पोस्ट्स

जानेवारी १८, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

परळीकरांच्या वतीने शोभायात्रा काढत मंगलमय स्वागत...

इमेज
  म्हैसूर मठाचे पीठाधीश्वर जगद्गुरु परमपूज्य श्री श्री शंकर भारती महास्वामीजी यांनी घेतलं ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन मंगल वाद्यासह जयघोषात महास्वामीजींचे परळीकर भाविकांनी केलं आत्मीय स्वागत वैद्यनाथ मंदिराचा अनादी काळापासूनचा वारसा अतिशय चांगला जतन केल्याचे व्यक्त केले समाधान परळी वैजनाथ, प्रतिनिधी...            म्हैसूर येथील येडतोर श्री योगानंदेश्वर सरस्वती मठाचे पीठाधीश्वर जगद्गुरु परमपूज्य श्री श्री शंकर भारती महास्वामीजी यांनी आज (दि.२३) बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग असलेल्या प्रभू वैद्यनाथाची मनोभावे पूजा करून दर्शन घेतले. परळीकर भाविक भक्तांच्या वतीने महास्वामीजींचे जोरदार मंगलमय स्वागत करण्यात आले. मंगल वाद्यांसह जयघोषात संत जगमित्रनागा मंदिर ते वैद्यनाथ मंदिर अशी स्वागत शोभायात्रा काढण्यात आली.            आद्य शंकराचार्यांच्या शृंगेरी शारदा पिठाच्या अद्वैत परंपरेतील महान विभूती आणि अद्वैत वेदांताच्या प्रचार- प्रसारासाठी कार्यरत असणारे, संपूर्ण देशभर प्रवास करून धर्मजागृती संस्कार आणि अध्यात्मिक मार्ग...

पुण्याच्या अजिंक्य डी वाय पाटील विद्यापीठाने केला सामाजिक सेवेचा गौरव

इमेज
बीड जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा ;ना. पंकजाताई मुंडे डी. लिट. पदवीने सन्मानित पुण्याच्या अजिंक्य डी वाय पाटील विद्यापीठाने केला सामाजिक सेवेचा गौरव पुणे ।दिनांक २४। राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांचा अजिंक्य डी वाय पाटील विद्यापीठाने आज शैक्षणिक क्षेत्रातील मानाची डी लिट (मानद डॉक्टरेट) पदवी देऊन सन्मान केला. या गौरवाने बीड जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.     लोहगांव येथील अजिंक्य डी वाय पाटील विद्यापीठाचा दहावा दीक्षांत समारंभ आज मोठया थाटात पार पडला. ना. पंकजाताई मुंडे यांची या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती होती. ना. पंकजाताई मुंडे हया राज्य मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री असून पर्यावरण व पशुसंवर्धन खात्यामार्फत गेल्या वर्षभरात अनेक लोकाभिमुख निर्णय त्यांनी घेतले आहेत, याशिवाय  सामाजिक कार्यातही त्या सातत्याने अग्रेसर असतात.  या  कार्याची दखल घेऊन विद्यापीठाने त्यांचा शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च पदवी 'मानद डॉक्टरेट' (डी.लिट.) देऊन आज सन्मान केला.   या कार्यक्रमास अजिंक्य डी वाय पाटील विद्यापीठाचे अध्यक्ष व कु...
इमेज
  हनुमान व्यायाम शाळेत भव्य सूर्यनमस्कार स्पर्धेचे आयोजन विद्यार्थी व नागरीकांनी सहभागी व्हावे; दत्ताप्पा ईटके गुरुजी   परळी वैजनाथ जागतिक सूर्यनमस्कार दिनाचे औचित्य साधून रविवारी आयोजित करण्यात आलेल्या भव्य सूर्यनमस्कार स्पर्धेत शहर व तालुक्यातील विद्यार्थी व नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन हनुमान व्यायाम शाळेचे जेष्ठ संचालक दत्ताप्पा ईटके गुरुजी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.  25 जानेवारी हा दिवस जगभरात सूर्यनमस्कार दिन म्हणून साजरा केला जातो. सूर्यनमस्कार म्हणजे परिपूर्ण व्यायाम असल्याने विद्यार्थ्यांना व सर्वसामान्यांना सुध्दा या व्यायाम प्रकारामुळे आपले आरोग्य सुदृढ व निरोगी ठेवण्यास मदत होते. हनुमान व्यायाम शाळेतर्फे दर वर्षी जागतिक सूर्यनमस्कार दिन साजरा केला जातो. याही वर्षी हनुमान व्यायाम शाळेत विनामूल्य होणाऱ्या या स्पर्धेत इयत्ता दहावी च्या आतील विद्यार्थ्यांसाठी गट व सर्वसामान्य गट अश्या दोन प्रकारात होणाऱ्या स्पर्धा रविवार दिनांक 25 जानेवारी, सायंकाळी 6.00 वाजता सुरू होणार आहेत. सुदृढ व निरोगी शरीर राखण्यासाठी सूर्यनमस्कार आवश्यक असून या स्पर्धेद्वारे...
इमेज
"वैद्यनाथ"च्या राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धेचे सांघिक पारितोषिक संभाजीनगरच्या पहाडे विधी महाविद्यालयाकडे संभाजीनगरचा आदित्य दराडे प्रथम, परळीची कु. लक्ष्मी जुनाळ द्वितीय, धर्मापुरीची कु.अक्षता दहिफळे तृतीय परळी वैजनाथ (दि.२४)-दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या ७६ व्या जयंतीवर्षाचे औचित्य साधून  जवाहर शिक्षण संस्थेच्या येथील वैद्यनाथ महाविद्यालयात  काल (दि.२३ जाने.) राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वादविवाद स्पर्धा  उत्साहात संपन्न झाली.यात सांघिक पारितोषिक छत्रपती संभाजीनगरच्या माणिकचंद पहाडे विधी महाविद्यालयाच्या  संघाने जिंकले .तर स्पर्धेचे वैयक्तिक प्रथम पारितोषिक (₹ ७०००/-व स्मृतिचिन्ह) याच महाविद्यालयाच्या आदित्य ज्ञानेश्वर दराडे याने पटकावले. द्वितीय पारितोषिक (₹ ५०००/- व स्मृतिचिन्ह) परळी येथील यजमान वैद्यनाथ महाविद्यालयाच्या कु. लक्ष्मी महेश जुनाळ याने मिळवले, तर तृतीय पारितोषिक (₹३००० व स्मृतिचिन्ह) धर्मापुरी येथील कै. शंकरराव गुट्टे महाविद्यालयाच्या कु. अक्षता संतोष दहिफळे हिने जिंकले.  तर उत्तेजनार्थ (₹१०००/-)  ठेवण्यात आलेली तीन पारितोषिके क्रम...

