पोस्ट्स

नोव्हेंबर २, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

अन्यथा करावी लागणार तुरुंगवारी...

इमेज
  बीड जिल्ह्यात निवडणूक निकालानंतर मिरवणुकांवर बंदी - पोलीस अधीक्षकांनी दिले सक्त निर्देश बीड : पोलीस अधीक्षक नवनीत कावत, बीड जिल्हा यांच्याकडून सर्व नगरपरिषद उमेदवारांना तसेच त्यांच्या समर्थकांना सक्त निर्देशित करण्यात आले आहे.बीड जिल्ह्यात निकालानंतर मिरवणुकांवर बंदी असुन कायद्याच्या विरोधात जाईल असे कोणतेही कृत्य करण्याचे टाळावे असे पोलीस अधीक्षकांनी  सक्त निर्देश दिले आहेत.        आज होणाऱ्या मतमोजणीच्या निकालानंतर कोणत्याही प्रकारची मिरवणूक, रॅली, विजयी जल्लोष, घोषणा, फटाके फोडणे किंवा जमाव जमविण्यास पोलीस प्रशासनातर्फे कोणतीही परवानगी देण्यात येणार नाही.तसेच  जिल्हाधिकारी, बीड यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 चे कलम 37(1)(3) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश निर्गमित केले असून, सदर आदेश दि. 19/12/2025 रोजी रात्री 00.01 वा. पासून ते दि. 02/01/2026 रोजी रात्री 24.00 वा. पर्यंत लागू राहतील. विनापरवाना मिरवणूक काढणे, जमाव करणे, रस्ते अडविणे किंवा सार्वजनिक शांतता भंग होईल असा कोणताही प्रकार पूर्णतः प्रतिबंधित आहे.         आदेशाचे उल...
इमेज
  पोलीस हवालदार लाच घेताना रंगेहात पकडला; एसीबीची कारवाई गेवराई | प्रतिनिधी कुठलेही टेंडर नसताना खुलेआम सुरू असलेल्या अवैध वाळू उपशाकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले असतानाच, वाळूमाफियांकडून लाच मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी गेवराई पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस हवालदार विजय आघाव यांना बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शनिवारी (दि. ८ नोव्हेंबर) २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. मिळालेल्या माहितीनुसार, गेवराई पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या वाळू चोरीच्या गुन्ह्यात आरोपी वाळू माफियाला सहकार्य करण्यासाठी हवालदार आघाव यांनी ३० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडअंती २० हजार रुपयांवर व्यवहार ठरला. याबाबतची माहिती बीड येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला मिळताच, उपअधीक्षक सोपान चिटमपल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा रचला आणि हवालदार आघाव यांना लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. या कारवाईमुळे पोलिस विभागात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, संबंधित घटनेबाबत पुढील तपास सुरू असून, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

दोन दिवसीय अधिवेशनात राज्यभरातील 250 आशांचा सहभाग

इमेज
  महाराष्ट्र आशा व गटप्रवर्क फेडरेशन CITU च्या अधिवेशनाची रॅली व सभेने सुरुवात दोन दिवसीय अधिवेशनात राज्यभरातील 250 आशांचा सहभाग  परळी वै. दि. 8 प्रतिनिधी....         आशांना शासकिय कर्मचाऱ्यांना मिळणारे सर्व लाभ मिळाले पाहिजेत यासाठी आशा व गटप्रवर्क फेडरेशन CITU सतत लढे आंदोलन करीत आहे. मागणी मान्य होई पर्यंत लढा चालु ठेवण्याचा निर्धार CITU चे राज्य महासचिव कॉ एच एम शेख यांनी केला आहे. शनिवारी दि 8 रोजी परळी येथील मोंढा मैदानावर झालेल्या सभेत ते बोलत होते.       महाराष्ट्र आशा व गटप्रवर्क फेडरेशन CITU चे 4 अधिवेशन परळी येथील प्रवचन सभामंडपात झाली. शनिवारी दि 8 रोजी सकाळी दहा वाजता प्रवचन सभामंडप येथुन आशा स्वंसेवीका ची रॅली काढण्यात आली. रॅली मधील आशांच्या हातात लालबावटयाचा झेंडा व मागण्यांच्या गगणभेदी घोषणानी परिसर दणाणून गेला होता. रॅली चा समारोप मोंढा मैदानावरील जाहीर सभेने झाला. यावेळी बोलताना कॉ एच एम शेख यांनी आरोग्य विभागातील महत्वाचा दुवा म्हणुन आशा स्वंसेवीका काम करीत आहेत. कोरोना सारख्या महामारीत प्रत्येक घरोघरी जाण्याचे काम आशांनी...

