पोस्ट्स

जानेवारी २५, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

ना. पंकजाताई मुंडे, आ. धनंजय मुंडे यांच्यासह मान्यवरांची प्रमुख राहणार उपस्थिती

इमेज
  तळेगाव येथे बीड रोडवर नव्याने अत्याधुनिक होत असलेल्या नायरा पेट्रोलियम' संचलित 'वक्रतुण्ड पेट्रोलियम' या नवीन पेट्रोल पंपाचा आज होणार शुभारंभ  ना. पंकजाताई मुंडे, आ. धनंजय मुंडे यांच्यासह मान्यवरांची प्रमुख राहणार उपस्थिती वक्रतुण्ड पेट्रोलियम' या नवीन पेट्रोल पंपाचा आज होणार शुभारंभ कार्यक्रमास मोठ्या संखेने उपस्थित राहावे- सभापती सूर्यभान नाना मुंडे परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-  परळी वैजनाथ -तेलगाव- वडवणी- बीड राष्ट्रीय महामार्ग ३६१ एफ या महामार्गावर श्री गजानन एक्सट्रॅक्शन समोर वक्रतुण्ड पेट्रोलियम' या नवीन पेट्रोल पंपाचे बुधवार दिनांक 04 फेब्रुवारी रोजी सकाळी 11:00 वाजता  ना. पंकजाताई मुंडे, आ.धनंजय मुंडे यांच्यासह प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत शुभारंभ होणार आहे.  तरीशुभारंभ सोहळ्याला परळी व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सोहळ्याची शोभा वाढवावी, असे आवाहन" सूर्यभान (नाना) मुंडे आणि समस्त मुंडे परिवार,तळेगाव यांनी केले आहे.                   प्रभु वैद्यनाथांच्या कृपेने परळी वैजनाथ - तेलगाव...

शरद पवार म्हणाले, कोण आहेत हे नरेश अरोरा ?

इमेज
अजितदादांच्या निधनानंतर  महाराष्ट्राच्या राजकारणात अचानकपणे चर्चेत आलेले कोण आहेत नरेश अरोरा? अ जित पवार यांच्यानंतर उपमुख्यमंत्रीपद कोणाला मिळणार याची चर्चा सुरू होती. यावेळी अनेक ज्येष्ठ नेत्यांची नावं घेतली जात असतानाच शुक्रवारी (30 जानेवारी) दिवंगत अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचं नाव समोर आलं.30 जानेवारीला दिवसभर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अनेक घडामोडी घडल्या. पक्षातील नेत्यांच्या बैठका झाल्या. उपमुख्यमंत्रिपदी कोणाची नेमणूक करायची याबाबत चर्चा झाली. त्यानंतर सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री होतील, असं सांगण्यात येऊ लागलं.याच दरम्यान निवडणूक रणनीतीकार नरेश अरोरा हेही बारामती येथे पोहोचले. त्यांनी सुनेत्रा पवार यांची भेट घेऊन सध्याच्या राजकीय घडामोडींवर चर्चा केल्याचे काही माध्यमांनी सांगितलं. या भेटीनंतर सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री होतील अशा बातम्या माध्यमांमध्ये येऊ लागल्या. हा निर्णय घेण्यात अरोरा यांची भूमिका काय होती हे कालांतराने स्पष्ट होईल. परंतु, महाराष्ट्राच्या सध्याच्या राजकीय घडामोडीत ते चर्चेचा विषय ठरले आहेत. कोण आहेत हे नरेश अरोरा ? नरेश अरोरा हे डिझ...

विशेष लेख: अजितदादांच्या आठवणी......

