दोन लाख सत्तेचाळीस हजाराचा माल हस्तगत.....
परळीत बेकायदेशीर दारूसाठ्यावर छापा; दोन लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त परळी वैजनाथ : प्रतिनिधी... परळीच्या पोलीस ठाणे संभाजीनगर हद्दीत बेकायदेशीर दारू साठवणूक व विक्रीप्रकरणी पोलिसांनी कारवाई करत मोठा दारूसाठा जप्त केला आहे. याप्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम ६५ (ई) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दि. १९ डिसेंबर २०२५ रोजी रात्री ८.४५ वाजण्याच्या सुमारास परळी वैजनाथ येथील हॉटेल आबासाहेब समोरील पत्र्याच्या शेडमध्ये आरोपी बेकायदेशीररीत्या विविध कंपन्यांची दारू साठवून ठेवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक संदीप उत्तमराव चव्हाण यांनी पथकासह छापा टाकून कारवाई केली.या कारवाईत रॉयल स्टॅग, मॅकडॉल, ओल्ड बॉम्बे, इम्पेरियल ब्ल्यू, आयकॉनिक व्हाइट, आफ्टर डार्क ब्ल्यू, सखु संत्रा, टँगो पंच, रुस्तुम गोल्ड, मॅजिक मोमेंट्स आदी विविध कंपन्यांच्या दारूचे बॉक्स जप्त करण्यात आले. एकूण जप्त मुद्देमालाची किंमत अंदाजे दोन लाखांहून अधिक रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी पोलीस ठाणे संभाजीनगर येथे ...