हार्दिक शुभेच्छा!!!!
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईच्या परळी तालुकाध्यक्ष पदी प्रल्हाद कंडूकटले तर शहराध्यक्षपदी रंगनाथ सावजी यांची एकमताने निवड कार्याध्यक्षपदी सुमित गिरी, उपाध्यक्षपदी अरुण सपाटे तर सचिवपदी मोहन चव्हाण परळी वैजनाथ, प्रतिनिधी.... महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईच्या बीड जिल्हा शाखे अंतर्गत महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईच्या परळी तालुकाध्यक्षपदी प्रल्हाद कंडुकटले यांची तर शहराध्यक्षपदी रंगनाथ सावजी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. पत्रकार संघाची आज शासकीय विश्राम गृह येथे दैनिक दिव्यअग्निचे मुख्यसंपादक तथा जेष्ठ मार्गदर्शक प्रकाशजी सुर्यकर यांच्या अध्यक्षतेखाली व दैनिक महाराष्ट्र प्रतिमाचे संपादक ज्ञानोबा सुरवसे यांच्या प्रमुख उपस्थीतीत पत्रकार संघाचे प्रदेश संपर्कप्रमुख वैभव स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक संपन्न झाली. या बैठकीत नुतन कार्यकारिणी जाहिर करण्यात आली. ती पुढील प्रमाणे तालुकाध्यक्ष प्रल्हाद कंडुकटले (दैनिक हिंद जागृती), कार्याध्यक्ष सुमित गिरी (दैनिक बीडसत्ता), उपाध्यक्ष अरूण सपाटे (परळीचा आवाज), सचिव मोहन चव्हाण (दै.युवा मराठा) स...