पोस्ट्स

फेब्रुवारी १, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
इमेज
  नागपूरला अत्याधुनिक आरोग्यसेवेची नवी दिशा - गंगाधरराव फडणवीस डायग्नोस्टिक सेंटरचे लोकार्पण आरएसएसचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, श्रीमती सरिता गंगाधरराव फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत श्री सिद्धिविनायक सेवा फाउंडेशन, नागपूर द्वारा निर्मित गंगाधरराव फडणवीस मेमोरियल डायग्नोस्टिक सेंटरचे आज नागपूर येथे लोकार्पण पार पडले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केले.  या डायग्नोस्टिक सेंटरच्या उभारणीसाठी आमदार संदीप जोशी आणि त्यांच्या संपूर्ण टीमने घेतलेल्या परिश्रमांचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी कौतुक केले. तसेच अल्पावधीत उभ्या राहिलेल्या केंद्राला स्व. गंगाधरराव फडणवीस यांचे नाव देण्यात आले असून वडिलांच्या कार्याचा आपल्या जीवनावर मोठा प्रभाव पडल्याचे आणि त्यांच्याकडून समाजकार्याची प्रेरणा मिळाल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, या डायग्नोस्टिक सेंटरमध्ये आरोग्य तपासण्यांसाठीची आधुनिक यंत्रसामग्री उपलब्ध असून लोकांना माफक दरात आरोग्यसेवा दिली जाणार आहे. तसेच राज...

मोठ्या संख्येने उपस्थित रहा....

इमेज
द्रोणाचार्य सेमी इंग्लिश स्कूल व पूजा प्राथमिक विद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे आज आयोजन परळी वैजनाथ | प्रतिनिधी द्रोणाचार्य सेमी इंग्लिश स्कूल व पूजा प्राथमिक विद्यालय, परळी वैजनाथ यांच्या वतीने २० वे वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले आहे. हे स्नेहसंमेलन आज  बुधवार, दि. ५ फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी ३.३० वाजता लोकनेते गोपीनाथराव मुंडे  नटराज रंग मंदिर, परळी वैजनाथ येथे संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रामलिंग राजनळे सर (माजी मुख्याध्यापक, वैद्यनाथ विद्यालय) राहणार असून उद्घाटन  गणेश गिरी (गटशिक्षणाधिकारी, गटसाधन केंद्र, परळी वै.) यांच्या हस्ते होणार आहे. या काकार्यक्रमास बाजीराव  भैय्या   धर्माधिकारी (माजी नगराध्यक्ष),  कोकणे  (विस्ताराधिकारी),  धनंजय ढोणे  (पोलीस निरीक्षक),  दिवाकर जोशी (गझलकार), प्रा. रविंद्र जोशी सर (पत्रकार,  दैनिक पुढारी),  व्यंकटेश शिंदे (नगरसेवक) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.           स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांचे नृत...
इमेज
  पूज्य गुरुदेव - राष्ट्रनिर्माण, मानवसेवा आणि सनातन धर्माचा तेजस्वी वारसा! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज हरिद्वार, उत्तराखंड येथे, पूज्य गुरूदेव श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरीजी महाराज यांच्या समाधी मंदिरात श्रीविग्रह मूर्ती स्थापना समारंभ येथे उपस्थिती दर्शविली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले की, स्वामी गोविंद देवगिरीजी महाराज यांनी सामान्य घरातून आलेल्या पूज्य गुरूदेव श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरीजी महाराज यांचा असामान्य व अद्भुत प्रवास सांगितला, जो खूप महत्त्वपूर्ण आहे.  पूज्य गुरूदेव श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरीजी महाराज यांनी अध्यात्माबरोबरच राष्ट्रनिर्माणासाठीच्या मूल्यांचा प्रचार व प्रसार केला. तसेच भारतमातेचे मंदिर उभारून पूज्य गुरूदेव श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरीजी महाराज यांनी सनातन धर्माच्या वेगवेगळ्या विचारांना एकत्र आणण्याचे कार्य केले, कारण विचार जरी अनेक असले, तरी संत त्यांना जोडण्याचे काम करतात, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.  पूज्य गुरूदेव श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरीजी महाराज यांनी समाजामधील दुजाभाव दूर करून सनातन धर्म एकजूट अ...
इमेज
  कै.डॉ. मंचकराव नरहरराव देशमुख यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त परळीत भव्य मोफत आरोग्य शिबिर परळी ( प्रतिनिधी).....        कै. डॉ. मंचकराव नरहरराव देशमुख यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त परळी वैजनाथ येथे दि. ८ व ९ फेब्रुवारी २०२६ (रविवार व सोमवार) रोजी सकाळी १० ते सायं. ५ वाजेपर्यंत भव्य मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर देशमुख अक्युपंचर सेंटर, देशमुख कॉम्प्लेक्स, गणेश पार, परळी वैजनाथ येथे होणार आहे. या शिबिरात नागरिकांसाठी विविध आजारांवर मोफत तपासणी व उपचार करण्यात येणार असून, विशेषतः अर्धांगवायू, पायांची नस दाबली जाणे, सांधेदुखी, मणक्याचे आजार, टाच दुखी, फ्रोजन शोल्डर, स्पॉन्डिलायटिस, सायटिका, कंबर व मानदुखी, डोकेदुखी, चक्कर येणे, स्नायू आखडणे, स्पोर्ट्स व लिगामेंट इजा, वजन कमी करणे, तसेच लहान मुलांचे टांग न धरणे व मतिमंद मुलांवरील उपचार करण्यात येणार आहेत. शिबिरात अक्युपंचर थेरपी, सुजोक थेरपी, कपिंग थेरपी (बोन सेटिंग), कायरोप्रॅक्टिक, अक्युप्रेशर व फिजिओ थेरपी अशा आधुनिक व प्रभावी उपचार पद्धती उपलब्ध असणार आहेत.या उपक्रमात डॉ. राहुल देश...

