पोस्ट्स

डिसेंबर ७, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

अन्यथा करावी लागणार तुरुंगवारी...

इमेज
  बीड जिल्ह्यात निवडणूक निकालानंतर मिरवणुकांवर बंदी - पोलीस अधीक्षकांनी दिले सक्त निर्देश बीड : पोलीस अधीक्षक नवनीत कावत, बीड जिल्हा यांच्याकडून सर्व नगरपरिषद उमेदवारांना तसेच त्यांच्या समर्थकांना सक्त निर्देशित करण्यात आले आहे.बीड जिल्ह्यात निकालानंतर मिरवणुकांवर बंदी असुन कायद्याच्या विरोधात जाईल असे कोणतेही कृत्य करण्याचे टाळावे असे पोलीस अधीक्षकांनी  सक्त निर्देश दिले आहेत.        आज होणाऱ्या मतमोजणीच्या निकालानंतर कोणत्याही प्रकारची मिरवणूक, रॅली, विजयी जल्लोष, घोषणा, फटाके फोडणे किंवा जमाव जमविण्यास पोलीस प्रशासनातर्फे कोणतीही परवानगी देण्यात येणार नाही.तसेच  जिल्हाधिकारी, बीड यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 चे कलम 37(1)(3) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश निर्गमित केले असून, सदर आदेश दि. 19/12/2025 रोजी रात्री 00.01 वा. पासून ते दि. 02/01/2026 रोजी रात्री 24.00 वा. पर्यंत लागू राहतील. विनापरवाना मिरवणूक काढणे, जमाव करणे, रस्ते अडविणे किंवा सार्वजनिक शांतता भंग होईल असा कोणताही प्रकार पूर्णतः प्रतिबंधित आहे.         आदेशाचे उल...

आज सायंकाळी वार्षिक स्नेहसंमेलन...

इमेज
दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूलमध्ये सातव्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन परळी (प्रतिनिधी)      शालेय कामकाजातील सर्वात महत्त्वाचा व जल्लोषाचा दिवस म्हणजे वार्षिक स्नेहसंमेलन.दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूलच्या प्रांगणात विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा,यासाठी आज सातव्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षी विविध संकल्पनेवर वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन केले जाते. यावर्षी 'वर्ल्ड ऑफ इमोशन 'या संकल्पनेवर विद्यार्थी आपले कलागुण सादर करणार आहेत.           यावर्षीच्या वार्षिक स्नेहसंमेलनात प्रमुख पाहुणे म्हणून श्री. नवनीत कांवत सर (पोलीस अधीक्षक, बीड),सन्माननीय अतिथी शाळेचे मार्गदर्शक व प्रेरणास्त्रोत मा.श्री.किरण गित्ते साहेब (सचिव,त्रिपुरा सरकार),स्वामी विवेकानंद युथ वेल्फेअर सोसायटीच्या अध्यक्षा सौ.उषा किरण गित्ते मॅडम, श्री.गणेश गिरी सर (गटशिक्षणाधिकारी) यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे या कार्यक्रमास 'मुरंबा' या मराठी मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्री नेहा बोरुले मॅडम यां...

लोकनेत्याचे घेतले आशिर्वाद......!!!

इमेज
  माजी नगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी व सौ.पद्मश्रीताई धर्माधिकारी गोपीनाथगडावर नतमस्तक परळी वैजनाथ, प्रतिनिधी....        दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंतीनिमित्त माजी नगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी व सौ.पद्मश्रीताई धर्माधिकारी यांनी गोपीनाथगडावर नतमस्तक होऊन लोकनेत्याचे आशीर्वाद घेतले.        लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांची आज १२ डिसेंबर रोजी जयंती. त्यानिमित्त गोपीनाथगडावर राज्यभरातून मोठ्या संख्येने जनसमुदायाने दर्शनाला रिघ लावली.या अनुषंगाने परळीचे माजी नगराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी त्यांच्या सुविद्य पत्नी परळी नगर परिषद निवडणुकीतील राष्ट्रवादी व महायुतीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ.पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी यांच्यासमवेत पुष्पहार अर्पण करून दर्शन घेतले.धर्माधिकारी दाम्पत्य  गोपीनाथगडावर नतमस्तक होऊन त्यांनी लोकनेत्याचे आशीर्वाद घेतले.

दुःखद वार्ता : भावपूर्ण श्रद्धांजली !!!!

