MB NEWS:देशमुख टाकळी येथील शेतकऱ्यांनी सुरू केले आमरण उपोषण(Video News)

 देशमुख टाकळी येथील शेतकऱ्यांनी सुरू केले आमरण उपोषण



परळी (प्रतिनिधी) 

 तालुक्यातील देशमुख टाकळी येथील नंबर बांधावरील रस्ता मोकळा करण्याच्या नादात नंबर बांधावरील नालीच बुजविल्याने आजुबाजुच्या शेतात पाणी साचल्याने शेतकर्यांच्या उभ्या पिकासह सोयाबिनच्या गंजी व ज्वारीचा कडबा भिजल्याने मोठे नुकसान झाले आहे. याबाबत शेतकर्यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर अमरण उपोषण सुरू केले आहे. 

    देशमुख टाकळी येथील गट नंबर 19,32,31,20,22, 23,24,25,14,08,09 व 07 या बारा गटनंबरच्या शेतातील पाणी वाहुन जाण्यासाठी नंबर बांधारुन मोठी नाली होती.यामुळे आजुबाजुच्या शेतातील पावसाचे पाणी या नालीद्वारे वाहुन जात होते. पावसाचे पाणी वाहुन नेणारी नाली बुजविली.नाली बुजविल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. रस्ता मोकळा करण्याच्या नादात संपुर्ण नालीच बुजुन टाकल्यामुळे आजुबाजुच्या शेतामध्ये तीन फुटापर्यंत पाणी साचले आहे.नुकसान भरपाई द्यावी व नाली बुजवणे, वृक्षतोडकरणे यासंदर्भात दोषींवर कारवाई करावी या मागणीसाठी शेतकरी उपोषण करीत आहेत.उपोसणकर्ते शेतकरी जगन्नाथ किशनराव शिंदे,व बन्सी ज्ञानोबा शिंदे यांनी न्याय मिळवून द्यावा अशी मागणी केली आहे.



       

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार