१०८ वाचकांकडून दररोज हनुमान चालीसा पारायण.

इमेज
धर्मापुरीत ‘अखंड हरिनाम सप्ताह व श्रीमद् भागवत कथा’ ज्ञानयज्ञास उद्यापासून प्रारंभ १०८ वाचकांकडून दररोज हनुमान चालीसा पारायण. परळी वैजनाथ (प्रतिनिधी) : तालुक्यातील धर्मापुरी येथील जागृत देवस्थान श्री रोकडेश्वर मंदिरात श्रीराम नवमी व हनुमान जयंतीनिमित्त भव्य ‘अखंड हरिनाम सप्ताह, श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ व हनुमान चालीसा पारायण’ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार, २६ मार्च रोजी दुपारी २ वाजता या भक्तिमय सोहळ्याचा शुभारंभ होणार असून परिसरात आधीच धार्मिक उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण म्हणजे ख्यातनाम ह.भ.प. भागवताचार्य कांतादेव महाराज (दादाहरी वडगावकर) यांच्या रसाळ वाणीतून सादर होणारी ‘श्रीमद् भागवत कथा’ होय. दररोज दुपारी १ ते ४ या वेळेत कथा होणार असून अध्यात्म आणि विज्ञानाची सांगड घालत भाविकांना सखोल कथाश्रवणाचचा मिळणार आहे. सप्ताहानिमित्त कीर्तन महोत्सवाचेही आयोजन करण्यात आले असून, महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांची उपस्थिती लाभणार आहे. दररोज रात्री ८ ते १० या वेळेत ह.भ.प. लिंबाजी महाराज आळंदीकर, ह.भ.प. श्रीकांतजी महाराज आळंदीकर, ह.भ.प. सुशांत मह...

मोठ्या संख्येने उपस्थित रहा....

द्रोणाचार्य सेमी इंग्लिश स्कूल व पूजा प्राथमिक विद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे आज आयोजन




परळी वैजनाथ | प्रतिनिधी

द्रोणाचार्य सेमी इंग्लिश स्कूल व पूजा प्राथमिक विद्यालय, परळी वैजनाथ यांच्या वतीने २० वे वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले आहे. हे स्नेहसंमेलन आज बुधवार, दि. ५ फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी ३.३० वाजता लोकनेते गोपीनाथराव मुंडे नटराज रंग मंदिर, परळी वैजनाथ येथे संपन्न होणार आहे.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रामलिंग राजनळे सर (माजी मुख्याध्यापक, वैद्यनाथ विद्यालय) राहणार असून उद्घाटन  गणेश गिरी (गटशिक्षणाधिकारी, गटसाधन केंद्र, परळी वै.) यांच्या हस्ते होणार आहे. या काकार्यक्रमास बाजीराव  भैय्या  धर्माधिकारी (माजी नगराध्यक्ष),  कोकणे  (विस्ताराधिकारी),  धनंजय ढोणे  (पोलीस निरीक्षक),  दिवाकर जोशी (गझलकार), प्रा. रविंद्र जोशी सर (पत्रकार,  दैनिक पुढारी), व्यंकटेश शिंदे (नगरसेवक) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

          स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांचे नृत्य, नाट्य, गीत व विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर होणार असून पालक व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष सचिन वांगस्कर, सचिव प्रभू बागल  संचालिका व मुख्याध्यापिका सौ मनीषा बागल  उपमुख्याध्यापिका उगले मॅडम  मुख्याध्यापिका सौ. रजनी बागल, उपमुख्याध्यापिका सौ. कौशल्या नानवटे व सर्व शिक्षक वृंद,कर्मचारी आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!

Accident.....

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!