इमेज
परळीवर बारामती प्रमाणे प्रेम करणारे एक शिस्तबद्ध,  कर्मनिष्ठ नेतृत्व : स्व. अजितदादा पवार परळीचे माजी नगराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांच्या शब्दबद्ध उत्कट भावना   आ मच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार साहेब यांच्या श्रद्धांजलीपर सर्वपक्षीय शोकसभा परळी वैजनाथ नगरीमध्ये आज आयोजित करण्यात आली. यावेळी सभेसमोर अत्यंत वेदनादायी मनाने शोकप्रस्ताव सादर केला. निष्काम कर्मयोगी, कर्तव्यपरायण व निःस्वार्थ लोकसेवक राज्याचे उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा यांच्या जाण्याने महाराष्ट्राने एक कर्मनिष्ठ नेतृत्व गमावले आहे. परळी वैद्यनाथ नगरीचे आणि दादांचे नाते तसे जुनेच; मात्र आ. धनंजयजी मुंडे साहेबांमुळे अधिक दृढ झाले. सन २००९ मध्ये विधान परिषद निवडणुकीत विधानसभेतील आमदार सदस्यांचे कमी पडणारे मतदान स्व. दादांनी मिळवून दिले आणि धनुभाऊंचा आणि दादांचा ऋणानुबंध सुरू झाला. तद्नंतर नगर परिषद निवडणूक २०११ मध्ये आम्ही १२ सदस्यांनी अधिकृत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केला आणि दादांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी परिवारात आमचा प्र...
इमेज
  केज हादरलं :  पिंपरी शिवारात तरुणाचा खून केज :- केज तालुक्यातील हनुमंत पिंपरी शिवारात एकाचा खून करून प्रेत  हनुमंत पिंपरी येथील शिवारात टाकले आहे. केज तालुक्यातील हनुमंत पिंपरी येथील विक्की उर्फ आण्णा रावसाहेब चंदनशिव वय २५ वर्ष या युवकाचा खून करून प्रेत रस्त्यावर टाकले आहे. सकाळी १०:०० घटना उघडकीस आली आहे. मयताच्या गळ्यावर तीक्ष्ण हत्याराने वार केल्याने अतिरिक्त स्त्राव झाल्याने मृत्यू झाला आहे. पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. घटनास्थळी अप्पर पोलिस अधीक्षक चेतना तिडके साहेब पोलीस अधीक्षक व्यंकटेश राम, पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे, पोलीस निरीक्षक महेश क्षीरसागर, पोलीस उपनिरीक्षक उमेश निकम, पोलिस उपनिरीक्षक इनामदार, पोलिस उपनिरीक्षक अशोक सोनवणे हे हजर झाले आहेत.
इमेज
  गर्भगिरीच्या दरीत दोन मृतदेह सापडल्याने खळबळ कडा  :-आष्टी तालुक्यातील सावरगाव येथील प्रसिद्ध मच्छिंद्रनाथ देवस्थान(मायंबा) परिसरात गुरुवारी हृदयद्रावक आणि धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मच्छिंद्रनाथ गडावर देवदर्शनासाठी आलेल्या दोन भाविकांचे मृतदेह गडावरील खोल दरीत आढळून आले असून, यातील एका तरुणाचा केवळ सापळा उरला आहे, तर वृद्धाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला. ◆ सरपण वेचताना मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ ...      गडावरील खोल दरीत सरपण गोळा करण्यासाठी काही स्थानिक नागरिक गेले होते.दरीच्या दुर्गम भागात त्यांना मानवी अवशेष दिसताच त्यांनी गावात धाव घेऊन माहिती दिली.अंभोरा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक मंगेश साळवे यांनी पथकासह तातडीने घटनास्थळी धाव घेतली. दुर्गम भाग असल्याने पोलिसांनी मोठ्या शर्थीने हे मृतदेह बाहेर काढले ◆ कुटूंबियांना ओळख पटली अन् एकच आक्रोश       मयत निलेश नारायण घोंगरे (वय २६, रा.बेलापूर खुर्द,जि.अहिल्यानगर) हा महिनाभरापूर्वी गडावर दर्शनासाठी आला होता,पण तिथूनच तो बेपत्ता झाला होता.त्याच्या घरच्यांनी अंभोरा पोलिसात तक्रारही...

बीड जिल्ह्याचे पालकमंत्री महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना अभिवादन

इमेज
  31 जानेवारी रोजी मूकनायक दिन समारंभास उपस्थित रहावे - वैभव स्वामी  बीड जिल्ह्याचे पालकमंत्री महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना अभिवादन बीड, प्रतिनिधी....  वंचित, शोषित, पीडित,सामान्य घटकांचा आवाज होण्यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 106 वर्षापूर्वी मूकनायक हे पहिले वृत्तपत्र सुरू केले. या वृत्तपत्राच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून पत्रकार संघाच्या वतीने ज्येष्ठ समाजसेवक डी जी वानखेडे यांना मूकनायक 2026 या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमापूर्वी बीड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना अभिवादन करण्यात येणार आहे.या कार्यक्रमाला सर्व पत्रकार आणि आंबेडकर प्रेमी व अजित दादा पवार यांच्यावर प्रेम करणाऱ्या नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन पत्रकार संघाच्या वतीने प्रदेश संपर्कप्रमुख वैभव स्वामी यांनी केले आहे.  बीड येथील तुलसी संगणक कॉलेज सभागृह, आदर्श नगर,डीपी रोड, बीड येथे महामानव अभिवादन ग्रुप व महामानव सार्वजनिक वाचनालय बीड यांच्या संयुक्त विद्यमाने 31 जानेवारी रोजी मूकनायक दिन समारंभ ...
इमेज
  परळी वैजनाथ येथे ६ ते ८ फेब्रुवारी दरम्यान श्री संत गजानन महाराज प्रगट दिन सोहळ्याचे आयोजन परळी (प्रतिनिधी)...      दरवर्षी प्रमाणे याहिवर्षी संत श्रेष्ठ श्री गजानन महाराज प्रकट दिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. श्री संत गजानन महाराज विश्वस्त मंडळ विद्यानगर परळी च्या वतीने माघ वद्य पंचमी ६ फेब्रुवारी २०२६ पासून चरित्र पारायण सोहळा व हरिनाम सकिर्तनाचा त्रिदिवसीय कार्यक्रम होणार आहे. दैनिक धार्मिक कार्यक्रमा मध्ये पहाटे ४ ते ६ काकडा आरती, ७ ते १० चरित्र पारायन, १० ते १२ महिला भजनी मंडळ यांचे भजन, तर रात्री ८ ते ११ या वेळेत कीर्तन होणार आहेत.  दि. ६ फेब्रु. रोजी श्री ची पुजा, अभिषेक व सकाळी ८ ते १० पारायण नंतर १० ते १२ या वेळेत तपोवन महिला भजनी मंडळ यांचे भजन, तर रात्री ८ ते ११ या वेळेत ह.भ.प. श्री गोविंद महाराज, परळी वैजनाथ यांचे कीर्तन होणार आहे. ७ फेबु रोजी सकाळी श्री ची पुजा, अभिषेक व सकाळी ८ ते १० पारायण नंतर गजानन महाराज महिला भजनी मंडळ परळी वैजनाथ यांचे भजन, तर रात्री ८ ते ११ ह.भ.प. डॉ. नेरकर महाराज, परळी वैजनाथ  यांचे कीर्तन तर उत्सव सोहळा सांगता ...