इमेज
  श्रीनिवास राऊत यांना पितृशोक ; बबनराव राऊत यांचे अपघाती निधन परळी वैजनाथ (प्रतिनिधी) राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे युवक नेते श्रीनिवास राऊत यांचे वडील बबनराव पिलोबा राऊत यांचे आज शुक्रवार दिनांक 12 डिसेंबर रोजी अपघाती निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय 53 वर्षे होते. उद्या शनिवारी सकाळी परळीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.      शुक्रवार दिनांक 12 डिसेंबर रोजी दुपारी सुमारे 3 वाजण्याचे सुमारास बबनराव राऊत हे एक लग्न आटोपून ऑटो रिक्षाने परळी वैजनाथकडे येत असताना निळा पाटीजवळ त्यांचा ऑटो अचानक पलटी झाला. यात बबनराव राऊत यांच्या छातीला जबर मार लागला. त्यांना प्रथम गंगाखेड येथील रुग्णालयात प्रथमोपचार करून परळी वैजनाथ उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले. उपजिल्हा रुग्णालयात मोठी गर्दी झाली होती. कै. बबनराव राऊत यांच्या पश्चात   पत्नी, एक मुलगा, दोन मुली, दोन भाऊ, बहीण, सुना, नातवंडे असा भरगच्च परिवार आहे.  आज परळीत अंत्यसंस्कार      कै. बबनराव राऊत यांच्या पार्थिवावर उद्या...

दुःखद वार्ता : भावपूर्ण श्रद्धांजली!!!

इमेज
  लक्ष्मणराव घवाळकर यांना बंधू शोक ; रामराव विश्वनाथराव घवाळकर यांचे निधन  परळी वैजनाथ (प्रतिनिधी)-येथील प्रसिद्ध मोटार तज्ञ लक्ष्मणराव घवाळकर यांचे बंधू व सध्या माजलगाव येथील रहिवासी रामराव घवाळकर यांचे मुंबईतील कोकिळाबेन रुग्णालयात उपचार सुरू असताना हृदयविकाराने शुक्रवारी दुपारी 12:30 वाजता निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय 72 वर्षे होते.                                                       येथील पाटबंधारे विभागात अभियंता म्हणून सेवा बजावली होती व सध्या ते सेवानिवृत्तीचे जीवन जगत होते. अत्यंत कडक शिस्तीचे म्हणून त्यांची ख्याती होती.प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांच्यावर मुंबई येथील कोकिळाबेनस इस्पितळात गेल्या काही दिवसापासून उपचार सुरू होते त्यांच्या पश्च्यात पत्नी, चार भाऊ, सहा बहिणी,तीन मुले, सुना व नातवंडे असा भरगच्च परिवार आहे.  त्यांच्या निधनाबद्दल परळी व माजलगाव भागामध्ये शोक व्यक्त करण्यात येत आहे. त्यांची अंत्ययात्रा विद्यान...

ना.पंकजाताई मुंडेंनी अंत्यदर्शन घेत कुटुंबीयांचं केलं सांत्वन

इमेज
शिवराज पाटील चाकूरकर यांच्या जाण्याने राजकारणातील ऋषीतुल्य व सात्विक नेता हरवला ! ना.पंकजाताई मुंडेंनी पार्थिवाचे अंत्यदर्शन घेत कुटुंबीयांचं केलं सांत्वन लातूर, प्रतिनिधी....... माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचे वयाच्या 90 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. शिवराज पाटील चाकूरकर यांच्या जाण्याने राजकारणातील एक ऋषितुल्य व्यक्तिमत्व व राजकारणातील एक सात्विक नेता हरवला असल्याचे शोकसंवेदना ना.पंकजाताई मुंडे यांनी व्यक्त केली.     राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे यांनी शिवराज पाटील चाकूरकर यांच्या कुटुंबीयांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले. त्याचबरोबर शिवराज पाटील चाकूरकर यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. त्यांच्या निधनाबद्दल शोक संवेदना व्यक्त करताना पंकजाताई मुंडे यांनी सांगितले की, राजकारणातील एक ऋषितुल्य व्यक्तिमत्व व राजकारणातील एक सात्विक नेता आज हरवला आहे.शिवराज पाटील चाकूरकर हे  आपल्या जीवनामध्ये सर्वोच्च पदापर्यंत पोहोचले. देश पातळीपर्यंत अत्यंत सन्मानाने आणि ...

