MB NEWS:अखंडीत वीज पुरवठा सुरू ठेवा -शिवकुमार केदारी (Reporter-Parli vaijanath)

 विद्यार्थ्यांचा ऑनलाईन  परीक्षा काळ असल्यामुळे अखंडीत वीज पुरवठा सुरू ठेवा -शिवकुमार केदारी 



परळी वैजनाथ,प्रतिनिधी

           परळी शहरात वारंवार व दीर्घकालीन वीज पुरवठा खंडित होत आहे. सध्या उच्च शिक्षणा पर्यंत च्या सर्वच वर्गातील विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन परीक्षा सुरू आहेत व याच परीक्षा काळात दिवसभर सतत वीज पुरवठा खंडित होत आहे  त्यामुळे विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे अचानक वीज पुरवठा खंडीत झाल्यामुळे विद्यार्थ्यांचा व पालकांचा गोंधळ उडतो आहे.  विद्यार्थी व्यवस्थित परीक्षा ही देऊ शकत नाहीत. वीज पुरवठा बराच काळ खंडीत राहिल्यामुळे इंटरनेट/Wifi कनेक्शन वर ही परिणाम होत आहे ते ही जास्त कालावधीच्या विद्युत पुरवठया अभावी व्यवस्थित चालत नाही त्यामुळे विद्यार्थी जास्त अडचणीत येत आहेत. आधीच कोरोना परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांचे अतोनात शैक्षणिक नुकसान होत आहे  व त्यात त्यांनी ऑनलाईन घेतलेल्या शिक्षणाचीही ते नीट परीक्षा  देऊ शकत नाहीत. यामुळे त्यांचे पूर्णत: नुकसान होत आहे . त्यामुळे अखंडित वीजपुरवठा ठेवा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते शिवकुमार केदारी यांनी निवेदनाद्वारे केली आहे.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !