पोस्ट्स

नोव्हेंबर ३०, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

अन्यथा करावी लागणार तुरुंगवारी...

इमेज
  बीड जिल्ह्यात निवडणूक निकालानंतर मिरवणुकांवर बंदी - पोलीस अधीक्षकांनी दिले सक्त निर्देश बीड : पोलीस अधीक्षक नवनीत कावत, बीड जिल्हा यांच्याकडून सर्व नगरपरिषद उमेदवारांना तसेच त्यांच्या समर्थकांना सक्त निर्देशित करण्यात आले आहे.बीड जिल्ह्यात निकालानंतर मिरवणुकांवर बंदी असुन कायद्याच्या विरोधात जाईल असे कोणतेही कृत्य करण्याचे टाळावे असे पोलीस अधीक्षकांनी  सक्त निर्देश दिले आहेत.        आज होणाऱ्या मतमोजणीच्या निकालानंतर कोणत्याही प्रकारची मिरवणूक, रॅली, विजयी जल्लोष, घोषणा, फटाके फोडणे किंवा जमाव जमविण्यास पोलीस प्रशासनातर्फे कोणतीही परवानगी देण्यात येणार नाही.तसेच  जिल्हाधिकारी, बीड यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 चे कलम 37(1)(3) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश निर्गमित केले असून, सदर आदेश दि. 19/12/2025 रोजी रात्री 00.01 वा. पासून ते दि. 02/01/2026 रोजी रात्री 24.00 वा. पर्यंत लागू राहतील. विनापरवाना मिरवणूक काढणे, जमाव करणे, रस्ते अडविणे किंवा सार्वजनिक शांतता भंग होईल असा कोणताही प्रकार पूर्णतः प्रतिबंधित आहे.         आदेशाचे उल...
इमेज
  एडस् बाधितांना वाळीत टाकू नका-डॉ. बालाजी फड जागतिक एड्स दिन उत्साहात साजरा   परळी वैजनाथ दि.०६ (प्रतिनिधी)     शहरातील लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयाचा राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि रेड रिबन क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागृती करण्यासाठी महाविद्यालयामध्ये विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.            या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. विद्या देशपांडे तर प्रमुख पाहुणे म्हणून उपजिल्हा रुग्णालयातील डॉ.बालाजी फड, डॉ. कविता कराड, समुपदेशक शरद चव्हाण यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या स्वागतानंतर राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी डॉ.व्ही.बी. कवडे यांनी प्रास्ताविक मांडले. त्यात त्यांनी जागतिक एड्स दिनाचा ऐतिहासिक व सामाजिक व आढावा घेतला. त्यानंतर डॉ.कराड मॅडम यांनी एडस् कशामुळे होतो ? त्याच्यावर कोणते उपचार उपलब्ध आहेत याविषयी सविस्तर सांगून  त्याच्या प्रतिबंधात्मक उपायांविषयी सविस्तर मार्गर्शन केले. याच विषयाला विस्तार...
इमेज