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती परळी शाखेची नूतन कार्यकारणी जाहीर

इमेज
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती परळी शाखेची नूतन कार्यकारणी जाहीर अध्यक्षपदी नवनाथ दाने, कार्याध्यक्ष अशोक मुंडे तर प्रधान सचिव विकास वाघमारे यांची निवड परळी प्रतिनिधी.......महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती,शाखा परळीच्या अध्यक्षपदी नवनाथ दाने यांची यांची तर कार्याध्यक्ष पदी अशोक मुंडे आणि प्रधान सचिव म्हणून पत्रकार विकास वाघमारे यांची निवड करण्यात आली आहे.       महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा परळीची 2026 या नुतन वर्षाची कार्यकारणी नुकतीच निवडण्यात आली. परळी येथील जिजामाता उद्यान येथे शिक्षक नेते पी.एस.घाडगे सर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या बैठकीत जिल्हा प्रधान सचिव पत्रकार सुकेशनी नाईकवाडे, अंनिस चे जेष्ठ सदस्य रानबा गायकवाड,प्रा.दासू वाघमारे सर, जेष्ठ पदाधिकारी प्रा.विलास रोडे सर ,जिल्हा सोशल मीडिया व्यवस्थापन विभाग प्रमुख पत्रकार संजीब राॅय सर ,वंचित चे जिल्हा सचिव मिलिंद घाडगे आदी उपस्थित होते.     यावेळी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या नुतन कार्यकारणी मध्ये अध्यक्ष पदी नवनाथ दाने, उपाध्यक्ष रतन उजगरे, महादेव आजले, कार...

थेट बारामतीतील चित्रांकन वृत्तांतच आता पक्क्या बारामतीकर झालेल्या परळीच्या एका लेकीने मांडला

इमेज
दादा गेल्याचे मन मानायला तयार होईना, रात्रभर सर्वसामान्य बारामतीकरांना झोप नाही ! परळी - उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाचे वृत्त किती तीव्र धक्कादायक होते, याचा प्रत्यय सर्वसामान्य बारामतीकरांच्या भावना ऐकल्यानंतर आला. दादा हयात नाही, यावर विश्वासच बसत नसून, मन वास्तव स्वीकारायला तयार होत नाही.  केवळ डाळ-भात (वरणभात) शिजवूनच अनेकांनी दिवस काढला. तर रात्रभर प्रत्येक गल्ली, काॅलन्यांमधील बारामतीकरांच्या डोळ्याला डोळा लागलेला नव्हता. असे शोकमग्न वातावरण अजित दादांच्या निधनाचे वृत्त धडकल्यापासून ते अंत्यविधीचे सोपस्कार पार पडेपर्यंत होते. आणि पुढचेही काही दिवस बारामती शोकाकूलच असेल, असा चित्रांकन वृत्तांतच आता पक्क्या बारामतीकर झालेल्या परळीच्या एका लेकीने मांडला आहे. संगीता नाईक, असे त्यांचे नाव आहे. अध्यापनाच्या क्षेत्रात ज्ञानदानाचे कार्य करणाऱ्या संगीता नाईक या मूळच्या परळीच्या आहेत. त्या माहेरच्या देवज्ञे आहेत. जुन्या परळीतील सावता महाराज मंदिर परिसर, गणेशपार भागात बालपण गेलेल्या संगीता नाईक-देवज्ञे या आता मागील २५-३० वर्षांपासून बारामतीत वास्तव्यास आहेत. अजित पवार ...

सायंकाळी ५ वाजता लोकनेते गोपीनाथराव मुंडे नटराज रंगमंदिर येथे सर्वपक्षीय शोकसभा

इमेज
  परळीत उद्या स्व. अजितदादा पवार यांच्या सर्वपक्षीय शोकसभेचे आवाहन सायंकाळी ५ वाजता लोकनेते गोपीनाथराव मुंडे नटराज रंगमंदिर येथे सर्वपक्षीय शोकसभा परळी वैद्यनाथ (प्रतिनिधी) - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या अकाली निधनानंतर परळी वैद्यनाथ येथे आज सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले असून सायंकाळी ५ वाजता लोकनेते गोपीनाथराव मुंडे नटराज रंगमंदिर येथे या शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे. स्व. अजितदादा पवार यांचे अत्यंत निकटवर्तीय असलेल्या धनंजय मुंडे यांच्या परळी मतदारसंघावर अजितदादांनी प्रचंड प्रेम केले. परळीच्या वैद्यनाथ ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत विकास आराखड्यास पाच पट मान्यता देऊन निधी उपलब्ध करून दिला. अनेक कार्यक्रम व राजकीय सभांच्या निमित्ताने अजितदादा परळी शहरात अनेकवेळा येऊन गेले, त्यामुळे परळीकरांचे स्व. अजित दादांशी अतूट व भावनिक नाते होते.  त्यांच्या दुर्दैवी अकाली निधनानंतर सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले असून स्व. अजितदादा यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तसेच त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सर्...