ना. पंकजाताई मुंडे, आ. धनंजय मुंडे यांच्यासह मान्यवरांची प्रमुख राहणार उपस्थिती

इमेज
  तळेगाव येथे बीड रोडवर नव्याने अत्याधुनिक होत असलेल्या नायरा पेट्रोलियम' संचलित 'वक्रतुण्ड पेट्रोलियम' या नवीन पेट्रोल पंपाचा आज होणार शुभारंभ  ना. पंकजाताई मुंडे, आ. धनंजय मुंडे यांच्यासह मान्यवरांची प्रमुख राहणार उपस्थिती वक्रतुण्ड पेट्रोलियम' या नवीन पेट्रोल पंपाचा आज होणार शुभारंभ कार्यक्रमास मोठ्या संखेने उपस्थित राहावे- सभापती सूर्यभान नाना मुंडे परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-  परळी वैजनाथ -तेलगाव- वडवणी- बीड राष्ट्रीय महामार्ग ३६१ एफ या महामार्गावर श्री गजानन एक्सट्रॅक्शन समोर वक्रतुण्ड पेट्रोलियम' या नवीन पेट्रोल पंपाचे बुधवार दिनांक 04 फेब्रुवारी रोजी सकाळी 11:00 वाजता  ना. पंकजाताई मुंडे, आ.धनंजय मुंडे यांच्यासह प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत शुभारंभ होणार आहे.  तरीशुभारंभ सोहळ्याला परळी व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सोहळ्याची शोभा वाढवावी, असे आवाहन" सूर्यभान (नाना) मुंडे आणि समस्त मुंडे परिवार,तळेगाव यांनी केले आहे.                   प्रभु वैद्यनाथांच्या कृपेने परळी वैजनाथ - तेलगाव...