ना.पंकजाताई, डॉ.प्रितमताई, आ.धनंजय मुंडेंसह राज्यभरातील हजारो कार्यकर्ते समाधीसमोर नतमस्तक

इमेज
  गोपीनाथगडाची निर्मिती वंचित, उपेक्षितांसाठीच; त्यांच्याच आदर्शावर माझी वाटचाल - ना.पंकजा मुंडे लोकनेत्याच्या अभिवादनासाठी गोपीनाथगडावर उसळली अलोट गर्दी रक्तदान शिबीर, गरजुंना मदत, अन्नदानासह विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन परळी वैजनाथ।दिनांक १२। गोपीनाथगडाची उभारणी हीच मुळात लोकनेते मुंडे साहेबांवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाला नतमस्तक होता यावे, त्यांचे सुख-दु:ख त्याला मस्तक टेकून सांगता यावे यासाठी केलेली आहे. पृथ्वीतलावरील एकमेव असा हा गड आहे जो एका लेकीने आपल्या वडीलांच्या स्मृतीनिमित्त उभा केला आहे. वास्तविक पाहता हा गड मी उभा केलेला नाही तर ईश्वरानेच हे घडवून आणलेले आहे. मुंडे साहेबांनी  आयुष्यातला क्षण न् क्षण वंचित, पिडीतांसाठी वेचला आहे, त्यांच्याच आदर्शावर माझी वाटचाल आहे अशा शब्दात राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंञी ना.पंकजाताई मुंडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.           लोकनेते मुंडे साहेब यांची जयंती आज गोपीनाथ गडावर विविध सामाजिक उपक्रमांनी साजरी करण्यात आली, त्यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांशी  संवाद साधताना त्या बोलत होत्या. प्...

Pankaja Munde:तेंव्हा ते म्हणाले,"बेटा तुला खूप त्रास झाला का?"

इमेज
गोपीनाथराव मुंडे एक हळवा बाप :पंकजा मुंडे यांनी स्वतः सांगितला 'तो नाजूक क्षणातील' किस्सा ! लेक अन् आठणी: नेता आणि पिता यादृष्टीने पंकजांनी केलं मनमोकळ भाष्य परळी वैजनाथ, प्रतिनिधी......      राजकीय क्षेत्रात गोपीनाथराव मुंडे हे नाव एका उंचीवर गेलेलं नाव म्हणून देशभर ओळखलं जातं. मात्र ते किती हळव्या मनाचे आणि संवेदनशील वडील होते याचा एक किस्सा त्यांच्या कन्या व राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी स्वतः आज गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीदिनी सांगितला. हा किस्सा सांगताना पंकजा मुंडे एक लेक म्हणून काहीशा भावनिकही झाल्याचे बघायला मिळाले.         भाजपाचे दिवंगत केंद्रीय मंत्री लोकनेते म्हणून ज्यांची ओळख आहे असे गोपीनाथराव मुंडे यांची आज 12 डिसेंबर रोजी जयंती साजरी करण्यात आली. या निमित्ताने आपल्या वडिलांच्या दुर्मिळ आठवणी सांगताना राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे काहीशा भाऊक झाल्या होत्या. एक खंबीर धीरोदात्त नेता अशी ज्यांची राजकीय क्षेत्रात ओळख आहे. असे गोपीनाथ मुंडे हे लेकीसाठी किती हळवे आणि संवेदनशील होते याचा एका नाज...

ना. पंकजाताईंनी मानले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आभार

इमेज
  ना. पंकजा मुंडे यांच्यामुळे परळी मतदारसंघातील रस्त्याला मिळाला १० कोटीचा निधी ना. पंकजाताईंनी मानले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आभार  परळी वैजनाथ।दिनांक ११। राज्याच्या पशुसंवर्धन व पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे परळी मतदारसंघातील रस्त्याच्या कामाला केंद्रीय रस्ते विकास योजनेंतर्गत दहा कोटी रूपयाचा निधी मिळाला आहे, निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल ना. पंकजाताईंनी केंद्रीय रस्ते विकास व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचे आभार मानले आहेत.    केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची ना. पंकजाताईंनी मध्यंतरी दिल्ली येथे भेट घेतली होती. यावेळी त्यांनी बीड जिल्ह्यातील विविध मागण्यांबरोबरच परळी मतदारसंघातील रस्त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यासंदर्भात पत्र दिले होते, या पत्राची दखल घेऊन गडकरींनी केंद्रीय रस्ते विकास योजनेंतर्गत  अंबाजोगाई-मांडवा-मांडेखेल- नाथरा- कौडगाव रस्ता रामा-२३५ किमी ३८/२५५ वर पुलाचे बांधकाम करणे आणि कौडगाव घोडा गावाअंतर्गत लांबीमध्ये सिमेंट नालीचे बांधकाम करणे व संरक्षण भिंतीचे बांधकाम करणे यासाठी दहा कोटी रूपयाचा निध...

