हळदी कुंकू कार्यक्रमालाही... नव्या युगाची जोड
ज्ञानदा ग्रुपचा आकर्षक व लक्षवेधी उपक्रम: मकरसंक्रांत हळदीकुंकू समारंभात 'विश्वविजेता महिलांचा गौरव' ! परळी वैजनाथ, प्रतिनिधी..... मकरसंक्रांती निमित्त दरवर्षी नाविन्यपूर्ण देखावा सादर करणाऱ्या परळीतील ज्ञानदा ग्रुपचा यावर्षीचा देखावा हा अतिशय आकर्षक व लक्षवेधी उपक्रम ठरला. ज्ञानदा ग्रुपने सादर केलेला मकरसंक्रांत हळदीकुंकू समारंभातील अत्यंत दर्जेदार व आकर्षक देखाव्याने परळी शहरातील सर्वांचे लक्ष वेधून घेतले.हा देखावा बघण्यासाठी व हळदी कुंकू कार्यक्रमास महिलांनी प्रचंड गर्दी केली होती.परळीतील ज्ञानदा ग्रुपच्या वतीने दरवर्षीच आकर्षक पद्धतीने महिलांचा अभिमान, स्वाभिमान व अस्मितेच्या संबंधाने प्रेरक अशा प्रकारच्या विषयाच्या अनुषंगाने आकर्षक पद्धतीने देखावा सादर केला जातो. यावर्षी विश्वविजेत्या भारतीय महिला क्रिकेट संघाचा गौरव करणारा देखावा चित्रित करण्यात आला. आकर्षक मांडणी व सुरेख सादरीकरणातून सकारलेल्या या थिममधून चॅम्पियन्स ठरलेल्या महिलांचा एक प्रकारे गौरव मकरसंक्रांती हळदी कुंकू कार्यक्रमाच्या माध्यमातून कर...