दुःखद वार्ता : भावपुर्ण श्रद्धांजली !!!

इमेज
  राजेंद्र ओझा यांच्या भगिनी श्रीमती चंद्रकलाबाई ओझा यांचे निधन परळी वैजनाथ (प्रतिनिधी) भाजपाचे ज्येष्ठ नेते राजेंद्र ओझा यांच्या भगिनी श्रीमती चंद्रकलाबाई ओझा यांचे अल्पशा आजाराने आज शुक्रवार दिनांक 7 नोव्हेंबर रोजी दुःखद निधन झाले आहे. मृत्युसमयी त्यांचे वय 87 वर्षे होते.       श्रीमती चंद्रकलाबाई ओझा या धार्मिक वृत्तीच्या आणि मनमिळाऊ स्वभावाच्या होत्या. मारवाडी समाजात त्यांना अतिशय मानाचे स्थान होते. गेल्या काही दिवसांपासून त्या आजारी होत्या त्यातच आज शुक्रवार दि. 7 नोव्हेंबर रोजी रात्री 8 वाजण्याचे सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. कै. चंद्रकलाबाई ओझा यांच्या पार्थिवावर उद्या शनिवार दि. 8 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता परळी येथील राजस्थानी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.       कै. चंद्रकलाबाई ओझा यांच्या पश्चात एक भाऊ, एक बहीण, दोन भावजई, पुतण्या असा परिवार आहे. वैद्यनाथ बँकेचे कर्मचारी योगेश ओझा यांच्या त्या आत्या होत. ओझा पारावरच्या दुःखात एमबी न्यूज परिवार सहभागी आहे.

प्रकरणाचा गंभीरपणे तपास करून जरांगेंच्या सुरक्षेत वाढ करण्याचे आदेश

इमेज
  मनोज जरांगे प्रकरणी ना. पंकजा मुंडे यांची जालन्याच्या एसपींशी चर्चा ;  प्रकरणाचा गंभीरपणे तपास करून जरांगेंच्या सुरक्षेत वाढ करण्याचे आदेश मुंबई।दिनांक ०६। मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या जीवाला धोका असल्याच्या बातम्या माध्यमात आल्यानंतर राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री तथा जालन्याच्या पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी जालन्याचे पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांना संपर्क साधून या विषयावर चर्चा केली.  या प्रकरणाचा गंभीरपणे तपास करून जरांगे यांच्या सुरक्षेत वाढ करावी असे आदेश आज दिले.    मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या जीवाला धोका असल्याची तक्रार पोलिस ठाण्यात  आल्यानंतर जालना पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेत त्यांची चौकशी सुरू केली आहे. या घटनेची माहिती मिळताच जालन्याच्या पालकमंत्री म्हणून ना. पंकजाताई मुंडे यांनी लगेचच पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांना फोनवरून संपर्क साधला आणि संपूर्ण घटनेची माहिती जाणून घेतली. हा प्रकार अतिशय गंभीर असून याचा सखोल तपास करावा तसेच जरांगे यांच्या सुरक्षेत वाढ करावी असे आदेश त्यांनी पो...

शनिवारी मोंढा मैदानावर होणार जाहीर सभा

इमेज
  महाराष्ट्र आशा व गटप्रवर्तक फेडरेशन (सिटू) च्या अधिवेशनाची परळीत जय्यत तयारी  शनिवारी मोंढा मैदानावर होणार जाहीर सभा परळी वै. या.6 प्रतिनिधी           महाराष्ट्र आशा व गटप्रवर्तक फेडरेशन (सिटू) चे राज्य अधिवेशन दि.8 व 9 नोव्हेंबर रोजी परळीत होणार आहे. पहिल्या दिवशी शनिवार दि. 8 रोजी परळी शहरात आशा व गटप्रवर्तकांची भव्य रॅली काढून मोंढ्यात जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. बीड जिल्हा आशा वर्कर्स फेडरेशन च्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून या राज्यस्तरीय अधिवेशनाची जय्यत तयारी करण्यात आली आहे  महाराष्ट्र आशा व गटप्रवर्तक फेडरेशन (सिटू) चे राज्यस्तरीय अधिवेशन ८ व ९ नोव्हेंबरला परळी येथील वैजनाथ मंदिर परिसरातील प्रवचन सभामंडपात होणार आहे. या राज्यस्तरीय अधिवेशनात जन सुरक्षा विधेयक रद्द करा, चार कामगार संहिता आणि 12 तासांचा कामाचा दिवस रद्द करा, सार्वजनिक आरोग्याचे खाजगीकरण थांबवा आणि आरोग्याच्या बजेट मध्ये वाढ करा, आशा व गटप्रवर्तकांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्या, योजना कर्मचाऱ्यांची एकजूट कायम करा, आदी मागण्यांचे ठराव पारित करण्यात येणार आहेत. ...