धनंजय मुंडे यांनी मानले देवेंद्र फडणवीस यांचे आभार

इमेज
परळी वैजनाथ औष्णिक विद्युत केंद्राच्या निष्कासित जागेवर सौर उर्जा प्रकल्प उभारणीचा मार्ग मोकळा; पहिल्या टप्प्यात  ५० मेगावॅटचा प्रकल्प सुरु होणार परळी वैजनाथ, एमबी न्यूज वृत्तसेवा....              बीड जिल्ह्य़ातील परळी वैद्यनाथ येथील औष्णिक विद्युत केंद्राच्या निष्कासित झालेल्या संच क्रमांक १ ते ५ च्या जागेत मेगा सोलर प्रकल्प उभारण्यास शासनाने मंजुरी दिली असून पहिल्या टप्प्यात याठिकाणी ५० मेगावॅट वीज निर्मिती क्षमता असलेला सौर उर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. त्याची निविदा महानिर्मितीने प्रसिद्ध केली आहे. या ठिकाणी एकूण 350 मेगावॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्प उभारणीचा प्रस्ताव आहे.         परळी वैजनाथ येथे जुने व नवे औष्णिक विद्युत केंद्र म्हणून एकूण आठ संच कार्यरत होते. त्यापैकी जुन्या औष्णिक विद्युत केंद्रातील एकूण पाच संच कायमस्वरूपी बंद करून ते संपूर्णतः निष्काशीत करण्यात आलेले आहेत. सध्या नवीन औष्णिक विद्युत केंद्रातील एकूण तीन संच सुरू आहेत. संच क्रमांक १ व २ हे १९८० सालचे असल्यामुळे त्यांचे आयुर्मान कालबाह्य़ झाल्याचे स...

कार्यक्रमासाठी प्रवेश पासची आवश्यकता नाही.....

इमेज
  हिंद-दी-चादर कार्यक्रमाच्या स्वागतासाठी नांदेड नगरी सज्ज जिल्हा प्रशासनाची तयारी पूर्ण नांदेड, दि. २३ जानेवारी :- नांदेड येथे उद्यापासून दोन दिवस “हिंद-दी-चादर” अंतर्गत शिखांचे नववे गुरु श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहिदी समागम वर्षानिमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाची सर्व तयारी पूर्ण झाली असून भाविकांच्या स्वागतासाठी नांदेड नगरी सज्ज झाली आहे. या ऐतिहासिक कार्यक्रमाचा जास्तीत जास्त लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने शनिवार २४ जानेवारी रोजी सकाळी श्री गुरु ग्रंथ साहिब नगर कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे भव्य महानगर कीर्तन सकाळी ८ वाजता गुरुद्वारा गेट क्रमांक १ येथून प्रारंभ होऊन गुरुद्वारा चौक – महावीर चौक – वजिराबाद मार्केट – वजिराबाद चौक – तिरंगा चौक – रामसेतू दादरा – रवी नगर – नागार्जुन पब्लिक स्कूल – मामा चौक या मार्गाने मोदी मैदान, मुख्य कार्यक्रमस्थळी पोहोचणार आहे. या मार्गावरील सर्व नागरिकांनी आपल्या घरांसमोर व दुकानांसमोर रंगीबेरंगी फुले, रांगोळी, विद्युत...

लोकाभिमुख कारभाराची चुणूक....