अजितदादांचे निधन, तीन दिवस शासकीय दुखवटा व प्रचाराला मिळालेला कमी वेळ यामुळे निर्णय?

इमेज
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांच्या तारखा बदलल्या; आता 'या' तारखेला मतदान राज्याचे  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्य शासनाने बुधावारी शासकीय सुट्टी जाहीर केली होती. शिवाय तीन दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर केला होता. त्यामुळे निवडणुकांचं कामकाज आणि प्रचाराला वेळ मिळावा, यासाठी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या तारखा बदलण्यात आलेल्या आहेत. हाती आलेल्या माहितीनुसार, ५ फेब्रुवारी रोजी होणारी मतदानाची प्रक्रिया आता ७ फेब्रुवारी रोजी होणार आहे. तर मतमोजणी ९ फेब्रुवारी रोजी पार पडेल. एवढा बदल निवडणूक आयोगाकडून करण्यात आलेला आहे. राज्यामध्ये १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुका होत आहेत. बुधवारी अर्ज माघारी घेण्याचा अखेरचा दिवस होता. पूर्वी प्रचारासाठी सात दिवसांचा वेळ मिळणार होता, परंतु दुर्दैवी घटनेमुळे आणि शासकीय दुखवट्यामुळे तो वेळ चार दिवसांचा मिळाला असता. त्यामुळे दोन दिवस निवडणूक कार्यक्रम पुढे ढकलण्यात आलेला आहे.

करियर मार्गदर्शन.......

इमेज
  इंदपवाडीच्या जिल्हा परिषद शाळेत पोलीस निरीक्षक मझहर अली यांचे मार्गदर्शन परळी वैजनाथ, प्रतिनिधी... ध्येय गाठायचं असेल तर खडतर मेहनत घेण्याशिवाय पर्याय नसतो असा मोलाचा सल्ला देत परळी ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मजहर अली  यांनी विद्यार्थ्यांना दहावी बारावीनंतरच्या करिअरच्या वाटा संदर्भात मार्गदर्शन केले.  जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इंदपवाडी या ठिकाणी आज परळी ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मझहर अली  यांनी भेट देऊन इयत्ता सहावी, सातवीतील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. प्रत्येक विद्यार्थिनीला आणि विद्यार्थ्यांना आपलं ध्येय विचारत त्यांनी त्या वाटेवर जाण्यासाठी काय मेहनत घ्यावी लागेल याची माहिती देत प्रोत्साहन दिले.  शालेय वयातच आपले ध्येय निश्चित करून त्या वाटेवर जाण्यासाठी आजपासूनच मेहनत करणे आवश्यक आहे असे पुढे ते म्हणाले. याच अनुषंगाने बोलताना पुढे ते म्हणाले की आपल्याला गुड टच आणि बॅड टच यातील फरक कळला पाहिजे. या वर्गातील मुलींशी बोलताना त्यांनी आठवणीने सांगितले की तुम्हाला पूर्णपणे संरक्षण देण्याची जबाबदारी पोलिसांची आहे, कुठेही अडचण आली तर पोलि...

ओंकार साखर कारखान्याकडून आवाहन...

इमेज
  ऊस वाहतुकीच्या वाहनांना रिफ्लेक्टर बसवा : अपघात टाळा   सहायक मोटार वाहन निरीक्षक ऐश्वर्या संजय कराड व ओंकार साखर कारखान्याचे जनरल मॅनेजर  वैभव व्ही. काशीद यांचे आवाहन परळी वै. ,प्रतिनिधी...      पांगरी येथील ओंकार साखर कारखाना – युनिट क्रमांक ८ व उपप्रादेशिक परिवहन कार्यालय अंबाजोगाई यांच्या संयुक्त विद्यमाने रस्ता सुरक्षा अभियान २०२६ अंतर्गत रस्ता सुरक्षाविषयक जनजागृती व मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हर्षल डाके  (उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अंबाजोगाई) , ए. जी. शेख (मोटार वाहन निरीक्षक अंबाजोगाई) यांचे मार्गदर्शनाखाली सहायक मोटार वाहन निरीक्षक ऐश्वर्या संजय कराड यांनी तोडणी – वाहतूक ठेकेदार, वाहन चालक यांना मार्गदर्शक सूचना दिल्या. यामध्ये प्रामुख्याने मुख्य रस्त्यावर ऊस भरलेले वाहन उभे करू नये, मोठ्या आवाजात म्युझिक सिस्टीम लाऊन वाहन चालवू नये, तसेच दारू किंवा इतर नशापान करून वाहन चालवू नये. याप्रमाणे सूचना देण्यात आल्या.       या कार्यक्रमात ऊस वाहतूक ठेकेदार, ऊस वाहतूक करणारे वाहन चालक , बैलगाडी चालक , साखर क...

शिरसाळा परिसरात खळबळ...