फसवणूक करून अनेक महिन्यांपासून फरार असलेला सोनार पुण्यातून पकडला

इमेज
  गोल्ड लोन साठी सोने तपासून देणाऱ्या सोनारानेच केली बँकांची फसवणूक फसवणूक करून अनेक महिन्यांपासून फरार असलेला सोनार पुण्यातून पकडला बीड: सोन्यावर कर्ज ही स्कीम सर्व बँका आणि सर्व प्रायव्हेट फायनान्स कंपन्यांमध्ये चालू आहे. परंतु हा सोने तपासून देणाराच जर लफंगा असला तर बँक बुडालीच म्हणून समजा. बीड येथील अशाच एका सोनाराने स्वतः ग्राहक कर्ज घेण्यासाठी तयार केले. कर्जासाठी त्यांची निवेदन बँकेस पाठवली आणि त्यांना बनावट सोने तयार करून दिलं. अशा प्रकारे तयार केलेले सोने बँकेला तपासून देताना ते खरे आहे असे भासवले. बँकेने आंधळेपणाने विश्वास ठेवला आणि लोकांना भरमसाठ कर्ज वाटप केले. असे बनावट १६ ग्राहक बँक ऑफ बडोदा या बँकेमध्ये या सोनाराने पाठवले आहेत. संशयिताचे नाव विलास उदावंत, राहणार पंडित नगर, नगर रोड, बीड, जो ‘विलास ज्वेलर्स’ नावाने बीड येथे दुकान चालवायचा. जलद श्रीमंत व्हायचे म्हणून त्याने हा उद्योग चालू केला आणि सामान्य लोकांकडूनही “सोने गहाण ठेवा, पुढच्या महिन्यात तुम्हाला जास्त सोनं देतो, पैसे जमा करा, त्या बदल्यात जास्त सोनं देतो” असे खोटे आश्वासन देऊन दोन महिन्यात सर्व मिळून अडी...

कॉक्लियर इम्प्लांट सर्जरी म्हणजे काय?

इमेज
  सेवा परमो धर्मः हे ब्रीद पाळत डॉ. संतोष मुंडे यांच्या प्रयत्नातून आठ लाख रुपयांची कॉकलियर इंप्लांट सर्जरी मोफत चिमकुल्या मूकबधिर मंगेशला ऐकता व बोलता येऊ लागले परळी वैजनाथ (प्रतिनिधी) मंगेश चंद्रकांत लव्हारे रा. पट्टी वडगांव, तालुका अंबाजोगाई, जिल्हा बीड हा दोन वर्षाचा छोटा बाळ जन्मतः मूकबधिर होता. त्याच्या पालकांनी माझ्याकडे उपचारांसाठी संपर्क केला. त्यानंतर त्याचे योग्य निदान करून के इ एम रुग्णालयात डॉ. हेतल पटेल यांच्याकडे पाठवले. तिथे चिमुकल्या मंगेशची कॉकलियर इंप्लांट सर्जरी केली. त्याचा खर्च तब्बल 8 लाख रुपये होता. त्यामुळे विविध एन जी ओ मार्फत निधी उपलब्ध करून मंगेशची मोफत यशस्वी शस्त्रक्रिया झाल्यावर आता त्याला ऐकू व बोलता येऊ लागले. या पुण्यकर्मात योगदान देता आले हे मी माझे भाग्य समजतो. या आधी आजवर 70 ते 80 जणांवर हीच कॉकलियर इंप्लांट सर्जरीमध्ये योगदान देता आले याचा आनंद अवर्णनीय आहे. माजी मंत्री आ. धनंजय मुंडे व मंत्री पंकजा मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सेवा परमो धर्मः हे ब्रीद पाळत मी आजवर काम करत आलो आहे व यापुढेही करत राहणार आहे. मी फक्त माझे कर्तव्य बजावत आहे अश...