इमेज
  नागरिकांची मागणी, तत्पर कृती : नागरिकांना त्रासदायक ठरणारे अनावश्यक गतिरोधक काढले व रस्त्यांवरील जोडपट्ट्यातील खड्डे बुजवण्यास सुरुवात नगराध्यक्षा पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी यांच्या लोकाभिमुख  कारभाराची चुणूक परळी वैजनाथ | प्रतिनिधी.... परळी नगर परिषदेचा कारभार हाती घेताच नगराध्यक्ष सौ. पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी यांनी कोणताही कालापव्यय न करता थेट कामाला सुरुवात केलेली आहे. केवळ आश्वासनांवर नव्हे, तर प्रत्यक्ष निर्णय आणि अंमलबजावणीवर भर दिला आहे. या अनुषंगानेच अनेक लोकाभिमुख कामांपैकी नागरिकांतून मागणी असलेल्या व प्रत्यक्ष नागरिकांचा संबंध येणाऱ्या कामाची तातडीने दखल घेत याबाबतचे कार्यवाही त्यांनी अतिशय तत्परतेने केली आहे नागरिकांना त्रासदायक ठरणारे शहरातील मुख्य रस्त्यावरील अनावश्यक गतिरोधक हटवणे हटवणे तसेच शहरातील रस्त्यांवर जोड पट्ट्यांच्या ठिकाणी असलेले खड्डे भराव टाकून व्यवस्थित करण्याच्या कामाला सुरुवात झाली असून नागरिकातून समाधान व्यक्त होत आहे.        शहरातील प्रमुख तसेच अंतर्गत रस्त्यांवर नियमांना डावलून त्रासदायक ठरणारे गतिरोधके तयार करण्...
इमेज
  बीड जिल्ह्यातील ग्राहकाची जुनी वाहने तात्काळ ऑनलाइन करणे बाबत - अनिल बोर्डे गेवराई( प्रतिनिधी) बीड जिल्ह्यातील जुनी वाहने ऑनलाइन नसल्यामुळे ग्राहकांना अनेक समस्यांना सामना करावा लागत असल्यामुळे ऑनलाइन करण्यासाठी बीड जिल्हा ग्राहक पंचायत महाराष्ट्र यांनी याबाबत मा. जिल्हाधिकारी बीड व मा. जिल्हा परिवहन अधिकारी बीड यांच्याकडे तात्काळ ऑनलाईन वाहने करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.. बीड जिल्ह्यातील जुनी वाहने ऑनलाईन नसल्यामुळे विक्री केल्यानंतर (नवीन खरेदी दाराच्या नांवे) करून हस्तांतरित होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. जुनी वाहने विक्री केल्यानंतर ऑनलाइन नसल्यामुळे बीड जिल्ह्यातील वाहनधारकांना मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. वाहन विक्री केल्यानंतर देखील जुन्याचं मालकाच्या नांवावर रहात असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे जुनी वाहने युद्ध पातळीवर ऑनलाइन करून हस्तांतरित होणे आवश्यक आहे.  याप्रकरणी तात्काळ युद्धपातळीवर कार्यवाही होणे अपेक्षित आहे. तरी यावर युद्ध पातळीवर कार्यवाही करून वाहने ऑनलाइन करण्यात यावीत अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच बीड जिल्ह्...
इमेज
  26 जानेवारी दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण कार्यक्रमाचे आयोजन   बीड  प्रतिनिधी - प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाची माहिती देताना मला अत्यंत आनंद होत आहे. हा कार्यक्रम 26 जानेवारी 2025 रोजी सकाळी 10:05 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा येथे होईल. बीड शहरातील सर्व सुजाण नागरिकांना या महत्त्वपूर्ण वेळी एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आले आहे, कारण हा दिवस आपल्या देशाच्या लोकशाहीचा आणि स्वातंत्र्याचा गर्विष्ठ प्रतीक आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने, कृपया खालील अत्यंत महत्त्वाच्या गोष्टींचा विचार करण्याचे आवाहन करण्यात येते:  कार्यक्रम 26 जानेवारी 2025 रोजी सकाळी 10:05 वाजता प्रारंभ होईल. कृपया या वेळेस कार्यक्रम स्थळी उपस्थित राहण्याची तयारी करा.   या ध्वजारोहणाचा कार्यक्रम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा येथे होणार आहे, ज्याचे ऐतिहासिक महत्त्व सर्व उपस्थित व्यक्तींनी जाणून घेणे गरजेचे आहे.  सर्व सुजाण नागरिकांना या विशेष प्रसंगाला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आपली उप...
इमेज
  प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम; मोठ्या संख्येने उपस्थित राहावे – संजय सेवलकर  परळी (प्रतिनिधी) प्रजासत्ताक दिनानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही राणी लक्ष्मीबाई टावर  चौक येथे  २६  जानेवारी २०२६ रोजी सकाळी ७ वाजता भारतमातेचे पूजन व देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे यावेळी सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन विक्रम चहाचे वितरक संजय सेवलकर यांनी केले आहे.       सूर–संगम ऑर्केस्ट्राच्या वतीने सादर होणाऱ्या या कार्यक्रमात निवेदक व गायक  लालाजी के. परळीकर तसेच  अमोल तरकसे सर देशभक्तीपर गीतांची सादरीकरण करणार आहेत. यावेळी लहान मुलांच्या मनोरंजनासाठी तात्या विंचू यांचा कार्यक्रम ठेवण्यात आला असून उपस्थितांसाठी जिलेबी वाटपाचेही आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन विक्रम चहा चे वितरक  संजय सेवलकर यांनी केले आहे.

