काँग्रेस- वंचित आघाडीच्या प्रचाराचा फोडणार नारळ
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ 22 नोव्हेंबर रोजी परळीत काँग्रेस- वंचित आघाडीच्या प्रचाराचा फोडणार नारळ परळी प्रतिनिधी. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे 22 नोव्हेंबर रोजी परळी शहरात येत असून त्यांच्या हस्ते परळी नगरपरिषद निवडणुकीतील काँग्रेस वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचाराचा नारळ फोडण्यात येणार असल्याची माहिती काँग्रेसचे शहराध्यक्ष बहादूरभाई व वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव मिलिंद घाडगे यांनी दिली आहे. याबाबत प्रसिद्धी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, परळी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेस वंचित बहुजन आघाडीच्या वतीने नगराध्यक्ष तसेच नगरसेवक पदांची निवडणूक लढविण्यात येत आहे. या निवडणूक प्रचाराचा शुभारंभ शनिवार,दिनांक 22 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी अकरा वाजता करण्यात येणार आहे. शहरातील मोंढा मार्केट येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रचार शुभारंभाच्या कार्यक्रमात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या हस्ते प्रचाराचा नारळ फोडण्यात येईल. माजी राज्यमंत्री व क...