परळी जिनिंग प्रेसिंग फॅक्टरीत हंगाम २०२५–२६ ला प्रारंभ

इमेज
  परळीतील टोकवाडी येथे कापूस गळीत हंगामाचा शुभारंभ शेतकऱ्याला मिळाला सर्वोच्च भाव ₹७३०१ प्रती क्विंटल  परळी जिनिंग प्रेसिंग फॅक्टरीत हंगाम २०२५–२६ ला प्रारंभ परळी वैजनाथ/प्रतिनिधी आज दिनांक ५ नोव्हेंबर २०२५ रोजी शेतकरी कापूस प्रक्रिया सहकारी संस्था मर्या., परळी वैजनाथ यांच्या जिनिंग-प्रेसिंग फॅक्टरी, टोकवाडी येथे कापूस गळीत हंगाम २०२५–२६ चा शुभारंभ उत्साहात करण्यात आला. या हंगामाच्या शुभारंभप्रसंगी परळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मा. सूर्यभान नाना मुंडे यांच्या हस्ते . शेतकरी म्हणून सतीश बनसोडे (रा. नागापूर) यांचा कापूस खरेदी करण्यात आला असून त्यांना तालुक्यातील सर्वोच्च भाव ₹७३०१ प्रती क्विंटल देण्यात आला. या प्रसंगी जिनिंगचे संस्थापक अध्यक्ष व कापूस पणन महासंघाचे उपाध्यक्ष ॲड. विष्णुपंत सोळंके, जिनिंगचे उपाध्यक्ष ॲड. एन. जी. देशमुख, बाजार समितीचे मुख्य लेखापाल गोविंदभाऊ मुंडे, बाजार समितीचे संचालक ॲड. रणजीत सोळंके, तसेच तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकरी बालासाहेब गणपत सोळंके, नागापूर येथील जेष्ठ नागरिक मा. चंद्रभान सोळंके, माणिक आप्पा सोळंके (मुकादम व सावकार), ज्ञानो...

नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनतेच्या प्रश्नांवर बैठक उत्साहात!!

इमेज
  परळीच्या विकासासाठी नगरपालिका लढवण्याचा कार्यकर्त्यांचा निर्धार!  कार्यकर्त्यांनी निवडणुकीच्या कामाला लागावे - प्रा.टी.पी.मुंडे  नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनतेच्या प्रश्नांवर  बैठक उत्साहात!! परळी (प्रतिनिधी) : परळी नगरपालिका निवडणूक 2025 याच्या पार्श्वभूमीवर तसेच परळी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आज दिनांक 5 नोव्हेंबर 2025, बुधवार रोजी सायंकाळी 5 वाजता मा. प्रा. श्री. टी.पी. मुंडे सर यांच्या नेतृत्वाखाली शहरातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक त्यांच्या संपर्क कार्यालयात संपन्न झाली. बैठकीत परळी नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विकास आराखडा, नागरिकांच्या दैनंदिन समस्या तसेच शहरातील प्रलंबित कामांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. शहरातील पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, आरोग्य सुविधा, वाहतूक व्यवस्था आणि शिक्षण क्षेत्रातील सुधारणा यासारख्या विषयांवर चर्चा पार पडली.प्रा. मुंडे सरांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की, विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी धनंजय मुंडे यांनी मला व प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत जिल्हा परिषद व नगरपालिका...

भावपूर्ण श्रद्धांजली!!!