परळी वैजनाथ येथे शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांना सर्वपक्षीय अभिवादन

इमेज
  बाळासाहेब ठाकरेंची विचारधारा तरुण पिढीसाठी प्रेरणादायी-नगराध्यक्षा सौ. पद्मश्रीताई धर्माधिकारी ८० टक्के समाजकारणाच्या विचारातूनच शिवसेना बळकट-शिवसेना नेते अभयकुमार ठक्कर परळी (प्रतिनिधी): हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त परळी वैजनाथ येथे शिवसेना माजी नगराध्यक्ष अभयकुमार  ठक्कर यांच्या मार्गदर्शनाखाली हिंदुहृदयसम्राट जयंती उत्सव समितीच्या वतीने शुक्रवार दिनांक 23 जानेवारी रोजी भव्य सर्वपक्षीय अभिवादन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. राणी लक्ष्मीबाई टॉवर चौक येथे सकाळी दहा वाजता परळीच्या नगराध्यक्षा सौ.पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी, भाजप ज्येष्ठ नेते दत्तापा ईटके गुरुजी , माजी नगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते अभयकुमार ठक्कर , राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) ज्येष्ठ नेते प्रा.डॉ.मधुकर आघाव, राष्ट्रवादी काँग्रेस (S.P) ज्येष्ठ नेते बाळासाहेब देशमुख, शिवसेना (शिंदे गट)तालुका प्रमुख व्यंकटेश शिंदे, वैद्यनाथ मंदिराचे विश्वस्त राजेशजी देशमुख, न.प. गट नेते वजना सोळंके,रघुवीर देशमुख, अँड.अरुण पाठक, वैद्यनाथ ब...
इमेज
उद्यापासून चार दिवस बँका बंद                युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सच्यावतीने (युएफबीयू) मंगळवार, 27 जानेवारी रोजी अखिल भारतीय बँक संप पुकारण्यात आला आहे.बँकिंग क्षेत्रात पाच दिवसांचा आठवडा लागू करण्याच्या मागणीसाठी युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सच्या वतीने (युएफबीयू) मंगळवार, 27 जानेवारी रोजी अखिल भारतीय बँक संप पुकारण्यात आला आहे. त्याचबरोबर शनिवारी, रविवार सुट्टी असल्यामुळे आणि सोमवारी प्रजासत्ताक दिन असल्यामुळे आता सलग चार दिवसा बँका बंद राहणार आहेत.           24 जानेवारी हा चौथा शनिवार आहे आणि या दिवशी बँका बंद असतात. 25 जानेवारी हा रविवार आहे. 26 जानेवारी हा प्रजासत्ताक दिनाची सुट्टी आहे. या तिन दिवशी बँकाना सुट्ट्या असणार आहे. चौथ्या दिवसी म्हणजे 27 जानेवारीला ही बँक बंद राहणार आहेत. बँक संपामध्ये देशभरातील सुमारे 8 लाख बँक कर्मचारी व अधिकारी सहभागी होणार आहेत. युएफबीयू मध्ये बँक कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या 9 प्रमुख संघटनांचा समावेश असून, सार्वजनिक, खासगी, विदेशी, प्रादेशिक ग्रामीण तसेच सहकारी बँकांमधील कर्म...

प्रदीप खाडे लिखित अभिष्टचिंतन विशेष लेख.....

इमेज
  क्रिकेटच्या मैदानातून उद्योगविश्वात झेप :व्यंकटेश (पापा) मुंडे  चिकाटी, जिद्द आणि नम्रतेचा आदर्श : युवा उद्योजक व्यंकटेश पापा मुंडे     आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ शिक्षण असून उपयोग नाही, तर त्या शिक्षणाला कृतीची जोड देणं आवश्यक आहे. बदलत्या जागतिकीकरणाच्या युगात उद्योग, व्यापार, सेवा क्षेत्र यामध्ये मोठ्या संधी उपलब्ध असल्या तरी त्या संधी ओळखून त्याचा योग्य उपयोग करणारे व्यक्तिमत्त्व फारच कमी दिसून येते. अशाच मोजक्या व्यक्तिमत्त्वांपैकी एक नाव म्हणजे व्यंकटेश (पापा) मुंडे. क्रिकेटसारख्या खेळावर नितांत प्रेम करणारा एक सर्वसामान्य ग्रामीण युवक, आपल्या मेहनतीच्या जोरावर यशस्वी उद्योजक म्हणून कसा घडतो, याचे उत्तम उदाहरण म्हणजे व्यंकटेश पापा मुंडे आहेत ‌  बालपण आणि कौटुंबिक पार्श्वभूमी व्यंकटेश पापा मुंडे यांचा जन्म एका सर्वसामान्य कुटुंबात झाला. त्यांच्या कुटुंबात यापूर्वी कोणीही मोठा उद्योजक किंवा व्यापारी नव्हता. साधे जीवनमान, कष्टाची तयारी आणि संस्कारांची शिदोरी याच गोष्टी त्यांच्या बालपणात रुजल्या. लहानपणापासूनच त्यांनी कष्टाचे महत्त्व ओळखले. आई-वडिलांनी दि...

