पोस्ट्स

ऑक्टोबर १९, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

डाॅ. संपदाला न्याय मिळवून देऊ- पंकजा मुंडे

इमेज
ना. पंकजा मुंडे यांनी कवडगाव येथे जाऊन डाॅ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाची घेतली भेट आई-वडिलांना दिला आधार; मी तुमच्या पाठिशी खंबीर, डाॅ. संपदाला न्याय मिळवून देऊ बीड।दिनांक २५। सातारा जिल्ह्यातील फलटण उप जिल्हा रुग्णालयात कार्यरत असणाऱ्या डाॅ. संपदा मुंडे यांचा मृत्यू अतिशय वेदनादायी आहे, मी तुमच्या पाठिशी खंबीरपणे उभी आहे, डाॅ संपदाला न्याय मिळवून देऊ अशा शब्दांत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी डाॅ संपदाच्या आई-वडिलांचे सांत्वन करत धीर दिला. डाॅ. संपदा मुंडे हया वडवणी तालुक्यातील कवडगावच्या रहिवासी असून सातारा जिल्ह्यातील फलटण उप जिल्हा रुग्णालयात कार्यरत होत्या. अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून त्यांनी आपले आयुष्य संपवले. आज त्यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.    ना. पंकजाताई मुंडे आज जालन्याहून तातडीने कवडगावात आल्या.  डाॅ संपदा यांच्या शोकाकुल परिवाराची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. ही घटना अत्यंत वेदनादायी आहे. मी तुमच्या पाठिशी आहे, काळजी करू नका, डाॅ संपदाला न्याय मिळवून देऊ, मी मुख्यमंत्र्यांना याविषयी बोल...

अभिष्टचिंतन विशेष लेख.....✍️ महादेव गित्ते

इमेज
  समाजसेवेचा ध्यास घेतलेला परळीतील युवा चेहरा – संदीप चौंडे संदीप चौंडे: परळीतील सामाजिक कार्यातील उल्लेखनीय चेहरा: शून्यातून विश्व निर्माण करणारे युवा नेतृत्व     समाजासाठी काहीतरी चांगले करण्याची उमेद, लोकांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवण्याची इच्छा आणि देशभक्तीची जाणीव मनात बाळगणारा एक तरुण कार्यकर्ता म्हणजे संदीप चौंडे. अल्पावधीतच त्यांनी आपल्या परिश्रम, प्रामाणिकपणा आणि सेवाभावी वृत्तीमुळे लोकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे.  समाजातील प्रत्येक घटकाला आपल्या कार्यातून प्रेरणा देणारे, तरुणाईचा आदर्श असलेले संदीप चौंडे हे नाव आज परळीच्या सामाजिक क्षेत्रात सर्व परिचित झाले आहे. सेवाभावी वृत्ती, कार्यतत्परता आणि समाजाप्रती असलेली निस्वार्थ भावना या गुणांच्या जोरावर त्यांनी अल्पावधीतच लोकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे.          डि.एम.एल.टी. या वैद्यकीय क्षेत्रातील शिक्षणामुळे त्यांना आरोग्यविषयक जाण मिळाली आणि याच जाणिवेवर आधारित अनेक आरोग्य शिबिरांचे आयोजन त्यांनी केले. सर्वसामान्य लोकांपर्यंत आरोग्यसेवा पोहोचविण्याचे त्यांचे...