दुःखद वार्ता....

इमेज
  ॲड.सतीश देशमुख यांना पितृशोक, बालासाहेब देशमुख यांचे  निधन परळी वैजनाथ (प्रतिनिधी)...      शहरातील गणेशपार भागातील देशमुख गल्ली येथील रहिवासी तथा नगरपालिकेचे सेवानिवृत्त कर्मचारी कै. बालासाहेब गंगाधरराव देशमुख यांचे दिनांक 10 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी 8:15 वाजता वार्धक्याने दुःखद निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय 81 वर्ष होते.         गाव भागातील देशमुख गल्ली येथील रहिवाशी तथा सर्व सुपरिचित व्यक्तिमत्व असणारे नगरपालिकेचे माजी कर्मचारी कै. बालासाहेब गंगाधरराव देशमुख यांचे वयाच्या 81 व्या वर्षी वार्धक्याने दिनांक 10 डिसेंबर 2025 रोजी दुःखद निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय 81 वर्ष होते.  कै. बालासाहेब देशमुख हे जुन्या पिढीतील अत्यंत मनमिळावू, सुस्वभावी तथा धार्मिक वृत्तीचे सर्वांसोबत स्नेहबंध जपणारे व्यक्तिमत्त्व होते. नगरपालिकेचे सेवानिवृत्त कर्मचारी असणारे बालासाहेब देशमुख अतिशय शिस्तप्रिय तथा प्रामाणिक वृत्तीचे मानले जात. त्यांच्या पश्चात 1 बहीण, 3 मुले, सुना, नातवंडे असा भरगच्च परिवार आहे. येथील प्रसिद्ध विधीज्ञ ॲड. सतीश देशमुख यांच...

ना.पंकजा मुंडे, डॉ.प्रीतम मुंडे राहणार उपस्थित.....

इमेज
  लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांना अभिवादन करण्यासाठी १२ डिसेंबरला गोपीनाथ गडावर उसळणार अलोट गर्दी मुंडे साहेबांना अभिप्रेत सामाजिक उपक्रमांनी जयंती साजरी करण्याचे ना. पंकजाताईंचे आवाहन परळी वैजनाथ।दिनांक १०। लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी १२ डिसेंबर रोजी गोपीनाथ गडावर राज्याच्या कानाकोपर्‍यातून मोठी गर्दी उसळणार आहे. राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे, माजी खासदार डाॅ.प्रितमताई मुंडे यावेळी उपस्थित राहणार आहेत. लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांना अभिप्रेत असलेल्या सामाजिक उपक्रम आयोजित करून आपण ज्या ठिकाणी आहात त्याच ठिकाणी मुंडे साहेबांची जयंती साजरी करावी असे आवाहन ना. पंकजाताई मुंडे यांनी केले आहे.   ना. पंकजाताई मुंडे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून राज्यभरातील कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे. १२ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता गोपीनाथगड येथे आपण उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. गेल्या वर्षीपासून आपण आहे त्या ठिकाणी मुंडे साहेबांना अभिप्रेत असलेल्या जनसेवेच्या विविध उपक्रमांनी त्यांची जयंती साजरी करावी असे ...

त्वरित कारवाई करून सक्षम व कर्तव्यदक्ष अधिकारी नेमावेत अशी मागणी

इमेज
  परळीच्या पक्षपाती निवडणूक अधिकाऱ्यांवर कारवाई कधी होणार : दीपक  देशमुख परळी वैजनाथ (प्रतिनिधी) एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे माजी नगराध्यक्ष व नगरसेवक पदाचे उमेदवार दीपक नाना देशमुख यांनी निवडणूक अधिकाऱ्यांच्या पक्षपाती भूमिकेबाबत गंभीर मुद्दे जनतेसमोर मांडले आहेत. सध्या सुरू असलेल्या येथील नगर परिषद निवडणुकीत अधिकाऱ्यांनी घेतलेली जगजाहीर पक्षपाती भूमिका सर्व राज्य बघत आहे. अर्ज छाननी प्रक्रियेत निवडणूक अधिकारी अरविंद लाटकर, व्यंकटेश मुंडे, त्र्यंबक कांबळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी घेतलेल्या निर्णयां विरोधात आमचे सहकारी कोर्टात गेले होते.  कोर्टाने निवडणूक अधिकाऱ्यांचे पाच पैकी चार निर्णय फेटाळले आणि एक प्रकरण उच्च न्यायालयात सुरू आहे. या सर्व जागांची निवडणूक सध्याच्या निवडणूक कार्यक्रमानुसार २० डिसेंबर रोजी होणार आहे. दिवसाढवळ्या निवडणूक अधिकाऱ्यांचे प्रताप जनता बघत आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. संध्या दीपक नाना देशमुख यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करूनही दोषी अधिकाऱ्यांवर कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे ...