वंदे मातरम सेना आक्रमक....!!!!!

इमेज
शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांना अपमानास्पद वागणूक देणाऱ्या योगी सरकारचा निषेध : दिलीप जोशी परळी (प्रतिनिधी).... प्रयागराजमध्ये जे घडले, ते केवळ दुर्दैवी नाही, तर लज्जास्पद आहे. भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे राज्यकर्ते स्वतःला हिंदुत्वाचे ठेकेदार म्हणवून घेण्यात कधीच थकत नाहीत, पण जसा मुखवटा उतरतो, तसा आतील पोकळपणा स्पष्टपणे दिसू लागतो. ज्या सरकारला 'हिंदू राष्ट्र' म्हणवून ढोल बडवण्यात आनंद मिळतो, ते अशा शंकराचार्यांना सहन करू शकले नाहीत ज्यांनी सत्तेची चापलुसी करण्यास नकार दिला. त्यामुळे शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांना अपमानास्पद वागणूक देणाऱ्या योगी सरकारचा निषेध वंदे मातरम् सेनेचे अध्यक्ष दिलीप भाऊ जोशी यांनी केला आहे. शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद वारंवार सत्तेला प्रश्न विचारतात, पाखंड उघड करतात आणि अस्वस्थ करणारी सत्ये समोर आणतात. याच "अपराधा"ची शिक्षा त्यांना आणि त्यांच्या बटूंना मिळाली. सार्वजनिक अपमान केला. त्यांची शिखा (शेंडी) पकडून त्यांना ओढण्यात आले, त्यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला, त्यांचा स्वाभिमान पायदळी तुडवला गेला. हे दृश्य वेदनादायी होते आणि त्या...
इमेज
  महिलांच्या एकोपा व सामाजिक सौहार्दाचे प्रतीक ठरले संक्रांतीनिमित्त हळदीकुंकू परळी (प्रतिनिधी): संक्रांतीच्या पावन पर्वानिमित्त महिलांमधील स्नेह, समरसता आणि सामाजिक भावना अधिक दृढ व्हाव्यात या उद्देशाने कुलकर्णी, केंद्रे, वारद व नव्हाडे परिवाराच्या वतीने आयोजित करण्यात आलेला हळदीकुंकू कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि आपुलकीच्या वातावरणात पार पडला. परळी येथील गणेशपार भागात पत्रकार अनंत कुलकर्णी यांच्या निवासस्थानी हा कार्यक्रम संपन्न झाला. दरवर्षी परंपरेनुसार एकत्र येत सामाजिक नातेबंध अधिक घट्ट करण्याचा संकल्प या कुटुंबियांनी जपला आहे. यंदाही कुलकर्णी, नव्हाडे, केंद्रे व वारद परिवारांनी एकत्र येत संक्रांतीचे औचित्य साधून हा उपक्रम राबवला. कार्यक्रमाला शहरातील विविध भागांतील महिलांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली. हळदीकुंकू हा केवळ धार्मिक किंवा सांस्कृतिक विधी न राहता महिलांच्या मनातील आनंद, सौहार्द आणि आपुलकी व्यक्त करणारा सामाजिक सोहळा ठरला. या प्रसंगी परळी शहराच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा पद्मश्रीताई धर्माधिकारी यांनी विशेष भेट देत महिलांशी संवाद साधला. त्यांनी अशा उपक्रमांचे कौतु...
इमेज
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे जन्मशताब्दी निमित्त परळीत 23 जानेवारीला सर्वपक्षीय अभिवादन सभा ठाकरे गटाच्या वतीने आयोजन; नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन परळी वैजनाथ / प्रतिनिधी : विश्वहिंदू हृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी निमित्त परळी शहरात शुक्रवार, दिनांक 23 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता भव्य सर्वपक्षीय अभिवादन सभेचे आयोजन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे. ही अभिवादन सभा परळी वैजनाथ येथील राणी लक्ष्मीबाई टॉवर चौक येथे आयोजित करण्यात आली असून, या कार्यक्रमास परळी शहरासह पंचक्रोशीतील सर्व शिवप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे. स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिकांवर तसेच महाराष्ट्रातील तमाम जनतेवर अपार प्रेम होते. “२० टक्के राजकारण आणि ८० टक्के समाजकारण” हे त्यांचे ब्रीदवाक्य आजही समाजाला दिशा देणारे असून, त्यांचे विचार आजही कोट्यवधी शिवसैनिकांच्या मनात जिवंत आहेत.त्यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने आयोजित या सर्वपक्ष...
इमेज
  शासनाच्या शिक्षक कर्मचारी काव्यवाचन स्पर्धेत परळीचा डंका कवी दिवाकर जोशी यांची कविता राज्यातून द्वितीय परळी: महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्यामार्फत शिक्षक कर्मचारी व अधिकारी यांच्यासाठी राज्यस्तरीय स्वरचित काव्यवाचन स्पर्धेचे आयोजन शनीवारी संगमनेर जि.अहिल्यानगर येथे करण्यात आले होते. यामध्ये महाराष्ट्रातील आठ विभागाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या चाळीस दर्जेदार कवींच्या स्वरचीत कवितांच्या सादरीकरणातून द्वितीय क्रमांकाने कासारवाडी ति.परळीचे शिक्षक आणि सुप्रसिद्ध गझलकार दिवाकर जोशी यांच्या गझलेची राज्यातील सर्वोत्कृष्ट कवितांमध्ये निवड करण्यात आली. केंद्र स्तर, तालुकास्तर. विभाग स्तर आणि राज्यस्तर असे टप्पे यशस्वीरित्या पार करत दिवाकर जोशी यांची  'विठ्ठल मला निरंतर विद्यालयात दिसतो' ही गझल महाराष्ट्रात सर्वोत्कृष्ट ठरली आहे त्यांच्या या यशाबद्दल परळीचे गटशिक्षणाधिकारी श्री गणेश गिरी, शिक्षण विस्तार अधिकारी श्री दत्तात्रय कोकणे, केंद्रप्रमुख श्री श्याम सातपुते, कासारवाडी चे मुख्याध्यापक श्री आत्माराम आघाव, मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष श्री विजयजी ...