अंबाजोगाई रस्त्यावर ढाकेफळ शिवारात अपघात

इमेज
  कारच्या धडकेत शिंदे सेने चे तालुका उपप्रमुख ठार  केज : प्रतिनिधी...... केज - अंबाजोगाई रस्त्यावर ढाकेफळ शिवारातील हॉटेल कारभारी समोर भरधाव कारने दुचाकीला जोराची धडक दिलेल्या या अपघातात दुचाकीवरील शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) केज तालुका उपप्रमुख चंद्रकांत शहाजी इंगळे (वय ५० रा. सादोळा) हे जागीच ठार झाल्याची घटना रविवारी (दि. १) सायंकाळी सहा वाजता घडली.        सादोळा (ता. केज) येथील चंद्रकांत शहाजी इंगळे (वय ५०) हे शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) केज तालुका उपप्रमुख होते. ते रविवारी पिसेगाव येथे रेणुका देवीच्या यात्रेत दर्शनासाठी गेले होते. दर्शन घेऊन पिसेगाव येथून परत सादोळा या गावी दुचाकीवरून (एम. एच. ४४ एसी ६९३१) निघाले होते. केज - अंबाजोगाई रस्त्यावर ढाकेफळ शिवारातील कारभारी हॉटेलसमोर अंबाजोगाई येथून अहिल्यानगरकडे जात असलेल्या भरधाव कारने (एम. एच. १६ डीसी ८८४७) त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात चंद्रकांत इंगळे हे जागीच ठार झाले. उत्तरीय तपासणीसाठी त्यांचा मृतदेह केज येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, भावजयी, दोन पुतणे अ...

दुःखद वार्ता: भावपूर्ण श्रद्धांजली....

इमेज
  माऊली चिकणे यांना मातृशोक: पार्वतीबाई चिकणे यांचे निधन परळी वैजनाथ, प्रतिनिधी....        येथील सर्वपरिचित वैद्यना गॅस एजन्सीचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर (माऊली) चिकणे यांच्या मातोश्री पार्वतीबाई बाबुराव चिकणे यांचे आज (दि. 2 फेब्रुवारी) रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्यू समयी त्या 95 वर्षे वयाच्या होत्या.          अतिशय मनमिळावू, कुटुंबवत्सल व चिकणे परिवाराच्या आधारवड म्हणून पार्वतीबाई चिकणे यांची ओळख होती. वयोमाना परत्वे त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात एक मुलगा  दोन मुली, सून ,नातवंडे असा मोठा परिवार आहे. दिवंगत पार्वतीबाई बाबुराव चिकणे यांच्या पार्थिवावर परळी वैजनाथ येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. चिकणे कुटुंबावर कोसळलेल्या या दुःखात एमबी न्यूज परिवार सहभागी आहे. 

नराधमाचे कुकर्म: नातीच्या वयाच्या चिमुकलीवर अत्याचार

इमेज
  नऊ वर्षीय बालिकेवर वयोवृद्धाचा अत्याचार  दिंद्रुड: चॉकलेट देतो म्हणून एका वयोवृद्ध इसमाने नऊ वर्षीय बालिकेवर अत्याचार केल्याची घटना दि.२८ रोजी  माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड पोलीस हद्दीतील एका वाडीत घडली. पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीवरून दिंद्रुड पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीस तात्काळ जेरबंद करत बीड जिल्हा कारागृहात त्याची रवानगी केली.         पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीनुसार,धारूर तालुक्यातील एका वाडीत एक शेतमजूर कुटुंब राहते, त्यांची इयत्ता चौथीत  शिकणारी नऊ वर्षीय मुलगी दि.28 रोजी सकाळी शाळेत जात असताना, मैत्रिणीला भेटण्यासाठी गेली, रस्त्यातच आरोपी बाबुराव केरबा निरडे याने तिला चॉकलेट देतो म्हणून घरात बोलावून घेतले. घराची कडी आतून लावून मुलीच्या अंगावरील सर्व कपडे काढून तिच्यावर अत्याचार केला, मुलगी ओरडत असताना ही तिची दया माया केली नाही, त्यानंतर मुलगी शाळेत गेली, घरी आल्यापासून ती शांत शांत राहत असल्याने दि.२९ रोजी आईने तिला विश्वासात घेऊन विचारले असता तिने घडलेली सर्व आपबिती सांगितली. दरम्यान या किळसदायक घटनेत दिंद...