महत्त्वपूर्ण मागणी.....

इमेज
तीव्र थंडी! शाळेच्या वेळा बदलण्याची मनोहर मुंडे यांची जोरदार मागणी परळी : परळीसह राज्यभरात वाढलेल्या तीव्र थंडीमुळे विद्यार्थ्यांचे हाल होत असल्याचे सांगत शाळेचे वेळापत्रक तातडीने बदलण्याची मागणी बहुजन विकास मोर्चाचे शहराध्यक्ष मनोहरराव मुंडे यांनी राज्याच्या शालेय शिक्षण विभागाकडे रोखठोकपणे केली आहे. गेल्या काही दिवसांपासून सकाळच्या थंडीचा कडाका वाढल्याने विद्यार्थ्यांना पहाटेच उठून शाळेत जावे लागत आहे. सध्या शाळा सकाळी ७.५० वाजता भरत असल्याने लहान मुलांना आणि पालकांना थंडीचा मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे मुंडे यांनी स्पष्ट केले. थंडीची तीव्रता लक्षात घेता शाळेची वेळ सकाळी ९ वाजता करण्यात यावी, जेणेकरून विद्यार्थी व शिक्षकांची गैरसोय थांबेल, अशी ठाम मागणी त्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे नोंदवली.सकाळच्या थंडीमुळे विद्यार्थ्यांसोबतच त्यांना उठवणाऱ्या पालकांच्याही अडचणी वाढल्याचेही मुंडे यांनी स्पष्टपणे नमूद केले.
इमेज
 नगर परिषद निवणुकीच्या सुधारित कार्यक्रमानुसार शेवटच्या दिवशी ३ जणांनी घेतली माघार परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-        परळी वैजनाथ नगरपरिषदच्या निवडणुकीसाठी सुधारित निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. यानुसार बुधवार दि. १० डिसेंबर रोजी  ३ उमेदवारांनी माघार घेतली.            परळी वैजनाथ नगरपरिषदच्या निवडणुकीसाठी सुधारित निवडणूक कार्यक्रम  जाहीर करण्यात आला आहे. यात  नगरपरिषद निवडणूक मधील चार प्रभागातील जागाचा समावेश आहे. सुधारित निवडणूक कार्यक्रमानुसार निवडणुक आयोगाच्या परिपत्रकानुसार आक्षेप आलेल्या जागांपैकी प्रभाग क्रमांक ३ मधील दोन्ही जागासह प्रभाग क्रमांक ९ अ, प्रभाग क्रमांक १४ ब या जागेवरची निवडणूक दि.२० डिसेंबर रोजी होणार आहे. निवडणूक कार्यक्रम वेळापत्रक  १.नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याचा अंतिम दिनांक दि. १०/१२/२०२५, दुपारी ०३.०० वाजेपर्यंत  २.आवश्यकतेप्रमाणे निवडणूक चिन्ह नेमून देणे व अंतिम उमेदवारांची यादी प्रसिध्द करणे दि. ११/१२/२०२५, ३.आवश्यक असल्यास मतदानाचा दिनांक दि. २०/१२/२०२५, सकाळी ७.३० ते...

भावपूर्ण श्रद्धांजली.....!

इमेज
कष्टकऱ्यांसाठी लढणारे ज्येष्ठ समाजवादी नेते बाबा आढाव यांचं निधन पुणे : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा शेतकरी आणि कामगार नेते बाबा आढाव (Baba adhav) यांचे आज रात्री 8 वाजून 25 मिनिटांनी निधन झाले, ते ९५ वर्षांचे होते. गेल्या काही महिन्यांपासून ते आजार होते, त्यांतच त्यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दोन दिवसांपूर्वीच, शरद पवार हे बाबा आढावांच्या भेटीला रुग्णालयात गेले होते. पुना (Pune) हॉस्पिटलमध्ये बाबा आढाव यांच्यावर उपचार सुरु असताना त्यांनी रुग्णालयात जाऊन विचारपूस केली होती. तर, गेल्याच आठवड्यात ज्येष्ठ समाजवादी नेते पन्नालाल सुराणा यांचे निधन झाले होते. तेव्हाही शरद पवारांनी सोशल मीडियावर पोस्ट करत पन्नालाल सुराणा यांच्या कार्याची आठवण काढत त्यांना आदरांजली वाहिली होती. बाबा आढाव यांना गेल्या 10 ते 12 दिवसांपासून पुना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आले होते. हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अभिजित वैद्य व तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर आ...