स्व श्यामराव देशमुख स्मृति व्याख्यानमाला

इमेज
  आपल्या वाट्याला आलेलं दुःख हे जगापेक्षा खूप कमी आहे . असं समजाल तर आनंदी व्हाल ! स्व. श्यामराव देशमुख स्मृति व्याख्यानमालेत संजय कळमकर यांचे प्रतिपादन  परळी वैजनाथ दि.२१ (प्रतिनिधी)    आपल्या वाट्याला आलेलं दुःख हे जगापेक्षा खूप कमी आहे . असे समजाल तर आनंदी व्हाल..स्व श्यामराव देशमुख स्मृति व्याख्यानमालेत संजय कळमकर यांनी प्रतिपादन केले.ते येथील लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्व. श्यामराव देशमुख (काका ) स्मृतिसमारोहात मंगळवारी (ता.२०) बोलत होते.    लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात स्व श्यामरावजी देशमुख स्मृतिसमारोहात जगण्यातल्या आनंदाच्या वाटा’ या विषयावर प्रसिद्ध व्याख्याते संजय कळमकर यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते . या व्याख्यानातून त्यांनी जीवनाकडे पाहण्याची नवीन दृष्टी दिली . स्पर्धेने आनंद नष्ट करू नका  ,अकारण  चिंतेने आनंदावर विरजण पडते .  घराघरांत कुटुंबीयांमधील सुसंवाद आनंदनिर्माण करतो. स्वैराचाराने आनंद भोगू नका, आनंद जवळ कुटुंबांत असताना बाहेर शोधण्याचा प्रयत्न करू नका, कधी नितळ...

संतोष फड यांना पितृशोक.....

इमेज
  कन्हेरवाडी येथील सेवा सहकारी सोसायटीचे माजी व्हाईस चेअरमन नाथराव फड यांचे निधन परळी वैजनाथ (प्रतिनिधी)        तालुक्यातील मौजे कन्हेरवाडी येथील सेवा सहकारी सोसायटीचे माजी व्हाईस चेअरमन नाथराव श्रीरंग फड यांचे आज दि.२१ जानेवारी २०२५ रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. माजी व्हाईस चेअरमन नाथराव फड यांचे सकाळी ०८ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली मृत्यू समयी ६२ वर्षे होते. संतोष नाथराव फड व बबलू नाथराव फड यांचे वडिल होत.          परळी तालुक्यातील कन्हेरवाडी येथील माजी व्हाईस चेअरमन नाथराव श्रीरंग फड यांचे आज अल्पशा आजाराने बुधवार दि. २१ जानेवारी रोजी निधन झाले. कन्हेरवाडी येथे अनेक काळ सेवा सहकारी सोसायटीचे सदस्य व अनेक पद ही त्यांनी भुषविले आहे. याकाळात गावात त्यांनी शैक्षणीक, सांस्कृतिक अनेक कामात त्यांचा सहभाग होता.           माजी व्हाईस चेअरमन नाथराव श्रीरंग फड हे अत्यंत मनमिळावू व धार्मिक स्वभावाचे होते. त्यांच्या जाण्याने परळी वैजनाथ तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. माजी व्हाईस चेअरमन नाथराव श्रीरं...
इमेज
मिलिंद विद्यालयात 'स्व.पंडितअण्णा मुंडे क्रीडा महोत्सवाची' सुरूवात  परळी वै.(प्रतिनिधी):  नाथ शिक्षण संस्था संचलित मिलिंद माध्यमिक विद्यालय व मिलिंद ज्युनियर कॉलेज येथे 'स्व.पंडितअण्णा मुंडे क्रीडा महोत्सवाचे' उद्घाटन शाळेचे मुख्याध्यापक कदरकर बी.जी.,प्राचार्य व्ही.एन.शिंदे,पर्यवेक्षक राठोड बी.एस.,उप-प्राचार्य, इरफान शेख यांच्या हस्ते मिलिंद विद्यालयाच्या मैदानावर श्रीफळ वाढवून करण्यात आली. याप्रसंगी क्रिडा शिक्षक संजय शेप, शाळेतील सर्व विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थितीत होते.      या क्रिडामहोत्सवाअंतर्गत शाळेतील क्रिडाविभाग प्रमुख संजय शेप सर यांच्या मार्गदर्शनानुसार विविध अंतरवर्गीय स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. यात कबड्डी,खो-खो,क्रिकेट,हाॅलीबाॅल, धावने या सांघिक व वैयक्तिक मैदानी स्पर्धांचा समावेश आहे. तसेच निबंध स्पर्धा, हस्ताक्षर स्पर्धा,सॅक रेस,दोरी उड्या, मुक्त चित्र स्पर्धा, रंगभरण स्पर्धा, संगीत खुर्ची, लिंबू चमचा इत्यादी स्पर्धांचा समावेश करण्यात आला आहे.