  प्रधान सचिव  सागर डोईफोडे यांचा फुलचंद कराड यांनी केला सत्कार परळी वैजनाथ, (प्रतिनिधी)ः- देशभरातील पाचवे ज्योतिर्लिंग म्हणून भाविकांत ओळख असलेल्या प्रभू वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाचे दीव-दमन-दादर-नगर-हवेली येथील पर्यावरण, वने, आरोग्य पोर्ट, वैद्यकिय, शिक्षण विभागाचे प्रधान सचिव (भारत सरकार) सागर डोईफोडे  यांनी सहपरिवार प्रभू वैद्यनाथाचे दर्शन घेतले.  प्रधान सचिव (भारत सरकार) सागर डोईफोडे साहेब हे दोन दिवसाच्या परळी दौर्‍यावर आले असता त्यांनी फुलचंद कराड यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी सागर डोईफोडे यांच्याशी विविध विषयावर चर्चा करण्यात आली. चर्चेत वैद्यनाथ दूध डेअरी प्रकल्पाविषयी श्री कराड यांनी माहिती दिली. तुप, दहि, दूध, ताक असे विविध उत्पादन करण्यात येत असल्याने श्री कराड यांनी सांगितले. दरम्यान, मा.श्री.सागर डोईफोडे व पीआरओ किशोर सानप यांचा फुलचंदराव कराड यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देवून फेटा बांधून सत्कार करण्यात आला. या प्रसंगी पाटलोबा मुंडे, प्रदीप आंधळे, संदिपान आंधळे, माऊली फड, नाथराव केंद्रे, दादाराव चव्हाण, संभाजी केंद्रे, बंडापल्ले, सुरेश मुंड...
इमेज
  मांडवा येथील काळभैरवाचे फुलचंद कराड यांनी घेतले दर्शन परळी वैजनाथ, (प्रतिनिधी)ः- परळी तालुक्यातील मांडवा येथील ग्रामदैवत श्री काळभैरवाचा वार्षिक उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. यानिमित्त शिवसेनेचे (शिंदेगट) महाराष्ट्र समन्वयक तथा भगवान सेनेचे सरसेनापती फुलचंदराव कराड यांनी मांडवा येथे जाऊन श्री काळभैरवाचे दर्शन घेतले. श्री काळभैरवाच्या वार्षिक उत्सवानिमित्त गुरूवारी (दि.4) ह.भ.प.रामायणाचार्य रामेश्वर महाराज महाजन यांचे काल्याचे किर्तन झाले. या किर्तनात फुलचंदराव कराड यांनी सहभाग नोंदवला तसेच महाप्रसादाचा लाभही घेतला. यावेळी मांडवा गावचे माजी सरपंच सुंदर मुंडे, डॉ.संतोष मुंडे, पंचायत समितीचे माजी सभापती प्रभाकर फड, डॉ.मधुकर आघाव, संदिपान आंधळे, मोहन साखरे, कृष्णा चाटे, अरूण दराडे, कृष्णा नागरगोजे, अरूण फड आदी उपस्थित होते. याप्रसंगी फुलचंदराव कराड यांचा श्री काळभैरवाची प्रतिमा देवून गावकर्‍यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
इमेज
  वैद्यनाथ कॉलेज मध्ये  महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे माणुसकीचे प्रेरणास्त्रोत - प्राचार्य डॉ. जगदीश जगतकर परळी - वै.  प्रतिनिधी...       जवाहर एज्युकेशन सोसायटीच्या वैद्यनाथ कॉलेज येथे महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने प्राचार्य,डॉ. जगदीश जगतकर यांनी महाविद्यालयात विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जे व्ही जगतकर यांनी भारतरत्न डॉबाबासाहेब आंबेडकर हे माणुसकीचे प्रेरणास्त्रोत होते असे गौरव उद्गार या प्रसंगी काढले. कार्यक्रमाच्या व्यासपीठावर महाविद्यालयाचे  प्राचार्य, डॉ. जगदीश जगतकर , उपप्राचार्य डी. के. आंधळे , उपप्राचार्य डॉ.  विनोद गायकवाड, उपप्राचार्य प्रा.हरीश मुंडे , यांची उपस्थिती होती.         या कार्यक्रमात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे व्ही जगतकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेवर प्रकाश टाकताना मानवतेचा संदेश संपूर्ण देशाला दिला. त्याचबरोबर डॉ. बाबासाहेबां...

