लेकीच्या पदरात मुख्यमंत्र्यांनी साखर टाकली!
गहिनीनाथगडाचा भव्य विकास ही आपली मनोमन इच्छा; यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुधात साखर टाकली - ना. पंकजा मुंडे लोकांचे प्रेम, आशीर्वाद आणि डोळ्यातील आदर कायम राहण्याजोगे काम हातून घडावे हीच संत वामनभाऊ चरणी प्रार्थना पाटोदा,।दिनांक १०। मी पालकमंत्री असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून गहिनीनाथगडाच्या विकासासाठी निधी आणून विकास कामांना सुरुवात केली होती. एक लेक म्हणून अधिकाधिक भव्य दिव्य अशा गडाच्या विकासाची मनोमन इच्छा होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुधात साखर टाकली असून आज जो गहिनीनाथ गडाचा विकास सुरू आहे तो एकमेव देवेंद्र फडणवीस यांच्या मुळेच शक्य झाला आहे. त्याबद्दल आपण त्यांचे आभार मानते. त्याचबरोबर लोकांचे हे प्रेम, आशीर्वाद आणि डोळ्यातील आदर कायम राहण्याजोगे काम आपल्या हातून घडावे हीच संत वामनभाऊ चरणी आपण प्रार्थना करत असल्याची भावना राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी गहिनीनाथगडावर बोलताना व्यक्त केली. संत वामनभाऊ महाराज यांच्या सुवर्ण महोत्सवी पुण्यतिथी सोहळ्यासाठी गहिनीना...