परळी विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक

इमेज
 ..... अन्यथा जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका स्वतंत्र लढू - प्रा.टी.पी.मुंडे परळी विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक  परळी वैजनाथ, प्रतिनिधी ....       परळी विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली. या बैठकीत शिवसेनेचे बीड जिल्हा संपर्कप्रमुख प्रा.टी.पी.मुंडे  यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. महायुतीमध्ये आगामी होणाऱ्या बीड जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये सन्मानपूर्वक जागा दिल्यास महायुती म्हणून लढणार अन्यथा शिवसेना परळी विधानसभा मतदारसंघात स्वतंत्रपणे लढणार आहे असे प्रतिपादन त्यांनी केले.          जवाहरलाल नेहरू वरिष्ठ महाविद्यालय परळी येथे परळी विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेनेचे नेते विनायक गडदे, ज्येष्ठ नेते आप्पाराव पांढरे महाराज, भीमराव मुंडे, प्रभाकर  फड, संतराम गडदे, शंकर नागरगोजे, सूर्यकांत मुंडे, छत्रपती कावळे, मीराताई जगताप, घाडगे ताई आदी उपस्थितांनी कार...
इमेज
  राज्यातील महापौर पदाच्या आरक्षण सोडत गुरुवारी 

स्व.श्यामराव देशमुख स्मृतिसमारोहातील उपक्रम

इमेज
आज सामूहिक लोकनृत्य स्पर्धा: स्व.श्यामराव देशमुख स्मृतिसमारोहातील उपक्रम परळी वै. (प्रतिनिधी)...  कै.लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालय,परळी वै.येथे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्व. श्यामराजी देशमुख यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित स्व. श्यामराजी देशमुख स्मृतिसमारोह–२०२६ अंतर्गत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी 'सामूहिक लोकनृत्य' स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.या स्पर्धेत परळी पंचक्रोशीतील शाळा व महाविद्यालयातील एकूण २० स्पर्धक संघ सहभागी होणार आहेत.त्यातील स्पर्धकांची संख्या जवळपास १५० आहे. ही स्पर्धा सोमवार, दि. १९ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ४.०० वाजता महाविद्यालयाच्या प्रांगणात संपन्न होणार आहे. परळीच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा मा.सौ. पद्मश्रीताई बाजीरावभैय्या धर्माधिकारी  यांच्या शुभहस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन  होणार असून, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष मा. श्री.संजयजी देशमुख हे  राहणार आहेत. यावेळी संस्थेचे ज्येष्ठ संचालक मा.श्री. अनिलरावजी देशमुख, सचिव मा. श्री. रवींद्रजी देशमुख, कोषाध्यक्ष मा. प्रा.प्रसादजी देशमुख तसेच प्राचार्य तथा...

दुःखद वार्ता......

इमेज
  विमलताई देशपांडे यांचे निधन  परळी, प्रतिनिधी येथील सरस्वती विद्यालयातील सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षिका विमल प्रभाकरराव देशपांडे (वय ८६) यांचे रविवारी (दि. १८) दुपारी वृद्धापकाळाने देशपांडे गल्लीतील राहत्या वाड्यात निधन झाले.     त्यांच्या पार्थिवावर सायंकाळी परळीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, सून, तीन मुली, जावई, नातवंडे, पतवंडे, असा मोठा परिवार आहे. परळी येथील महाजेनकोचे निवृत्त अधिकारी सतीश देशपांडे यांच्या त्या मातोश्री होत.

लाभ घेण्याचे आवाहन....