इमेज
  सिरसाळा येथे पैशाच्या वादातून दिले ढकलून; एकाचा मृत्यू; आरोपी ताब्यात परळी वैजनाथ, एमबी न्यूज वृत्तसेवा.....        सिरसाळा येथे पैशाच्या वादातून झालेल्या धक्काबुक्कीत एका 40 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संजू गंगाराम उबदे (वय 40, रा. शिरसाळा) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.       सायलू रामलू पस्तमवाड व गंगा पस्तमवाड (दोघेही रा. सिरसाळा) यांनी संजू उबदे याला पाठीवर जोरदार धक्का दिला. त्यामुळे संजू उबदे हा तोल जाऊन तोंडावर पडला आणि गंभीर जखमी झाला. उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणातील सायलू रामलू पस्तमवाड याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. उसणे दिलेल्या पैशांच्या वादावरून संजू उबदे, सायलू पस्तमवाड आणि गंगा पस्तमवाड यांच्यात जोरदार वाद झाला आणि त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. यातूनच एकाचा मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच सीरसाळा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.  पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे सीरसाळा परिसरात खळबळ उडाली आहे.

सायबर पोलिस ठोकणार बेड्या!

इमेज
धनंजय मुंडेंच्या नावाने फेसबुकवर बनावट खाते काढणे पडणार महागात फेसबुकवर धनंजय मुंडेंच्या नावाने बनावट खाते काढून आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या विरोधात फिर्याद दाखल बीड (प्रतिनिधी) - माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांच्या नावाने फेसबुक या सोशल मीडिया साईटवर खोटे अकाउंट काढून त्यावरून आक्षेपार्ह पोस्ट करण्यात आल्याने धनंजय मुंडे यांच्या वतीने संबंधित फेक अकाउंट विरोधात रीतसर कायदेशीर फिर्याद दाखल करण्यात आली आहे. संबंधित फेक खाते काढणाऱ्या व्यक्तीस आता ही चांगलेच महागात पडणार असून, सायबर पोलिस संबंधितास गुन्हा दाखल करून बेड्या ठोकणार आहेत.     धनंजय मुंडे हे सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात, मात्र त्यांच्या नावाने फेसबुकवर (Dhanajay Munde) खोटे अकाउंट काढून त्यावरून काही आक्षेपार्ह पोस्ट करण्यात आल्याने बीड सायबर पोलिसात धनंजय मुंडे यांच्या सूचनेवरून स्वीय सहाय्यक तथा खाजगी जनसंपर्क अधिकारी सुदर्शन (सुधीर) सांगळे यांनी रीतसर फिर्याद दिली आहे. सदर फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात येणार असून संबंधितास अटक करण्यासाठी पुढील तपास सायबर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक श्री. निलेश केळे करीत आहे...

भावपूर्ण श्रद्धांजली.....!

इमेज
महाराष्ट्राचे दादा गेले. ......! परळी वैजनाथ,अनंत कुलकर्णी          राज्याचे उपमुख्यमंत्री आणि सर्वात धडाडीचे नेते म्हणून प्रचलित असलेले आणि दिवसाची सुरुवात पहाटे करून अवघ्या आपल्या महाराष्ट्राला एक आदर्श घालून देणारे महाराष्ट्राचे दादा व्यक्तिमत्व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज (२८ जानेवारी) बारामतीमध्ये विमान अपघातात निधन झाले. आज (२८ जानेवारी) सकाळी बारामती दौ-यासाठी निघताना अजित पवार यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला. विमान लँडिग होतानाच अपघातग्रस्त झाले. अपघातानंतर विमानाचे अक्षरश: तुकडे झाले होते. विमानाची स्थिती पाहूनच कोणीही वाचू शकणार नाही अशी माहिती समोर येत होती. अवघ्या काही वेळातच अजित पवार यांच्या निधनाची बातमी समजताच अवघा महाराष्ट्र शोकसागरात बुडाला. विमान लाँडिंग होत असतानाच अपघात राज्यामध्ये पंचायत समित्या आणि जिल्हा परिषद निवडणुकीसाठी रणधुमाळी सुरू आहे. आज अजित पवार यांचा बारामती दौरा होता. या बारामती दौ-यासाठी आज सकाळी बारामतीसाठी त्यांनी प्रस्थान केले होते. बारामतीमध्ये विमान लाँडिंग होत असतानाच विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने विमान अपघात...

' अनंतपुत्र ' अनंतात विलीन....!

इमेज
अजित पवार यांच्यावर बारामतीमध्ये मंत्रोच्चारात विधिवत अंत्यसंस्कार, नेते आणि कार्यकर्त्यांनी वाहिली श्रद्धांजली अजित पवार यांचं काल सकाळी ( 28 जानेवारी) विमान अपघातात निधन झालं. आज सकाळी 9.50 वाजता त्यांच्या अंत्ययात्रेस काटेवाडी येथून सुरुवात झाली.  त्यांचे पार्थिव बारामती येथे विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात 11 वाजता अंत्यसंस्कारासाठी आणण्यात आले. त्यांचे पुत्र पार्थ आणि जय यांनी त्यांच्यावर मंत्रोच्चारात व विधिवत अंत्यसंस्कार केले. अजित पवार यांच्या अंत्यसंस्कार प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे सर्व पवार कुटुंबीय, मंत्री तसेच विविध पक्षाचे नेते, आमदार, कार्यकर्तेही उपस्थित होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज ठाकरे व उद्धव ठाकरे तसेच मंत्रिमंडळातील इतर सदस्य बारामतीमध्ये उपस्थित होते.        काल बारामती विमानतळावर उतरताना धावपट्टीजवळच विमानाला अपघात झाला....
इमेज
'दादांना भेटायला जायचंय' म्हणत दादांच्या आईंची पायीच धाव; काळीज हेलावणारा प्रसंग.. बारामती: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मुंबईहून बारामतीकडे येत असताना विमानतळाजवळ झालेल्या भीषण विमान अपघातात दुःखद निधन झाले. या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला असून, बारामतीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान, अजितदादांच्या निधनाचे वृत्त समजल्यानंतर त्यांच्या मातोश्रींची झालेली अवस्था पाहून उपस्थित सर्वांचे डोळे पाणावले. सकाळी साडेआठच्या सुमारास टीव्हीवर अपघाताची बातमी झळकताच, फार्म हाऊसवरील कर्मचाऱ्यांची धावपळ उडाली. त्यावेळी दादांच्या आई टीव्ही पाहत होत्या. "अरे, दादांचा अपघात झालाय का?" अशी विचारणा त्यांनी केली. मात्र, सत्य समजल्यास त्यांना मोठा धक्का बसेल, या भीतीने व्यवस्थापक संपत धायगुडे यांनी तातडीने टीव्हीची केबल कापली आणि आईंचा मोबाईलही फ्लाईट मोडवर टाकला. आईंना केवळ किरकोळ खरचटल्याचे सांगून धीर देण्याचा प्रयत्न कर्मचाऱ्यांनी केला. मात्र, लेकाच्या काळजीपोटी त्या व्याकुळ झाल्या आणि "मला दादाला भेटायला घेऊन चला" असे म्हणत फार्म हाऊस...