जिरेवाडी च्या श्रीसोमेश्वर मंदिरातील चोरी प्रकरण....

इमेज
  देवाच्या घरात चोरी करणाऱ्या पाच जणांना पोलीसांनी पकडले : 8 तारखेपर्यंत पोलीस कोठडी परळी वैजनाथ, प्रतिनिधी...      दिनांक 25/11/2025 रोजी रात्री 10.30 वा.ते दिनांक 26/11/2025 रोजी सकाळी 05.00 वा.च्या दरम्यान जिरेवाडी ता. परळी वैजीनाथ जि. बीड येथील सोमेश्वर संस्थानाचे मंदिराचे सभागृहाचे गेटचे कुलूप तोडुन आत प्रवेश करुन मंदिराचे गाभा-यातील दानपेटीचे कुलुप तोडुन अज्ञात चोरट्यांनी चोरी करुन मंदिरातील दानपेटीतील रक्कम अंदाजे 30,000/- रुपये व मौल्यवान दागीने चांदीची चंद्रकोर, एक ग्राम वजनाचे सोन्याचे टाक चोरले होते. त्यावरुन फिर्यादी पाटलोबा सिताराम मुंडे वय 45 रा.जिरेवाडी सोमेश्वर संस्थान जिरेवाडी समिती उपाध्यक्ष रा. जिरेवाडी ता. परळी वैजीनाथ यांच्या फिर्यादीवरुन पोलीस स्टेशन परळी ग्रामीण गुरनं. 499/2025 कलम 331(4), 305 (अ) बीएनएस प्रमाणे दिनांक 26/11/2025 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.      नमुद गुन्हयाचा बारकाईने तपास करुन आणि गोपनिय बातमीदारांकडुन सदर गुन्हयातील आरोपींबाबत अधिक माहिती प्राप्त करुन घेऊन 1) वैभव विष्णु कोकरे वय 19 रादौनापूर तालुका प...

प्रा.डाॅ.सिद्धार्थ तायडे यांचा विशेष लेख.....

