सहुलत विना व्याजी पतसंस्थेच्या वार्षिक कॅलेंडरचे थाटात उद्घाटन
सावकारीचा संपूर्ण बहिष्कार करा ; युवकांनी व्याजापासून दूर राहा - मुफ्ती अश्फाक खासमी सहुलत विना व्याजी पतसंस्थेच्या वार्षिक कॅलेंडरचे थाटात उद्घाटन परळी/प्रतिनिधी परळी शहरातील शहीद अब्दुल हमीद शादीखाना येथे आज शनिवारी दिनांक २७ डिसेंबर रोजी सायंकाळी ६.३० वाजता सहुलत विना व्याजी पतसंस्थेच्या वार्षिक कॅलेंडरचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले. या प्रसंगी संस्थेच्या सामाजिक व सेवाभावी कार्याचा आढावा घेण्यात आला. स्थापनेपासून आजपर्यंत पतसंस्थेने शहरातील सुमारे ५,००० हून अधिक गरजू नागरिकांना विना व्याज कर्जपुरवठा केला असून, या लाभार्थ्यांमध्ये सर्व जाती-धर्मातील नागरिकांचा समावेश आहे. आर्थिक अडचणीत सापडलेल्या कुटुंबांना व्याजाच्या जोखडातून मुक्त ठेवून स्वावलंबी बनवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य ही संस्था करत आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी, मुफ्ती अश्फाक खासमी होतं तर प्रमुख पाहुणे मौलाना तैमुर मिल्ली होते. तर मंचावर उपस्थित जमाते इस्लामी हिंदचे परळी शहराध्यक्ष इफ्तेखार सर, पतसंस्थेचे चेअरमन अन्वर सर, महेबुबिया एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष खाजा मामू, सेक्रेटरी जाफर खान,मुखद...