डॉ.संपदा मुंडे हत्या प्रकरणी उच्च न्यायालयाचा न्यायाधीशांची नेमणूक करून सखोल चौकशी करून न्याय द्या - वसंत मुंडे परळी वैजनाथ (प्रतिनिधी) डॉ संपदा मुंडे यांच्या हत्या प्रकरणी महाराष्ट्रातील मोठ्या प्रमाणात खळबळ माजली असून यास राजकीय नेते व प्रशासन जबाबदार असल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष वसंत मुंडे यांनी केला. प्रशासनामार्फत वेगवेगळ्या समित्या चौकशी करिता नेमल्या जातात पण त्यात राजकीय व प्रशासकीय हस्तक्षेप असल्यामुळे त्यांच्या कडून निपक्ष पणे संबंधित घटनेच्या मुद्देनिहा चौकशी केली जात नाही. स्वतः मुख्यमंत्री फलटलांना जाऊन भाजपच्या राजकीय नेत्यांना चौकशी न करता अभय देतात.डॉ संपदा मुंडे ह्या गरीब शेतकरी कुटुंबातल्या असून मौजे कवडगाव तालुका वडवणी जिल्हा बीड येथील रोजंदारी करणारे कुटुंब आहे. त्या कुटुंबावर खूप मोठ्या प्रमाणात संकट कोसळले असून यामध्ये जबाबदारी राजकीय नेते व प्रशासकीय यंत्रणेमार्फत दबावापोटी हॉटेल मधुदिप आत्महत्या केली नसून हत्या करण्यात आली आहे. या हातेश जबाबदार भाजपचे माजी खा. रणजीत सिंह नाईक निंबाळकर त्...