इमेज
  आंबेडकरी चळवळ: एक सखोल चिंतन  ६ डिसेंबर १९५६ रोजी प्रज्ञासूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणाने भारतीय समाजजीवनात एक मोठी पोकळी निर्माण झाली. आज ६९ वर्षांनंतरही त्यांचे विचार आणि त्यांनी प्रस्थापित केलेली आंबेडकरी चळवळ कोट्यवधी लोकांसाठी प्रेरणास्रोत आहे. या महापरिनिर्वाण दिनानिमित्त, या चळवळीने भूतकाळात काय साधले, आज तिची स्थिती काय आहे आणि भविष्यात तिची दिशा काय असेल, याचे सखोल चिंतन करणे काळाची गरज आहे. *उद्दिष्टे आणि क्रांतीचा कालखंड*:- विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेली चळवळ केवळ राजकीय किंवा आर्थिक सुधारणांची मागणी नव्हती, तर ती भारतीय समाजाच्या मूळाशी असलेल्या जातिव्यवस्थेविरुद्धची सामाजिक-सांस्कृतिक क्रांती होती. अस्पृश्य मानल्या गेलेल्या समाज घटकांना 'माणूस' म्हणून जगण्याचा हक्क मिळवून देणे, त्यांना सामाजिक समता, स्वातंत्र्य आणि न्याय प्रदान करणे हे मूलभूत उद्दिष्ट होते. मनुस्मृतीचे दहन, महाडचा सत्याग्रह, काळाराम मंदिर प्रवेश यांसारख्या कृतिशील आंदोलनातून समाजाला आत्मसन्मानाची जाणीव करून दिली. भारतीय संविधानाची निर्मिती हे या चळवळीचे सर्वा...
इमेज
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भीमवाडी मित्र मंडळाच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर ;35 रक्तदात्यांनी केलं रक्तदान परळी / प्रतिनिधी....     विश्वरत्न ,बोधिसत्व परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त परळी येथील भिमवाडी मित्र मंडळाच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील भिमवाडी मित्र मंडळाच्या युवकांनी रक्तदानाच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. या रक्तदान शिबिरात 35 रक्तदात्यांनी रक्तदान केले .रक्तदात्यांचा यावेळी सन्मान पत्र देऊन सन्मान करण्यात आला.   या रक्तदान शिबिराचे उद्घाटन  परळी संभाजी नगर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक अनिल शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी मनोहर मुंडे ,सुनील कांबळे , महेंद्र रोडे,शरण मस्के, राहुल गोदाम , यशपाल मुंडे, तथागत धाटे, रवी मुळे ,सचिन रोडे, राहुल इंगळे, कपिल गायकवाड ,विजय व्हावळे ,सनी कसबे यांच्यासह भीमवाडी येथील युवक उपस्थित होते.
इमेज
उम्मीद पोर्टलवरील वक्फ नोंदणीची अंतिम तारीख वाढवावी: मौलाना इलियास खान फलाही परळी, प्रतिनिधी : 2009 ते 2025 या सोळा वर्षांच्या कालावधीत वक्फ नोंदी डिजिटल करण्यास सरकार अपयशी ठरले आहे. आतापर्यंत वेबसाइटवर अपलोड केलेला डेटा अपूर्ण, चुकाांनी भरलेला असून त्यात जिओ-टॅगिंगचाही अभाव आहे. म्हणजेच, सर्व प्रशासकीय यंत्रणा असूनही सरकार स्वतः रेकॉर्ड अपलोड करू शकलेले नाही, आणि उलट जनतेला काही महिन्यांत हे काम पूर्ण करण्यास सांगितले जात आहे. त्यामुळे सरकारने वक्फ नोंदणीची अंतिम तारीख वाढवावी, अशी मागणी जमाअत-ए-इस्लामी हिंद, महाराष्ट्रचे अध्यक्ष मौलाना इलियास खान फलाही यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या निवेदनात केली. आपल्या निवेदनात मौलानांनी म्हटले आहे की भारत सरकारच्या 'उम्मीद पोर्टल'वर वक्फ नोंदणीची अंतिम तारीख 6 डिसेंबर दर्शवली जात आहे, आणि अजूनही मोठ्या प्रमाणात नोंदणीचे काम शिल्लक आहे. जमाअत-ए-इस्लामी हिंद, महाराष्ट्रचे अध्यक्ष यांच्या मते, पोर्टलची गती अत्यंत मंद असल्याने नोंदणी पूर्ण होत नाही आहे. अनेक दिवसांपासून पोर्टल खूपच धीमे चालत असल्यामुळे वक्फ मालमत्तांच्या नोंदणीमध्ये अडचणी ...
इमेज
  गटशिक्षणाधिकारी कार्यालयाच्या वतीने राष्ट्रीय सुवर्णपदक विजेती आभा मुंडेसह परळीतील जलतरणपटूंचा सत्कार  परळी वैजनाथ (प्रतिनिधी)....       गटशिक्षणाधिकारी कार्यालयाच्या वतीने जलतरण क्रीडा क्षेत्रात राष्ट्रीय तथा राज्यस्तरीय पातळीवर उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या परळीतील जलतरणपटूंचा सत्कार झी लिटेरा स्कूलच्या सभागृहात उत्साहात संपन्न झाला. राष्ट्रीय पातळीवर दिव्यांग जलतरणात सलग दोन वर्ष पाच : पाच सुवर्णपदकांची कमाई तसेच पहिल्या वहिल्या राष्ट्रीय दिव्यांग योगासन स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई करून परळीच नव्हे तर बीड जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करणाऱ्या आभा गणेश मुंडे हिचा यावेळी विशेष गौरव करत पहिल्याच प्रयत्नात जलतरणात राज्यस्तरापर्यंत मजल मारणाऱ्या चिरंजीव वरद लांडगे, कुमारी सिद्धी चाटे, कुमारी राजनंदिनी चाटे, कुमारी आर्या वेरुळे यांच्यासह उदयोनमुख जलतरणपटू कुमारी स्वरा चाटे यांचाही यावेळी गटशिक्षणाधिकारी कार्यालयाच्या वतीने शाल, श्रीफळ, पुष्पहार देत फेटा बांधून सत्कार करण्यात आला.    याबाबत अधिक माहिती अशी की, परळी तालुक्याची भूमिपुत्र असणाऱ्या कु. आभा मुंडे हि...