दुर्दैवी घटना.....

इमेज
विहिरीत पडलेल्या पत्नीला वाचवायला गेलेल्या पतीसह दोघांचाही बुडून मृत्यू   केज :- विहिरीत पाणी काढताना पाय घसरून पडलेल्या पत्नीला वाचविताना पत्नीसह पतीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना केज तालुक्यातील वाघेबाभूळगाव येथे घडली आहे.  पवारवाडी ता. केज येथील शेतकरी भास्कर विनायक पवार यांच्यासह त्यांची पत्नी अल्का पवार व मुलगा ऋषिकेश हे तिघे ५ डिसेंबर रोजी वाघेबाभूळगाव शिवारातील शेतात खुरपणी करीत होते. दुपारी ४:१५ वा.च्या सुमारास अल्का पवार या पिण्यासाठी पाणी विहिरीतून पाणी काढत असताना पाय घसरून विहिरीत पडल्या. त्यांना वाचविण्यासाठी त्यांचे पती भास्कर पवार यांनी विहिरीत उडी मारून पत्नीला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र अल्का पवार व भास्कर पवार या दोघा पती-पत्नीचा विहिरीच्या पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांचे मृतदेह विहिरीतून बाहेर काढून नांदूरघाट येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. सुग्रीव शंकर पवार यांच्या खबरी वरून केज पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक अशोक सोनवणे हे करीत आहेत.

भावपूर्ण श्रद्धांजली.......!

इमेज
शहीद जवान प्रशांत सेप यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार जळकोट: केंद्रिय रिझर्व्ह पोलिस फोर्स, लातूर येथे कार्यरत असलेले काॅन्सटेबल प्रशांत अमृत सेप यांचा अपघात होऊन ते शहीद झाले. बोरगाव खूर्द (ता. जळकोट ) या त्यांच्या मूळ गावी आज ता. 8 रोजी त्यांचेवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पश्चात आई वडील, पत्नी व दोन लहान मुले असा परिवार आहे. काल ता. 7 रोजी मांजरा साखर परिसर, लातूर येथे झालेल्या अपघातात त्यांचे निधन झाले होते. त्यामुळे त्यांच्या बोरगाव खूर्द या गावावर शोककळा पसरली आहे. देश रक्षणाची शपथ घेतली, प्राणांपेक्षा कर्तव्य मोठे ठेवले, सेवा करीत असतानाच वीर हृदय शांत झोपी गेलं अशी भावपूर्ण श्रद्धांजली त्यांना अर्पण करण्यात आली.प्रशांत अमृत सेप या वीराला आमचे शतशः प्रणाम व कृतज्ञतापूर्वक स्मरण अशा सद्गदित भावना ग्रामस्थांनी व्यक्त केल्या आहेत. गरुडझेप मित्र मंडळ, बोरगाव खूर्द यांच्या वतीने या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त करण्यात आला आहे. अत्यंत शोकाकुल वातावरणात आणि शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पंचक्रोशीतील राजक...

डोंगर पिंपळा परिसरात दहशत.....

इमेज
  हिंस्त्र श्वापदाने पाडला सात शेळ्यांचा फडशा अंबाजोगाई (प्रतिनिधी) : - अंबाजोगाई तालुक्यातील डोंगर पिंपळा शिवारात एका अज्ञात आणि हिंस्त्र श्वापदाने मोठा हाहाकार माजवल्याचे आढळून आले आहे. रविवारी रात्री या श्वापदाने एका शेतकऱ्याच्या गोठ्यात घुसून तब्बल सात शेळ्यांना ठार केले. या घटनेमुळे संबंधित शेतकऱ्याचे १ लाखांहून अधिक रुपयांचे नुकसान झाले असून या घटनेमुळे परिसरात प्रचंड दहशत पसरली आहे. डोंगर पिंपळा येथील शेतकरी बळीराम बाबुराव केंद्रे हे आपल्या शेतात जोडधंदा म्हणून त्यांनी शेळीपालन सुरू केले होते. या शेळीपालनासाठी शेतातच त्यांनी शेड उभारले आहे. केंद्रे यांच्याकडे सहा मोठ्या शेळ्या आणि एक लहान पिल्लू असे एकूण सात शेळ्यांचे पशुधन होते. रविवार, दि. ७ डिसेंबर २०२५ रोजी रात्री १० वाजता त्यांनी शेळ्यांना चारापाणी करून ते झोपण्यासाठी गेले. मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात हिंस्त्र श्वापदाने त्यांच्या शेडवर हल्ला केला. या हिंस्त्र श्वापदाने गोठ्याच्या संरक्षणासाठी लावलेल्या सहा फूट उंचीच्या जाळीवरून सहज उडी मारून आत प्रवेश केला. आत शिरताच त्याने सातही शेळ्यांना ठार मारून त्यांचा फडशा पाडला...