उद्या लक्ष्मीपूजन नंतर दरवर्षीप्रमाणे व्यापार पेठेत देणार शुभेच्छा भेटी

इमेज
परळी : लक्ष्मीपूजन व व्यापारपेठेतील भेटीमुळे प्रभाग क्र. ९ ते १७ च्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती उद्या ऐवजी शुक्रवारी धनंजय मुंडेंनी प्रभाग क्र. १ ते ८ मधील इच्छुक उमेदवारांच्या स्वतः घेतल्या मुलाखती उद्या लक्ष्मीपूजन नंतर दरवर्षीप्रमाणे व्यापार पेठेत देणार शुभेच्छा भेटी परळी वैद्यनाथ (प्रतिनिधी) : परळी नगर परिषदेच्या प्रस्तावित निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेणे सुरू असून उद्या (ता. २१) रोजी होणाऱ्या प्रभाग क्र. ९ ते १७ च्या मुलाखती लक्ष्मीपूजन व त्यानंतर नियमितपणे दिल्या जाणाऱ्या व्यापार पेठेतील शुभेच्छा भेटीच्या पार्श्वभूमीवर पुढे ढकलण्यात आल्या असून या मुलाखती उद्या ऐवजी शुक्रवारी (ता. २४) रोजी सकाळी ११ ते पाच या वेळेत विशेष शासकीय विश्रामगृह परळी येथे होतील, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष परळी यांच्या वतीने देण्यात आली आहे.  आ. धनंजय मुंडे यांनी आज दिवसभर प्रभाग क्र. १ ते ८ मधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती स्वतः घेतल्या.  दरम्यान सध्या दिवाळी सुरू अस...
इमेज
निवृत्त शिक्षक भाऊसाहेब देशमुख यांचे निधन आज परळीत अंत्यसंस्कार परळी वैजनाथ (प्रतिनिधी) येथील नामांकित असलेल्या वैद्यनाथ विद्यालयातील सेवानिवृत्त शिक्षक भाऊसाहेब रुस्तुमराव देशमुख यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय 72 वर्ष होते. उद्या मंगळवार दिनांक 21 ऑक्टोबर रोजी सकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.       कै. भाऊसाहेब देशमुख यांनी वैद्यनाथ विद्यालयात प्राथमिक शिक्षक म्हणून सेवा केली. निवृत्त झाल्यानंतर त्यांनी उत्कृष्ट शेती केली. अत्यंत प्रेमळ स्वभावाचे व लहान थोराशी नेहमी हसतमुख चेहऱ्याने बोलत होते. ते अजातशत्रू होते. सर्व विद्यार्थी, पालक व शिक्षकाचे चाहते होते. त्यांचा मोठा मुलगा धीरज उर्फ रुस्तुम विद्यादान क्षेत्रातच कार्यरत आहे. भाऊसाहेब देशमुख आजारी असल्याने लातूर येथील दवाखान्यात त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांची आज सोमवारी (दि. 21 ऑक्टोबर) रोजी रात्री प्राणज्योत मालवली.       कै. भाऊसाहेब देशमुख यांच्या पश्चात चार मुली, दोन मुले, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. आज परळीत अंत्यसं...
इमेज
धनंजय मुंडे यांचे ईडब्ल्युएस संदर्भातील वक्तव्य कुणासाठी- बहादुरभाई  परळी (प्रतिनिधी)  दोन दिवसांपूर्वी बीड येथे पार पडलेल्या ओबिसी महाएल्गार मेळाव्यात माजी मंत्री आ.धनंजय मुंडे यांनी ओबिसी प्रवर्गात ईडब्ल्युएसची घुसखोरी होत असल्याचे शब्द वापरुन त्यास विरोध केला होता.आ.धनंजय मुंडे यांचे हे शब्द कोणासाठी वापरले हे जाहिर करावे असे आव्हान कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सय्यद हनिफ उर्फ बहादूरभाई यांनी केले आहे.  दोन दिवसांपुर्वी बीड येथे ओबिसींचा महाएल्गार मेळावा पार पडला.या मेळाव्यात आपली भुमिका मांडताना आ.धनंजय मुंडे यांनी ओबिसी प्रवर्गात ईडब्ल्युएस मध्ये घुसखोरी हा शब्द वापरुन यास विरोध दर्शवला होता.आ.मुंडे यांच्या वक्तव्यामुळे अल्पसंख्यांक व खुल्या प्रवर्गातील इतर समाजात संभ्रम निर्माण झाला असुन त्यात नेमकी कोणाची घुसखोरी आहे हे आमदार धनंजय मुंडे यांनी स्पष्ट करावे जर हे वक्तव्य अल्पसंख्यांक समाजाबद्दल असेल तर नाही ना हे जाहिर करावे अशी मागणी करत घुसखोरी या शब्दाबद्दल समाजातुन संताप व्यक्त होत असल्याचे सय्यद हनिफ उर्फ बहादूरभाई यांनी सांगितले.

8 नोव्हेंबर रोजी मोंढा मैदानावर कामगारनेते कॉ डी एल कराड यांची जाहीर सभा

इमेज
  महाराष्ट्र आशा व गटप्रवर्तक फेडरेशन (सिटू) चे परळीत होणार राज्यस्तरीय अधिवेशन ८ व ९ नोव्हेंबर ला फेडरेशनचे शिर्षस्थ नेतेगण,  राज्यभरातील पदाधिकारी व सर्व  जिल्ह्यांचे प्रतिनिधी राहणार उपस्थित 8 नोव्हेंबर रोजी मोंढा मैदानावर कामगारनेते कॉ डी एल कराड यांची जाहीर सभा परळी वैजनाथ, प्रतिनिधी....           महाराष्ट्र आशा व गटप्रवर्तक फेडरेशन (सिटू) चे राज्यस्तरीय अधिवेशन परळीत होणार आहे. ८व ९ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या या अधिवेशनासाठी राज्यभरातील पदाधिकारी व प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. बीड जिल्हा आशा व गटप्रवर्तक युनियन व संघटनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून या राज्यस्तरीय अधिवेशनाची जय्यत तयारी सुरु आहे.      महाराष्ट्र आशा व गटप्रवर्तक फेडरेशन (सिटू) ची बैठक पार पडली.बैठकीस सोलापूर, सातारा, सांगली, पुणे, कोल्हापूर, बीड, जालना, औरंगाबाद, नांदेड, मुंबई, वर्धा, अकोला, बुलढाणा, भंडारा, यवतमाळ, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील फेडरेशन चे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. या बैठकीत फेडरेशन अधिवेशन तयारी बाबत आढावा घेण्यात आला.महाराष्ट्र आशा व गटप्रवर...

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!