इमेज
  बालासाहेब गिते ( रामा टायर्स) यांच्या भगिनी श्रीमती शिलाबाई यांचे निधन परळी वैजनाथ (प्रतिनिधी) रामा टायर्सचे मालक बालासाहेब गिते यांच्या मोठ्या भगिनी श्रीमती शिलाबाई मारोती गित्ते यांचे आज दु:खद निधन झाले. मृत्युसमयी त्यांचे वय 80 वर्षे होते.       श्रीमती शिलाबाई गिते या आयुष्यभर अविवाहित राहिल्या. त्या अतिशय मनमिळाऊ स्वभावाच्या आणि धार्मिक वृत्तीच्या होत्या. शिलाबाई यांचे आज बुधवारी समर्थ हॉस्पिटल येथे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर आज वाघबेट येथील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले या वेळी वागबेट व परिसरातील नागरिक उपस्थित होते कै. शिलाबाई गिते यांच्या पश्चात एक भाऊ, भावजई, 5 बहिणी असा मोठा परिवार आहे. नगरसेवक प्रा. पवन मुंडे यांच्या त्या मावशी होत. उद्या राख सावडण्याचा कार्यक्रम     कै. श्रीमती शिलाबाई गिते यांचा राख सावडण्याचा कार्यक्रम उद्या शुक्रवार दि. 7 नोव्हेंबर रोजी सकाळी 7 वाजता वाघबेट येथे होणार आहे. गिते परिवाराच्या दु:खात एमबी न्यूज परिवार सहभागी आहे.

नियोजनासाठी गावोगावी बैठका; कृषीकुल येथे अनेक गावांच्या सरपंचांची नियोजन बैठक

इमेज
  सिरसाळा येथे होणार अभूतपूर्व शेतकरी संवाद मेळावा! केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांची प्रमुख उपस्थिती; हजारोंच्या संख्येने शेतकरी सहभागी होणार नियोजनासाठी गावोगावी बैठका; कृषीकुल येथे अनेक गावांच्या सरपंचांची नियोजन बैठक परळी वैजनाथ (प्रतिनिधी) ग्लोबल विकास ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष मयंक गांधी यांच्या प्रेरणा आणि संकल्पनेतून दिनांक 07 नोव्हेंबर रोजी सिरसाळा येथे भव्य शेतकरी संवाद मेळावा संपन्न होत आहे. या कार्यक्रमास देशाचे कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यासह राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, पशुसंवर्धन तथा दुग्धविकास मंत्री पंकजाताई मुंडे, खा.बजरंग सोनवणे, खा.रजनीताई पाटील, माजी मंत्री आ.धनंजय मुंडे यांच्यासह मराठवाड्यातील सर्व आमदारांसह अनेक मान्यवर उपस्थित असतील. सदरील कार्यक्रमास राज्यातील 35 ते 40 हजार शेतकरी उपस्थित राहणार आहेत. नियोजनासाठी गावोगावी शेतकऱ्यांच्या बैठका होत असून, परळी तालुक्यातील अनेक गावांच्या सरपंचांची कृषीकुल येथे महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली.  सिरसाळा येथे ग्लोबल विकास ...

डबल स्टार असलेल्या मतदारांना मतदान करता येणार नाही- निवडणूक आयोग

इमेज
  नगरपरिषदेच्या निवडणूक तारखा जाहीर; २ डिसेंबरला होणार मतदान २ डिसेंबर रोजी नगरपरिषदेच्या निवडणुकांसाठी मतदान होणार आहे. १० नोव्हेंबरपासून अर्ज करता येणार आहेत. १० ते १७ नोव्हेंबर या कालावधीत अर्ज करायचे आहे. यानंतर मतदान २ डिसेंबर रोजी होणार आहे. ३ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. नामनिर्देशन दाखल 10 नोव्हेंबर अर्ज मुदत 17 नोव्हेंबर अर्ज छाननी 18 नोव्हेंबर अर्ज माघार 21 नोव्हेंबर निडणूक चिन्ह 26 नोव्हेंबर मतदान- 2 डिसेंबर मतमोजणी - 3 डिसेंबर २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; दुबार मतदारावरही उचललं पाऊल सर्वोच्च न्यायालयाने ३१ जानेवारी २०२५ पूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे निर्देश दिलेत. या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाकडून २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. येत्या २ डिसेंबर २०२५ रोजी यासाठी मतदान होईल तर ३ डिसेंबर २०२५ रोजी मतमोजणी होईल. या निवडणुकीत १ कोटीहून अधिक मतदार मतदान करतील. या निवडणुका इलेक्ट्रॉनिक मशीन आणि बॅलेट युनिट वापरण्यात येतील अशी घोषणा राज्य निवडणूक आयोगाने केली आहे.  याबाबत राज्य निवडणूक...