सविस्तर निवेदन केलं सादर....

इमेज
पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांची भेट : सौ.संध्या दीपक देशमुख व दीपक देशमुख यांना तत्काळ संरक्षण देण्याची मागणी बीड (प्रतिनिधी) – परळी वैजनाथ नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. संध्या दीपक देशमुख व त्यांचे पती माजी नगरसेवक दीपक रंगनाथ देशमुख यांच्या जीवितास व सुरक्षिततेस धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून, त्यांना तत्काळ पोलीस संरक्षण देण्याची मागणी करण्यात आली आहे.या संदर्भात माजी नगराध्यक्ष दीपक  देशमुख यांनी बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. यापूर्वी खासदार बजरंग सोनवणे यांनी दिनांक २९ नोव्हेंबर २०२५ रोजी मुख्यमंत्र्यांना लेखी पत्र देऊन सौ. संध्या देशमुख व दीपक देशमुख यांना संरक्षण देण्याची मागणी केली होती.          निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, सध्या परळी शहरात निवडणूक काळात होत व आहे असलेल्या कथित गैरप्रकारांमुळे तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून, कोणत्याही क्षणी अनुचित घटना घडण्याची शक्यता नाकारता येत...

स्थानिक गुन्हे शाखा बीड याची कारवाई

इमेज
  जलद तपास: परळीजवळ डोळ्यात मिरचीची पुड टाकुन जबरी चोरी करणारी टोळी जेरबंद परळी वैजनाथ, एमबी न्यूज वृत्तसेवा...        परळीजवळ तरुणाच्या डोळ्यात चटणी टाकून चार जणांनी सोन्याची चैन, अंगठ्या असा २ लाख २० हजार रुपयाचा ऐवज पळविल्याची घटना दि.5 रोजी घडली होती.याचा जलद तपास करीत स्थानिक गुन्हे शाखा बीड च्या पथकाने जबरी चोरी करणारी टोळी जेरबंद  केली आहे.    धारावती तांडा रोडवर जिम करून येणाऱ्या तरुणाच्या गाडीला धडक देऊन चाकूचा धाक दाखवून डोळ्यात चटणी टाकून २ लाख २० हजार रुपयाचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी ४ जणां विरुद्ध परळी ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल कारण्यात आला होता. धारावती तांडा येथील यशवंत प्रेमदास पवार हे 5 डिसेंबर रोजी सायंकाळी 7.30 वाजता हे व्यायाम करून परळीवरून धारावती तांड्याकडे मोटारसायकलवरून जात असताना, काळरात्री देवी मंदिर रोडवर एका बंद  धाब्यासमोर दोन मोटारसायकलवरून आलेल्या चार आरोपींनी त्यांचा पाठलाग करत अचानक धडक दिली. तोंडाला मास्क लावून त्यापैकी एकाने चाकू दाखवून धमकावले, तर दुसऱ्याने त्यांच्या डोळ्य...