समीर येळंबकर, ठाणे यांचा विशेष लेख...

इमेज
  ग्रामीण माणुसकीचा दरारा हरपला : अजित दादांना भावपूर्ण श्रद्धांजली आजच्या दुर्दैवी विमान अपघातात अजित दादा आपल्यातून गेले. काळाने राज्यातील एका उमद्या, कणखर आणि स्पष्टवक्त्या नेत्याला आपल्यातून हिरावून नेले आणि संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली. शरद पवार साहेबांसारख्या दिग्गज नेत्यांचे पुतणे असल्यामुळे राज्याचे व्यापक राजकारण, नेते, प्रशासन व्यवस्था, सामान्य जनता आणि त्यांच्या प्रश्नांचा अनुभव त्यांना लहानपणापासूनच जवळून घेता आला. त्यामुळे राजकारणात आल्यानंतर पक्षात आणि नेतृत्वात लवकर स्थान मिळणे शक्य झाले, हे खरे असले तरी पुढे त्यांनी केवळ वारसा म्हणून नव्हे, तर मेहनत, कष्ट आणि ठाम भूमिकेच्या बळावर स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली. काकांमुळे संधी मिळाली, पण जेव्हा एखाद्या विषयावर पक्षाची भूमिका मनाला पटली नाही, तेव्हा त्यांनी ती निर्भीडपणे मांडली. अगदी शेवटी काकांपासून वेगळे होण्याचा कठीण निर्णय घ्यावा लागला, तरीही त्यांनी मनाविरुद्ध, न पटणारे काम कधीच केले नाही. स्वतःला न पटणारी कामे त्यांनी रोकठोक नाकारली. ज्यांच्याशी विचार जुळत नाहीत, त्यांच्याशी अनावश्यक जवळीक ठेवण्याची भूम...

धनंजय मुंडेंच्या स्वीय सहाय्यकांनी जागवली दादांची अविस्मरणीय आठवण....!

इमेज
पगार नव्हे, आत्मसन्मान वाढवणारा नेता अजित दादांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणातील एक धगधगतं पर्व संपलं आहे. प्रशासनावर मजबूत पकड असलेला, कडक शिस्तीचा हा नेता आतून किती हळवा आणि माणुसकी जपणारा होता, याचा प्रत्यय आम्हाला २०१२ साली आला. त्यावेळी आम्ही आमदारांचे स्वीय सहाय्यक (PA) म्हणून नुकतेच रुजू झालो होतो. केवळ ७,८२५ रुपये इतक्या तुटपुंज्या मानधनावर घर चालवणं अवघड होतं. पगारवाढीचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. ही फाईल जेव्हा अजित दादांकडे आली, तेव्हा त्यांनी जे केलं, ते केवळ दादाच करू शकतात! विधिमंडळाच्या लॉबीमध्ये सचिवांनी अवघ्या २ ते २.५ हजार रुपयांच्या वाढीचा प्रस्ताव मांडला होता. तो प्रस्ताव ऐकताच दादा त्यांच्या खास शैलीत कडाडले – “अरे, १० हजारात काय होतं? ही पोरं कुठे जाणार? थेट १५ हजारांचा प्रस्ताव द्या!” एका क्षणात आमचा पगार दुप्पट झाला. पण त्याहून मोठी गोष्ट म्हणजे, त्या निर्णयाने आम्हाला जगण्याचा आत्मविश्वास आणि कामाचा आत्मसन्मान मिळाला. दादांचं दातृत्व इथेच थांबलं नाही.फडणवीस सरकारच्या काळात सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी वेतन २५ हजार रुपये केलं.महाविकास आघाडी सरका...
इमेज
 "अजितदादा अमर रहे" च्या घोषणा; अजितदादांच्या निधनाने शहरावर शोककळा : परळीत शाळा, बाजारपेठा बंद परळी वैजनाथ: एमबी न्यूज वृत्तसेवा....        महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या विमान अपघातातील निधनाची वार्ता धडकताच परळी शहरासह ग्रामीण भागात भीषण शांतता पसरली.  गेल्या १५ वर्षांपासून परळीच्या विकासात आणि राजकारणात अविभाज्य घटक राहिलेल्या अजितदादांच्या जाण्याने परळी पोरकी झाल्याची भावना व्यक्त होत आहे. या अनुषंगाने परळीची बाजारपेठ स्वयंस्फूर्तीने बंद ठेवण्यात आली. तसेच सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मध्यवर्ती चौकात एकत्रित येत "अजितlदादा पवार अमर रहे" च्या घोषणा देत भावपूर्ण श्रद्धांजलीही अर्पण केली. बाजारपेठा आणि शाळा बंद; शहर झाले शोकाकुल...   अजितदादांच्या निधनाचे वृत्त समजताच परळीतील व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने दुकाने बंद ठेवली, तर शाळांनाही सुट्टी देण्यात आली. शहरातील राणी लक्ष्मीबाई टॉवर चौकात जमलेल्या सर्वपक्षीय पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या डोळ्यांत पाणी होते. भाजप, राष्ट्रवादी आणि...