खा.बजरंग सोनवणे यांची केंद्रीय अल्पसंख्याक कार्यमंत्री किरण रिजिजू यांच्याकडे मागणी

इमेज
  उमेद पोर्टलवरील अडचणी वाढल्या; वक्फ संपत्ती अपलोडसाठी तारीख वाढवा खा.बजरंग सोनवणे यांची केंद्रीय अल्पसंख्याक कार्यमंत्री किरण रिजिजू यांच्याकडे मागणी बीड: वक्फ संस्थांच्या संपत्तीचे ऑनलाईन नोंदणीकरण उमेद पोर्टलवर सुरू असताना गेल्या काही दिवसांपासून या पोर्टलला गंभीर तांत्रिक अडचणी येत असल्याने नोंदणीचे काम ठप्प झाले आहे. यामुळे वक्फ संपत्ती अपलोडसाठी अंतिम तारीख वाढवावी, अशी मागणी खा.बजरंग सोनवणे यांनी केंद्रीय अल्पसंख्याक कार्यमंत्री किरण रिजिजू यांची भेट घेत पत्राद्वारे केली आहे.      खा.बजरंग सोनवणे यांनी केंद्रीय अल्पसंख्याक कार्यमंत्री किरण रिजिजू यांची त्यांच्या कार्यालयात जात भेट घेतली. यावेळी वक्फ संपत्ती अपलोडच्या संदर्भात येणाऱ्या अडचणीबाबत सविस्तर चर्चा देखील केली. यावेळी रिजिजू यांना रितसर पत्रही दिले असून पत्रात म्हटले आहे, वक्फ संपत्ती अपलोडसाठी लॉग-इन आणि क्रॅश सारख्या समस्येमुळे महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये हजारो नोंदी प्रलंबित राहत आहेत.देशभरात अद्याप फक्त ४५,११६ वक्फ संपत्तींचेच अपलोडिंग पूर्ण झाले आहे, मोठ्या प्रमाणात रेकॉर्ड व मेपिंग तपासणीत ...

योगेश्वरी देवीच्या यात्रेला भाविकांचा महापूर :मोठी गर्दी

इमेज
पुर्णाहुती महापूजेने श्री. योगेश्वरी मार्गशीर्ष महोत्सवाची सांगता योगेश्वरी देवीच्या यात्रेला भाविकांचा महापूर मोठी गर्दी हजारो भाविकांनी घेतले योगेश्वरी देवीच्या पालखीचे दर्शन अंबाजोगाई(प्रतिनिधी) :- अंबाजोगाई शहराचे ग्रामदैवत श्री योगेश्वरी देवीच्या दि २७ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर दरम्यान संपन्न झालेल्या मार्गशीर्ष महोत्सवाची सांगता शुक्रवारी दुपारी होमहवन व पुर्णाहुती महापूजेने झाली. देवल कमिटीचे पदसिद्ध अध्यक्ष तथा तहसीलदार विलास तरंगे व  सुविद्य पत्नीच्या उपस्थितीत पुर्णाहुती व महापुजा संपन्न झाली. महापुजेनंतर योगेश्वरी देवीच्या होमात श्रीफळ टाकण्यासाठी भाविकांनी एकच गर्दी करत देवीच्या दर्शनासाठी  भाविकांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. अंबाजोगाई शहरासोबतच संपूर्ण महाराष्ट्राची कुलस्वामिनी माता श्री योगेश्वरी देवीची यात्रा गुरुवार दि ४ रोजी मोठ्या  सांस्कृतिक परंपरेनुसार  व उत्साहात संपन्न झाली. महापूजेनंतर आठ नऊ दिवस मंदिरात बसलेल्या आराध भक्त आपापल्या गावी जाण्यासाठी निघतांना मोठी गर्दी झाल्याचे दिसून आले.        गुरुवारी योगेश्वरी देवीच्या...
इमेज
  श्री.काळभैरव देवस्थान यात्रेला उत्साहपूर्ण सुरुवात  आज पालखी सोहळा , काल्याचे कीर्तन व महाप्रसादचा लाभ घ्यावा  मांडवा (परळी वैजनाथ) प्रतिनिधी :- श्री काळभैरव देवस्थान मांडवा यात्रेचा शुभारंभ 27 नोव्हेंबर रोजी भक्तिमय वातावरणात झाला. या यात्रेनिमित्त सात दिवसांच्या भव्य कथेचे आयोजन करण्यात आले होते. नामवंत कीर्तनकारांनी दररोज उपस्थित राहून भागवत कथा,कीर्तन, प्रवचन आणि भक्तिसंगीताचा आनंद भक्तांना दिला. सात दिवस चाललेल्या या धार्मिक कार्यक्रमांना गावकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत अन्नदान व दानधर्मातही सहभागी होऊन परंपरा जपली. उद्या पासून मार्गशीर्ष पौर्णिमे निमित्त श्री काळभैरव देवस्थानचा मुख्य यात्रा उत्सव पार पडणार आहे. यानिमित्त देवाची महापूजा, शृंगार आरती, महाप्रसाद असे धार्मिक विधी होणार असून पालखीची भव्य मिरवणूक गावभरातून निघणार आहे. संपूर्ण गावात उत्सवाचे वातावरण निर्माण झाले आहे. आज ह.भ.प.रामायणाचार्य रामेश्वर महाराज महाजन यांचे दुपारी १ ते ३ काल्याचे कीर्तन होईल व महाप्रसाद आयोजन केले आहे मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे या विद्युत रोषणाईने परिसर उ...
इमेज
  सर्व नगरपरिषदा व नगरपंचायत निवडणुकांची मतमोजणी २१ डिसेंबरला: मतदानोत्तर चाचण्यांच्या निष्कर्षांना २० डिसेंबरपर्यंत बंदी मुंबई, दि. ०२ (रानिआ): राज्यातील सर्व २८८ नगरपरिषदा व नगरपंचायतींची मतमोजणी २१ डिसेंबर २०२५ रोजी करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे. त्याचबरोबर मतदानोत्तर चाचण्यांचे निष्कर्षही २० डिसेंबर २०२५ रोजी मतदान संपल्याच्या पुढील अर्ध्या तासापर्यंत जाहीर करता येणार नाहीत, असेही न्यायालयाच्या आदेशात नमूद केले आहे. न्यायालयाच्या आदेशाच्या अनुषंगाने राज्य निवडणूक आयोगानेही संबंधित सर्व जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत. मतदान यंत्रांची हातळणी काळजीपूर्वक करण्यात यावी. मतदान यंत्र ठेवण्यात आलेल्या गोदामांसाठी २४ तास चोख सुरक्षा व्यवस्था तैनात करावी. सुरक्षा उपकरणे (उदा. गोदामाच्या प्रवेद्वाराबाहेरील सीसीटीव्ही, सुरक्षा आलार्म सिस्टीम, अग्निशमन यंत्रणा इ.) व्यवस्थित कार्यान्वित असल्याची खात्री करून घ्यावी. राजकीय पक्षांनी प्राधिकृत केलेल्या प्रतिनिधींना गोदामांबाबत आणि तिथल्या सुरक्षा व्यवस्थेबाबत अवगत करावे. त्याचबरोबर निवडणूक लढविणारे उमेदवा...