२ फेब्रुवारीला छत्रपती संभाजीनगर तर ३ तारखेला लातूर ,सोलापूर जिल्ह्यात जाहीर सभा

इमेज
स्टार प्रचारक ना. पंकजाताई मुंडे यांचा उद्यापासून जि. प. निवडणूक प्रचारार्थ झंझावाती दौरा २ फेब्रुवारीला छत्रपती संभाजीनगर तर ३ तारखेला लातूर ,सोलापूर जिल्ह्यात जाहीर सभा मुंबई, दि. ०१--- राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी  स्टार प्रचारक तथा राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांचा उद्यापासून झंझावाती प्रचार दौरा सुरू होत आहे.  उद्या २ फेब्रुवारी रोजी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पाच  तर 3 फेब्रुवारीला रोजी लातूर जिल्ह्य़ात तीन व सोलापूर जिल्ह्यात दोन जाहीर सभा त्या घेणार आहेत.       जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये अधिकाधिक भाजपाचे उमेदवार निवडून आणण्याच्या दृष्टीने ना. पंकजाताई मुंडे यांच्या जाहीर सभांना ठिकठिकाणी प्रचंड मागणी आहे. त्या अनुषंगाने पक्षाच्या वतीने ना. पंकजाताई मुंडे यांच्या प्रचार दौऱ्याचे नियोजन करण्यात आले आहे.  02 फेब्रुवारी रोजी सकाळी विमानाने छत्रपती संभाजीनगर येथे जाणार असून तिथून दुपारी हेलिकॉप्टरने जिल्ह्यातील विविध जि....

विकसित भारताच्या दिशेने महत्वाचे पाऊल

इमेज
  पशुसंवर्धन क्षेत्रात रोजगार व उद्योजकतेला चालना देणारा  अर्थसंकल्प ना. पंकजा मुंडे यांनी केले केंद्रीय अर्थसंकल्पाचे स्वागत मुंबई, दि. १ -  केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला आजचा अर्थसंकल्प हा विकसित भारताच्या दिशेने टाकलेले एक महत्वाचे पाऊल आहे. केंद्रीय अर्थसंकल्पात कृषि व पशुसंवर्धन क्षेत्रासाठी करण्यात आलेल्या तरतुदी अत्यंत स्वागतार्ह असून या माध्यमातून ग्रामीण व निमशहरी भागात दर्जेदार रोजगारनिर्मितीला मोठी चालना मिळेल, अशी प्रतिक्रिया राज्याच्या पशुसंवर्धन व पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे यांनी दिली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पाचे मंत्री पंकजाताई मुंडे यांनी स्वागत केले आहे. यावर प्रतिक्रिया देताना त्या म्हणाल्या, पशुसंवर्धन क्षेत्रासाठी जाहीर केलेल्या सवलती, नवीन पशुवैद्यकीय महाविद्यालय, प्रयोगशाळा यामुळे देशातील पशुपालकांना मोठा लाभ होणार आहे. याबद्दल मी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे मी आभार मानते. पंकजाताई मुंडे म्हणाल्या की, जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये अग्...

सर्व स्तरातून अभिनंदन...

इमेज
  इस्रोच्या अभ्यास दौऱ्यासाठी समीक्षा यल्लावाड हिची निवड परळी , दि. ०१ / ०२ / २०२६ (प्रतिनिधी ) परळी तालुक्यातील वसंतनगरच्या उच्च माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी समीक्षा राजकुमार यल्लावाड हिची महाराष्ट्र शासनाच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय निवड परीक्षेत यश संपादन केल्यामुळे तिची इस्रो (भारतीय अंतराळ संशोधन संस्था) अभ्यास दौऱ्यासाठी निवड झाली आहे. या अभ्यास दौऱ्यासाठी संपूर्ण राज्यातून केवळ १०० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली असून, त्यामध्ये परळीतील समीक्षा राजकुमार यल्लावाड हिचा समावेश झाल्याने परिसरात आनंदाचे वातावरण आहे. समीक्षा यल्लावाड ही  उच्च माध्यमिक आश्रम शाळा, वसंतनगर येथे शिक्षण घेत आहे. तिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष संजयजी राठोड, सचिव रामेश्वर राठोड,महाविद्यालयाचे प्राचार्य अरुण पवार, माजी सरपंच डी एस राठोड, सरपंच विजय राठोड  याबरोबरच  प्रा.नागरगोजे सर, प्रा.देशमुख सर, प्रा.सुरनर सर, प्रा.परळीकर, प्रा.आगरे, प्रा.जाधव,सर प्रा.मोरे सर, स्वामी सर, गीते सर,राम राठोड सर ( प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक)  कै.लक्ष्मीबाई देशमुख शिक्षण...