हातातील ते घड्याळ पाहताच अधिकारीही रडले

इमेज
  शेवटी हातातील 'घड्याळ' हीच ठरली अजितदादांची शेवटची ओळख!  ajit pawar died in plane crash: बारामती येथे झालेल्या भीषण विमान अपघातात मृतदेहांची ओळख पटवणेही कठीण झाले होते, अखेर हातातील घड्याळावरून अजित दादांची ओळख पटल्याचे समोर आले आहे. बारामती : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पाच जणांचा आज सकाळी बारामती येथे झालेल्या भीषण विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघाताने संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून बारामतीसह राज्यावर शोककळा पसरली आहे. अत्यंत भीषण असलेल्या या अपघातात मृतदेहांची ओळख पटवणेही कठीण झाले होते, अखेर हातातील घड्याळावरून अजित दादांची ओळख पटल्याचे समोर आले आहे. घड्याळावरून पटली ओळख अपघात इतका भीषण होता की मृतदेहांची अवस्था पाहून उपस्थितांचा थरकाप उडाला. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून १५-२० मिनिटांत आग आटोक्यात आणली. मृतदेहांचे चेहरे ओळखता येत नव्हते, एक मृतदेह पूर्णपणे जळालेला आणि सुजलेला होता. मात्र, त्या मृतदेहाच्या हातातील घड्याळावरून हा मृतदेह उपमुख्यमंत्री अजित पवार यांचाच असल्याचे पोलीस आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना स्पष्ट झाले. योगायोगाने, 'घड्याळ' ...

CM फडणवीस म्हणाले, 'दिलदार मित्र गेला...'

इमेज
  Ajit Pawar Death: शासकीय सुट्टीसह राज्यात 3 दिवसांचा दुखवटा!   देवेंद्र फडणवीस यांनी शोक व्यक्त करत लोकनेता हरवल्याची भावना व्यक्त केली आहे. तसेच राज्यामध्ये आज शासकीय सुट्टीसह तीन दिवसांचा दुखवटाही जाहीर करण्यात आला आहे.  राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात दुःखद निधन झाले आहे. अजित पवार यांच्या निधनाने अवघा महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे. अजित पवार यांच्या मृत्यूनंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोक व्यक्त करत लोकनेता हरवल्याची भावना व्यक्त केली आहे. तसेच राज्यामध्ये आज शासकीय सुट्टीसह तीन दिवसांचा दुखवटाही जाहीर करण्यात आला आहे.  दिलदार, दमदार मित्र गेला.. "अजित पवार महाराष्ट्रातले लोकनेते होते, महाराष्ट्राच्या प्रश्नांची जाण असलेले नेते होते. अशा प्रकारचे नेतृत्व तयार व्हायला अनेक वर्ष लागतात. त्यांचं निघून जाणं हे अविश्वसनीय आहे, मनाला चटका लावणारे आहे. माझ्यासाठी वैयक्तिक एक दमदार आण दिलदार मित्र सोडून गेला आहे. मी आणि एकनाथ शिंदे लवकरच बारामतीला निघणार आहोत. पंतप्रधान,गृहमंत्री यांच्याी चर्चा करून त्यांनाही घडलेल्या घटनेची क...

मान्यवरांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलनाने भव्य प्रारंभ

इमेज
विवेकवर्धिनी प्राथमिक विद्यालयात ‘कला अविष्कार’ स्नेहसंमेलनाने शारदानगर दुमदुमले! परळी वैजनाथ (प्रतिनिधी) : समर्थ शिक्षण प्रसारक मंडळ, परळी वैजनाथ संचलित विवेकवर्धिनी प्राथमिक विद्यालय, शारदानगर येथे आयोजित ‘कला अविष्कार’ वार्षिक स्नेहसंमेलन २०२६ कार्यक्रम उत्साह, आनंद आणि सांस्कृतिक चैतन्याच्या वातावरणात मोठ्या दिमाखात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलनाने करण्यात आली. या स्नेहसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी परळी नगरपालिकेच्या नगराध्यक्षा सौ. पद्मजाताई बाजीराव धर्माधिकारी या होत्या. कार्यक्रमादरम्यान विविध मान्यवरांचा सन्मान सोहळा मोठ्या आदरातिथ्याने पार पडला. अध्यक्ष सौ. पद्मजाताई बाजीराव धर्माधिकारी यांचा सत्कार श्रीमती मुंडे मॅडम यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी सौ. प्राजक्ताताई श्रीकृष्ण कराड यांचा सत्कार श्रीमती साखरे मॅडम यांनी केला, तर सौ. माधुरीताई योगेश मेनकुदळे यांचा सत्कार श्रीमती बरेवाड मॅडम यांच्या हस्ते करण्यात आला. नगरसेवक श्री. महादेव रोडे यांचा सत्कार संस्थेचे प्रशासकीय संचालक श्री. संजय कराड सर या...