पहिला हप्ता रुपये २९५०/- ने मिळणार

इमेज
  ओंकार साखर कारखाना ( वैद्यनाथ ) देणार प्रति मे. टन रु. ३०५०/ दर  परळी वैजनाथ, प्रतिनिधी....         दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी स्थापन केलेल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यात हे रूपांतर आता ओंकार साखर कारखान्यात झालेले आहे. कारखान्याच्या यावर्षीच्या गळीत हंगामात ऊस उत्पादकांना ३०५० दर जाहीर करण्यात आला आहे. या अनुषंगाने पहिला हप्ता 2950 प्रति मे.टन दराने शेतकऱ्यांना मिळणार आहे. याबाबतची अधिकृत घोषणा कारखाना प्रशासनाने आज पत्रकार परिषद घेऊन केली आहे.               चेअरमन बाबुरावजी बोत्रे पाटील  यांच्या मार्गदर्शनाखाली ओंकार साखर कारखाना प्रा. लि. युनिट क्र. ८ पांगरी ता. परळी वैजनाथ जि. बीड कारखाना व्यवस्थापनाने गळीत हंगाम २०२५-२०२६ साठी गाळपास येणाऱ्या ऊसाचा दर निश्चित केला आहे. यंदाच्या हंगामासाठी कारखान्याकडून प्रति मे. टन रु. ३०५०/- दर जाहीर करण्यात आलेला आहे.  गळीतास येणाऱ्या ऊसाला पहिला हप्ता रुपये २९५०/- प्रति मे. टन व दीपावली सणासाठी दुसरा हप्ता रुपये १००/- प्रति मे. टन दर देण्याचा निर्णय ...

अखेर डॉ.भालचंद्र वाचनालय उघडले......

इमेज
  नगर परिषद कार्यालय डॉ.भालचंद्र वाचनालयात स्थलांतरित  परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-        परळी नगर परिषद निवडणुकित मतदान झालेल्या मतदान यंत्रे नगर परिषद कार्यालयात ठेवण्यात आले आहेत. त्याठिकाणी निवडणूक व पोलिस प्रशासनाने गुरुवार ४ डिसेंबर रोजी नगरपालिकेची संपुर्ण इमारत सील केली होती. या पार्श्वभूमीवर नगरपालिकेचे दैनंदिन कामकाज डॉ.भालचंद्र वाचनालयाच्या इमारतीत हलवण्याचा निर्णय नगरपालिका प्रशासनाने घेतला होता. त्यानंतर सोमवार दि. ०८ डिसेंबर पासून डॉ.भालचंद्र वाचनालयाच्या इमारतीत नगर परिषद सर्व विभागातील कामकाज सुरू करण्यात आले.           नगर परिषद निवडणूक मतदान २ डिसेंबर रोजी शांततेत पार पडले. परळी शहरातील ८८ बुथवरील मतदान यंत्रे निकालापर्यंत ठेवण्यासाठी नगर पालिका इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर स्ट्रॉगरुम तयार करण्यात आले आहेत. त्या ठिकाणी मतदान यंत्रे ठेवण्यात आली. मतदान यंत्राच्या सुरक्षेच्या दृष्टीने २१ डिसेंबर पर्यंत या रुमच्या बाहेर सीसीटीव्ही कॅमेरे बसवुन ते पहाण्यासाठी पार्किंगच्या जागेत मॉनिटर बसवुन व्यवस्था करण्यात आली आह...

शहरातील विविध भागातही असे सर्रास प्रकार....

इमेज
परळीत प्लॉटींग मालकाकडुन पंधरा फुटाच्या नालीवर अतिक्रमणाचा प्रयत्न ; नागरिकांच्या रोषानंतर न.प.ला जाग परळी (प्रतिनिधी)  परळी शहरातील नेहरू चौक भागात असलेल्या जुन्या प्रभात टॉकीजच्या जागेवर राहुल अरुण टाक हे प्लॉटींगचा व्यवसाय करत असुन यासाठी त्यांनी रस्त्यालगत असलेल्या पंधरा फुटाची नाली बुजवुन अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केल्यानंतर या भागातील नागरीकांनी यास विरोध केला.न.प.प्रशासनाकडुन सदरील अतिक्रमण काढुण घेण्याच्या सुचना टाक यांना दिल्या आहेत.  परळी शहर व परिसरात प्लॉटींगचा व्यवसाय करणारे राहुल अरुण टाक हे नेहरू चौक भागात असलेल्या जुन्या प्रभात टॉकीजच्या जागेवर प्लॉटींग काढत आहेत.या जागेला असलेला मुख्य रस्ता सोडुन जागेच्या शेजारी असलेल्या पधरा फुटाच्या नालीत दगड व पाईप टाकुन त्या नालीवर बांधकाम करत अतिक्रमण सुरु होते.यामुळे पंचवटी नगर,स्नेह नगर,संत सोपानकाका मंदिराकडे जाणाऱ्या वाहतुकीस अडथळा निर्माण होणार असुन बसवेश्वर कॉलनी भागातुन येणारे पावसाचे पाणी अडले जावुन परिसरातील घरांमध्ये घुसण्याच्या भितीमुळे नागरीकांनी या अतिक्रमणास विरोध करत ही बाब नगरपालिका प्रशासनाच्या समोर मांडल...

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!