आ. नमिता मुंदडा यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा यशस्वी;

इमेज
अंबाजोगाई नगरपरिषदेसाठी १२ कोटी १३ लाखांचा विक्रमी निधी मंजूर शहर विकास, दलित वस्ती सुधारणेसह मूलभूत कामांना प्रशासकीय मान्यता अंबाजोगाई (एमबी न्यूज वृत्त सेवा) :-  केज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार नमिता मुंदडा यांनी केलेल्या सातत्यपूर्ण अंबाजोगाई शहराच्या विकासाला एक नवी दिशा मिळाली आहे. जिल्हा वार्षिक योजनेतून अंबाजोगाई नगरपरिषद क्षेत्रातील विविध विकासकामांसाठी तब्बल १२ कोटी १३ लाख १ हजार ७६३ रुपये इतका विक्रमी निधी एकाच वेळी मंजूर करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नगरपरिषद प्रशासन विभागाने ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी एकाच दिवशी तीन प्रमुख योजनांतील या कामांना प्रशासकीय मान्यता दिली आहे. मागील काही वर्षात आ. मुंदडा यांच्या माध्यमातून अंबाजोगाई शहर विकासासाठी शासनाने शेकडो कोटी रुपयांचा निधी दिला आहे, त्यात आता आणखी निधीची भर पडली आहे.  या मंजूर निधीमध्ये महाराष्ट्र नगरोत्थान महाभियान (जिल्हास्तरीय), लोकशाहीर आण्णाभाऊ साठे नागरी दलित वस्ती सुधारणा योजना आणि नागरी दलितेत्तर वस्ती सुधारणा योजना या तीन महत्त्वाच्या योजनांचा समावेश आहे. दलित वस्ती सुधारणांसाठी ६.७१ कोटींचा न...

वकील मारहाणीचा व्यक्त केला निषेध

इमेज
ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट लागू करा:परळीत वकील संघ आग्रही शेवगावं येथे वकील बांधवा वर पक्षकारा कडून उलट तपासणी साक्ष का घेतली म्हणून गंभीर मारहाण केल्याने केस दाखल करण्यात आली या पाश्वभूमी वर ऍडव्होकेट प्रोटेक्शन ऍक्ट (वकील संरक्षण कायदा)लागू करण्या कामी बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र व गोवा यांनी यांनी असहकार आंदोलनाची हाक दिल्या नंतर, सरकारने कायद्याबाबत तीन महिन्यात अंमलबजावणी करण्या बाबत शासनाने आश्वासन दिल्यामुळे सदरचे आंदोलन स्थगित करण्यात आले.परंतु सदरची मागणी वकील सरकारने लवकर  मान्य करावी व शेवगाव येथील वकिलांवर झालेल्या हल्ल्याच्या घटनेचा निषेध म्हणून वकिलांच्या कोटाला लाल रिबीन लावून निषेध करून कामकाजात सहभाग घेण्यात आला. प्रसंगी परळी वकील संघाचे अध्यक्ष ॲड एच व्ही गुट्टे ॲड आर.व्हि.गित्ते अँड प्रदिप गिराम ॲड आर व्हि देशमुख ॲड मिर्झा मंजुर अली ॲड.माधवराव मुंडे ॲड वैजनाथ नागरगोजे ॲड दिलीप स्वामी  ॲड प्रभाकर सातभाई ॲड वसंतराव फड उपाध्यक्ष ॲड दस्तगीर सचिव ॲड शेख शकीक ॲड डि.एल.उजगरे.ॲड नागापूरकर ॲड बी डी उजगरे ॲड मोहन कराड ॲड अनिल मुंडे ॲड गजानन पारेकर ॲड लक्ष्मीकांत मुंडे ...
इमेज
  अल्पवयीन मुलीचे अपहरण : अपहरण करणाऱ्याने केला मुलीच्या वडिलांना फोन  केज :- केज तालुक्यातील एका गावातून १५ वर्षीय वयाच्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करण्यात आले आहे. या बाबतची माहिती अशी की, केज तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीचे वडील साखर कारखान्याच्या ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनावर ड्रायव्हर असून ते शेतात राहतात.दि. १ नोव्हेंबर रोजी रात्री ८:३० वाजण्याच्या सुमारास त्या अल्पवयीन मुलीचे गावातील एका तरुणाने अपहरण केले. रात्री मुलगी घरी न आल्यामुळे आईने नातेवाईकडे शोध घेतला असता; ती आढळून आली नाही.  दरम्यान दि. २ नोव्हेंबर रोजी दुपारी ३:०० मुलीचे वडील केज येथे तिचा शोध घेत असताना त्यांना गावातील एका तरुणाने फोन वरून सांगितले की, तुमची मुलगी माझ्या सोबत आहे. त्या तरुणाला मुलीच्या वडिलांनी मुलीला घरी आणून सोड. असे सांगून देखील त्याने मुलीला तिच्या कुटुंबाच्या ताब्यात दिले नाही.  दि. २ नोव्हेंबर रोजी अपहरण झालेल्या मुलीच्या वडिलांच्या तक्रारी वरून अपहरणकर्त्या तरुणा विरुद्ध केज पोलिस ठाण्यात गु. र. नं. ६०४/२०२५ भा. न्या. सं. १३७(२) नुसार गुन्हा करण्यात आला आहे.पोलिस निरीक...