नवमतदारासाठी अविस्मरणीय क्षण....

इमेज
विलक्षण योगायोग : जीवनातील मतदानाचा पहिल्यांदाच बजावला हक्क- तोही स्वतःच्या आईलाच मतदान करण्याची मिळाली संधी परळी वैजनाथ , प्रतिनिधी....     निवडणुकीसाठी अठरा वर्ष पूर्ण केल्यानंतर पहिल्यांदाच प्रत्यक्ष मतदान करण्याची संधी प्रत्येकाच्या आयुष्यात येत असते. पहिल्या मतदानाचा हक्क बजावताना ची प्रत्येकाची भावना ही विलक्षणच असते. मात्र जीवनातील मतदान करण्याची पहिलीच वेळ आणि त्याच वेळेला आपले पहिले मतदान आपल्या जन्मदात्या आईलाच करण्याचे भाग्य लाभण्याची संधी परळीतील नवमतदार चि.आद्य बाजीराव धर्माधिकारी याला मिळाली आहे. हा एक विलक्षण योगायोग घडून आला आहे.              परळी वैजनाथ नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज दोन डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. या नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस व महायुतीकडून नगराध्यक्ष पदासाठी सौ पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी यांनी निवडणूक लढवली आहे. जनतेतून नगराध्यक्ष पदाची निवड असल्याने तमाम परळीकरांमधून नगराध्यक्षपदासाठी उमेदवार निवडला जाणार आहे. याचवेळी सौ. पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी यांचा मुलगा च...

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!