याच्या वर्षाकाळात अडीच हजार वर्षापासून भिक्खु संघ तत्कालीन विहारात राहून विद्यार्जन करीत असत व तथागता कडून मिळालेला उपदेश त्या परिसरातील उपासक उपासिकांना समजावून सांगत असतं. तथागतांचा सर्व अनमोल उपदेश पाली भाषेतून आहे. तो सर्व सामान्यांना समजावा म्हणून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक वर्ष तथागतांच्या उपदेशांचा सखोल अभ्यास केला व बोधिसत्व बाबासाहेबांनी शेवटचा ग्रंथ दि. बुद्धा अँड हीज धम्मा इंग्रजीतुन लिहिला सर्व भारतीयांना समजावा म्हणून डॉ. भदंत आनंद कौशल्यायन यांनी हिंदीमध्ये त्या  ग्रंथाचा अनुवाद केला. नंतर पी ई एस सोसायटीने त्या ग्रंथाचा मराठीत बुद्ध आणि त्यांचा धम्म असा अनुवाद केला. हाच धम्मग्रंथ तथागतांचा उपदेश  समजून घेण्या करिता व जगात प्रज्ञा,शील, करुणा मैत्री, बंधूता व न्यायाची निर्मिती होण्याकरता व त्यानुसार आपण आपली आचरण ठेवण्याकरता वर्षावास काळात सामुदायिक वाचन अनेक विहारात केल्या जाते. या तीन महिन्यानंतर त्या ग्रंथ वाच...

दोन दिवसीय अधिवेशनात विविध ठराव मंजुर

इमेज
आशांना किमान वेतनाचा लाभ सरकारनी द्यावा. कॉ डॉ डी एल कराड दोन दिवसीय अधिवेशनात विविध ठराव मंजुर परळी वै ता 9 प्रतिनिधी         आरोग्य विभागातील महत्वाचा घटक असलेल्या आशा व गटप्रवर्क यांना सरकारने कायम सेवेत सामावून घ्यावे व सामाजिक सुरक्षा प्रदान करावी यासाठी CITU कायम आशा व गटप्रवर्क फेडरेशन च्या सोबत राहुन आंदोलनात सहभागी होत असल्याचे मत CITU चे राष्ट्रीय उपाध्यक्ष कॉ डॉ डी एल कराड यांनी केले आहे.       परळी येथे 8 व 9 नोव्हेंबर रोजी आशा व गटप्रवर्क फेडरेशन चे 4 थे राज्य अधिवेशन उत्साहात पार पडले. यावेळी अधिवेशनाच्या समारोपाच्या भाषणात कॉ डॉ डी एल कराड बोलत होते. पुढे बोलताना कॉ कराड म्हणाले की देशातल्या 35 टक्के लोकांना घर बांधण्यासाठी स्वतः ची जागा नाही. देशातील 4.5 कोटी लोक अल्पशा उत्पन्नावर काम करतात त्यांना पेन्शन नाही.  योजना कर्मचाऱ्यांना कायम सेवेत घेतले पाहिजे. आशांना सामाजिक सुरक्षा असली पाहिजे. सरकारनी आशांना किमान वेतनाचा लाभ दिला पाहिजे. आशा व गटप्रवर्क संघटना मजबूत करावी लागेल. त्याशिवाय सरकार आपल्या मागण्या मान्य करणार नाही...
इमेज
  ओंकार (वैद्यनाथ) साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा उद्या ना. पंकजा मुंडेंच्या हस्ते शुभारंभ परळी वैजनाथ।दिनांक ०९। ओंकार (वैद्यनाथ कारखाना) साखर कारखान्याच्या बाॅयलर प्रदीपन आणि गळीत हंगामाचा शुभारंभ उद्या १० नोव्हेंबर रोजी राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांच्या हस्ते होत आहे.  ना. पंकजा मुंडे उद्या परळीत येत असून दुपारी २ वा. त्यांचे गोपीनाथ गड येथे हेलिकॉप्टरने आगमन होणार आहे. ओंकार साखर कारखाना प्रा. लि. युनिट क्रमांक ८ या कारखान्याचा बाॅयलर प्रदीपन व गळीत हंगामाचा शुभारंभ दुपारी २.१५ वा. त्यांच्या हस्ते व ओंकारचे चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील यांच्या उपस्थितीत होणार आहे. या कार्यक्रमास ऊस उत्पादक शेतकरी, सभासद, सर्व संचालक व शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन कारखान्याच्या वतीने करण्यात आले आहे. ••••

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!