राज्यसेवा परीक्षेत १४० वी रँक मिळवत वर्ग-१ अधिकारी बनला तरुण

इमेज
  बारावीला तीनदा नापास, दोन वर्ष केली शेती — अखेर राज्यसेवा परीक्षेत संगमच्या श्रीकांत होरमाळेचा झेंडा! राज्यसेवा परीक्षेत १४० वी रँक मिळवत वर्ग-१ अधिकारी बनला तरुण धारूर,प्रतिनिधी... “अपयश ही शेवट नसते, तर नव्या प्रवासाची सुरुवात असते” हे वाक्य खरी ठरवत धारूर तालुक्यातील संगम येथील सुपुत्र श्रीकांत दत्तात्रय होरमाळे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) राज्यसेवा परीक्षेत १४० वी रँक मिळवत मोठे यश संपादन केले आहे. बारावीच्या परीक्षेत तीनदा नापास झालेला आणि दोन वर्षे घरची शेती केलेला हा तरुण आज वर्ग-१ अधिकारी होण्यासाठी पात्र ठरला आहे. संगमसह पंचक्रोशीत श्रीकांतच्या यशाचा मोठा गौरव होत असून सर्वत्र त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.श्रीकांत हा धारूर तालुक्यातील संगम या छोट्याशा गावचा रहिवासी आहे. गेली अकरा वर्षे तो पुण्यात राहून राज्यसेवा परीक्षेचा अभ्यास करत होता. शिक्षणात मागे राहिलेल्या श्रीकांतने एके काळी “आपण काही करू शकत नाही” असा विचार मनात धरला होता. मात्र, भाऊ गणेश यांच्या मार्गदर्शनाने व समुपदेशनाने त्याने अभ्यासाची दिशा बदलली आणि राज्यसेवा परीक्षा उत्तीर्ण होण्याचे...

सर्व स्तरातून अभिनंदन!!!!

इमेज
  बोरखेडच्या अविनाश मिसाळ याची ‘गरुडझेप’ एमपीएससी २०२४ मध्ये क्लास-वन अधिकारी म्हणून यशस्वी पात्रता  परळी, (प्रतिनिधी):- परिस्थिती लहान असली तरी स्वप्नं मोठी असावीत असे आपल्याकडे म्हण आहे.  ही म्हण बोरखेडच्या सुपुत्राने खऱ्या अर्थाने सार्थ ठरवली आहे. परळी तालुक्यातील गोदाकाठी वसलेल्या छोट्याशा बोरखेड गावातील अविनाश विक्रम मिसाळ याने एमपीएससी २०२४ च्या परीक्षेत घवघवीत यश संपादन करून क्लास-वन अधिकारीपदासाठी पात्रता मिळवली आहे.    अविनाशचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा बोरखेड येथे तर माध्यमिक शिक्षण अहमदपूर येथे झाले. बारावी लातूर येथून तर इंजिनिअरिंगची पदवी कराड  येथून मिळवली. ग्रामीण भागात वाढलेला, पण स्वप्न मात्र राज्यसेवेतील मानाचे अधिकारी होण्याचे आणि तेच स्वप्न अविनाशने पूर्णत्वास नेले. अविनाश हा आंबेडकरी चळवळीतील धडाडीचे कार्यकर्ते व भाजप मागासवर्गीय सेलचे परळी तालुका अध्यक्ष विक्रम मिसाळ यांचा सुपुत्र आहे. प्रतिकूल परिस्थितीतून पुढे आलेल्या विक्रम मिसाळ यांनी शिक्षणाच्या जोरावर घराण्याचे नशीबच बदलून दाखवले आहे. त्यांचा छोटा मुलगा दिलीप मिसाळ सध्या ...

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!