इमेज
  संत शिरोमणी श्री मन्मथ स्वामी  जन्मोत्सव निमित्त परळीत  21 जानेवारी पासून तीन दिवसीय श्री परम रहस्य पारायण  परळी :येथील श्री संत गुरुलिंग स्वामी मठ संस्थान, बेलवाडी (वैद्यनाथ मंदिराजवळ) येथे संत शिरोमणी श्री मन्मथ स्वामी यांचा जन्मोत्सव दि. 23 जानेवारी 2026 रोजी दुपारी 12 वाजून 21 मिनिटांनी भक्तिभावात साजरा होणार आहे. या सोहळ्यास श्री गुरु 108 सिद्धलिंग शिवाचार्य महाराज (साखरखेडेकर) यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. संत शिरोमणी श्री मन्मथ स्वामी जन्मोत्सवानिमित्त वीरशैव लिंगायत समाज, परळी यांच्या वतीने दि. 21, 22 व 23 जानेवारी 2026 रोजी तीन दिवसीय श्री परमरहस्य पारायण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. गेल्या दहा वर्षांपासून परळीत या कार्यक्रमाचे सातत्याने आयोजन केले जात असून, यंदा हे अकरावे वर्ष आहे. कार्यक्रमाचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे : 🔹 दि. 21 जानेवारी 2026 सकाळी 8.00 ते 11.45 श्री परमरहस्य पारायण यावेळी श्री वैद्यनाथ भजनी सेवाभावी संस्था, श्री शंभू महादेव भजनी मंडळ, श्री शिवकन्या भजनी मंडळ व श्री सुरवेश्वर भजनी मंडळ यांच्या वतीने भजनसेवा होणार आहे. 🔹 दि. ...

बीड जिल्ह्यातून शिंदे सेनेत इनकमिंग वाढले..... आणखी एका नेत्याचा प्रवेश

इमेज
  माजी आ.संगीता ठोंबरे यांचा शिंदे सेनेत प्रवेश केज (प्रतिनिधी) बीड जिल्ह्यात राष्ट्रवादी(शरद पवार)ला मोठा धक्का बसला आहे. शरद पवार गटाच्या प्रदेश उपाध्यक्ष आणि केज विधानसभेच्या माजी आमदार प्रा. संगीता ठोंबरे यांनी आपल्या समर्थकांसह आज(दि.18) शिवसेना पक्ष प्रमुख आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदेसेनेत जाहीर प्रवेश केला. या पक्षप्रवेशावेळी राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट हेदेखील उपस्थित होते. शिरसाटांनी ठोंबेर यांचे अभिनंदन केले व केज विधानसभेमध्ये शिवसेना पक्षाला बळकटी मिळेल, अशी आशा व्यक्त केली. यावेळी शिवसेना बीड जिल्हाप्रमुख सचिन मुळुक, शिवसेना नेते अनिल जगताप, माजी आमदार ज्ञानराज चौगुले, धाराशिव विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना नेते अजित  पिंगळे  यांच्यासह शिवसेनेचे नेते व पदाधिकारी हजर होते.  यांनीही केला शिवशेनेत प्रवेश..! आमदार ठोंबरे यांच्यासोबत डॉ. विजय प्रकाश ठोंबरे, कुंभेफळचे माजी सरपंच किशोर थोरात, भगवान सेनेचे संस्थापक अध्यक्ष विजय  केंद्रे, अशोक सक्राते ,  अरविंद चाळक,  उमेश चाळक यांच्यासह केज मतदार संघातील अनेक प...
इमेज
  श्रीपतरायवाडी येथे गावरान वाणाच्या बियाणे बॅंकेची स्थापना अंबाजोगाई.....दि.18जानेवारी रोजी अंबाजोगाई येथील कला व वाणिज्य महिला महाविद्यालयातील आजीवन शिक्षण व विस्तार सेवा विभागातर्फे श्रीपतरायवाडी येथे हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमात महिला शेतकऱ्यांना वाण म्हणून गावरान वाणाचे बीज महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ मंचक मोरे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. हल्ली गावरान भाज्या व‌ फळे दुर्लभ होत आहेत.आरोग्याच्या दृष्टीने गावरान भाजी व फळे महत्त्वाची आहेत.म्हणुन महिला महाविद्यालयांतील आजीवन शिक्षण व विस्तार सेवा विभागातील विद्यार्थीनींनी श्रीपतरायवाडी या गावात देशी गावरान वाणाच्या बियाणे बॅंकेची स्थापना करून हे बियाणे शेतकऱ्यांनी आपल्या शेतीमध्ये वापरावे या संबंधी जागृती करण्यात आली. या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.मंचक मोरे यांनी गावरान बियाणे बॅंकेची स्थापना करण्याचा उद्देश सांगुन शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.कार्यक्रम अधिकारी प्रा.महेजबीन फारुकी यांनी शेतकऱ्यांचे स्वागत‌ करुन गावरान वाणाचे बियाणे आरोग्यासाठी कसे महत्त्वाचे आहे यावर प्रकाश टाकला. या कार...

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!

Accident.....

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!