MB NEWS:सोमवारच्या आंदोलनात उसतोड कामगारांनी सहभागी व्हावे- काॅ.सुदाम शिंदे

 सोमवारच्या आंदोलनात उसतोड कामगारांनी सहभागी व्हावे- काॅ.सुदाम शिंदे

परळीवै(प्रतिनिधि) ....

   ऊसतोडणी कामगार   वाहतुकदार, मुकादम च्या विविध  मागण्यासाठी जिल्ह्यातील गावा-गावत  सोमवार दि 21 रोजी  होणाऱ्या आंदोलनात वाहतूकदार, मुकादम व उसतोडणी कामगारांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन सिटु संलग्न असलेल्या उसतोडणी कामगार संघटनेचे कॉ सुदाम शिंदे यांनी केले आहे.

ऊसतोडणी कामगारांच्या मजुरीत व वाहतूकदारांच्या दरात वाढ करावी व मुकादमाच्या कमिशन मध्ये वाढ करावी. नवीन  त्रिपक्षीय करार करावा. वाहतुकीचे दर डिझल दरवाढी नुसार करावे. मुकादमचे कमिशन 35% करावे. उसतोड़नी कामगार महामंडळची अंमलबजावणी करावी यासह उसतोडणी मजुरांच्या प्रलंबित मागण्यासाठी सोमवारी परळी तालुक्यातील सिरसाळा, मोहा, करेवाडी, गर्देवाड़ी, कावळेवाडी, मांडेखेल, माळहिवरा, भिलेगाव, वाघाळा, बोधेगाव, यासह इतर गावातील ग्रामपंचायतीसह प्रशासकीय कार्यालयसमोर निदर्शने करण्यात येणार आहेत. या आंदोलनात  वाहतूकदार, मुकादम व उसतोडणी कामगारांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन सिटु संलग्न असलेल्या उसतोडणी कामगार संघटनेचे कॉ सुदाम शिंदे, कॉ अजय बुरांडे, कॉ. गंगाधर पोटभरे, मुरलीधर नागरगोजे, सखाराम शिंदे, विशाल देशमुख, विष्णुपंत देशमुख, मदन वाघमारे, पंडित शिंदे, विष्णु पोटभरे, बालाजी कडभाने, अशोक शेरकर, जय बनसोडे, बाबा शेरकर यांनी केले आहे.

टिप्पण्या

  1. खुप छान, साहेब , हे होयलाच पाहिजे, ह्या आंदोलनाला खुप प्रतीसाद मिळेल. धन्यवाद !

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?