पत्रकार संतोष जुजगर यांना पितृशोक

इमेज
  विष्णुअप्पा वामनअप्पा जुजगर यांचे अल्पशा आजाराने निधन  पत्रकार संतोष जुजगर यांना पितृशोक परळी वैजनाथ/ प्रतिनिधी .....परळी वैजनाथ येथील रहिवासी, सामाजिक धार्मिक कार्यात सक्रिय कार्यकरत होते विष्णुअप्पा वामनअप्पा जुजगर (वय ७८) यांचे अंबाजोगाई येथे अल्पशा आजाराने आज रविवार, दिनांक १ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता दुःखद निधन झाले. त्यांचा अंत्यविधी आज रविवार दिनांक १ फेब्रुवारी रोजी दुपारी ठीक २.०० वाजता अंबाजोगाई येथे करण्यात आला. तसेच राख साठवण्याचा विधी मंगळवार, दिनांक ३ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी 7.00 वाजता बोरुळ तलाव अंबाजोगाई येथे होणार आहे. स्व. विष्णुअप्पा जुजगर हे समाजहिताची जाण ठेवणारे, धार्मिक उपक्रमात सक्रिय सहभाग घेणारे व सर्वसामान्यांशी आपुलकीने वागणारे व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित होते.त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले — वामन (दादा) जुजगर व पत्रकार संतोष जुजगर, सुना, नातवंडे असा परिवार आहे. ते पत्रकार संतोष जुजगर यांचे वडील होत.

नुकतेच प्रदान झाले प्रमाणपत्र ;सर्व स्तरातून अभिनंदन

इमेज
सौ.अर्चना मधुकर गित्ते यांचे संशोधन क्षेत्रात घवघवीत यश; आंतरराष्ट्रीय पातळीवर डिझाइन नोंदणी यशस्वी परळी वैजनाथ | प्रतिनिधी      परळी वैजनाथ येथील संशोधक सौ. अर्चना मधुकर गित्ते यांच्या  संकल्पनेच्या डिझाइनला युनायटेड किंगडम इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ऑफिस (UK IPO) कडून अधिकृत डिझाइन नोंदणी (Registered Design) प्राप्त झाली आहे.   याबाबतचे डिझाईन नोंदणी प्रमाणपत्र त्यांना नुकतेच प्रदान करण्यात आले आहे. हे डिझाइन आंतरराष्ट्रीय डिझाइन वर्गीकरणांतर्गत नोंदणीकृत झाले आहे. सखोल अभ्यास, प्रयोग आणि तांत्रिक विश्लेषणातून विकसित झालेल्या या संकल्पनेमुळे मत्स्यपालन क्षेत्रातील स्वयंचलित खाद्य व्यवस्थापनास चालना मिळणार आहे. शैक्षणिक संशोधन केवळ प्रबंधापुरते मर्यादित न राहता त्याचे बौद्धिक संपदा हक्कांमध्ये (Intellectual Property Rights) रूपांतर होऊ शकते, याचे हे उत्तम उदाहरण ठरले आहे.या यशामुळे विद्यापीठीय संशोधन, नवोन्मेष आणि उद्योगाभिमुख अभ्यास यांतील दुवा अधिक मजबूत होत असून, पीएचडी विद्यार्थ्यांसाठी संशोधनाचे व्यावहारिक व जागतिक मूल्य अधोरेखित झाले आहे. शिक्षण क्षेत्रात...

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!

Accident.....

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!