अशी आहे समित्यांची रचना: कोणाचा कोणत्या समितीत समावेश....

इमेज
परळी वैजनाथ नगरपरिषद स्थायी समिती व विविध विषय समित्यांच्या निवडी सभापती निवडीत भाजपचा वरचष्मा; पाच पैकी तीन सभापती भाजपाचे परळी वैजनाथ , प्रतिनिधी....       नगरपरिषदेच्या स्थायी समितीची रचना व निवड आज करण्यात आली. त्याचबरोबर नगर परिषदेच्या अन्य पाच विषय समित्यांच्या सभापतींची निवड व समित्यांची रचनाही आज करण्यात आली. सभापती पदाच्या निवडीत उपनगराध्यक्ष पद राष्ट्रवादीला सोडल्यानंतर भाजपाचा वरचष्मा दिसून आला आहे. एकूण पाच विषय समित्यांपैकी तीन विषय समित्यांवर भाजपाचे सभापती विराजमान झाले आहेत. तर अन्य दोन समित्यांमध्ये एक राष्ट्रवादीच्या तर एक शिवसेनेच्या वाट्याला सभापती पद देण्यात आले आहे.            परळी वैजनाथ नगर परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा, रिपाई, शिवसेना व मित्रपक्ष महायुतीची एकहाती सत्ता आहे. या अनुषंगाने उपनगराध्यक्ष पदाच्या निवडी वेळी भाजपाच्या वाट्याला उपनगराध्यक्ष पद येणार असे अपेक्षित असताना अनपेक्षितपणाने उपनगराध्यक्ष पदावर राष्ट्रवादीच्या नगरसेविकेला संधी देण्यात आली होती. त्यामुळे विविध विषय समित्यांच्या सभापती पदाची व...

असा असेल समित्या व सभापती निवडीचा निवडणूक कार्यक्रम......

इमेज
  परळी वैजनाथ नगरपरिषदेच्या स्थायी समिती, विषय समित्या व सभापती पदांच्या उद्या होणार निवडी परळी वैजनाथ, प्रतिनिधी....      परळी वैजनाथ नगरपरिषदेच्या स्थायी समिती, विषय समित्या व सभापती पदांच्या २७ रोजी निवडी होणार आहेत. याबाबतचा निवडणूक कार्यक्रम जिल्हाधिकारी यांनी जाहीर केला आहे. परळी वैजनाथ नगर परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेस व महायुतीची एकहाती सत्ता आहे. नगराध्यक्षा,उपनगराध्यक्षा राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत. त्यामुळे या निवडीत भाजपच्या हिश्शाला किती सभापतीपदे येणार तसेच कोणाकोणाची सभापती पदी वर्णी लागणार याची आता सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.         नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ मध्ये निवडून आलेल्या परळी वैजनाथ नगरपरिषदेच्या सदस्यांची नावे दिनांक २३.१२.२०२५ रोजी शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आलेली आहेत. तसेच परळी वैजनाथ नगरपरिषदेची पहिली सर्वसाधारण सभा दिनांक १५/०१/२०२६ रोजी पार पडली असुन या सभेमध्ये उपाध्यक्ष यांची निवड व नामनिर्देशित सदस्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. परळी वैजनाथ नगरपरिषद ही ''ब" वर्ग नगर...

भावपूर्ण श्रद्धांजली....

इमेज
  दुःखद वार्ता: दत्तात्रय जबदे यांना मातृशोक; शांताबाई जबदे यांचे निधन  परळी वैजनाथ, प्रतिनिधी....       येथील नांदूरवेस गल्लीतील सर्व परीचित दत्तात्रय  यांच्या आई श्रीमती शांताबाई विनायकराव जबदे  यांचे वृद्धापकाळाने आज दि. 26 जानेवारी रोजी सायंकाळच्या सुमारास निधन झाले. मृत्यूसमयी त्या 86 वर्षे वयाच्या होत्या.         स्व. शांताबाई जबदे या कुटुंबवत्सल, मनमिळावू, शांत व धार्मिक प्रवृत्तीच्या होत्या. वयोमानापरत्वे 86 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात एक मुलगा, दोन मुली,सून,नातवंडे असा  परिवार आहे. त्यांच्या निधनाने जबदे कुटुंबाचा आधारवड कोसळला आहे. जबदे कुटुंबावर कोसळलेल्या या दुःखात एमबी न्यूज परिवार सहभागी आहे.  आज अंत्यसंस्कार     दरम्यान, दिवंगत शांताबाई विनायकराव जबदे यांच्या पार्थिवावर मंगळवार दिनांक 27 जानेवारी रोजी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. सकाळी दहा वाजता नांदूरवेस गल्ली येथील जबदे यांच्या निवासस्थानापासून अंत्ययात्रा निघणार आहे.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....