MB NEWS-ऑनलाईन नोंद करणाऱ्या का ऑफलाईन नोंद करणाऱ्या नागरिकाला आगोदर "लस " मिळणार ??? जिल्हा आरोग्य विभागाने स्पष्ट करावे.... प्रा पवन मुंडे "सोशल डिस्टनन्स" फज्जा उडाल्याने कोविड प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता..!

 ऑनलाईन नोंद करणाऱ्या का ऑफलाईन नोंद करणाऱ्या नागरिकाला आगोदर "लस " मिळणार ???



जिल्हा आरोग्य विभागाने स्पष्ट करावे.... प्रा पवन मुंडे

"सोशल डिस्टनन्स" फज्जा उडाल्याने कोविड प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता..!

परळी प्रतिनिधी : परळी शहर व तालुक्यात कोविड लसीकरण मोहिमेत प्रचंड गोंधळ चालू असून तासंनतास नागरिक आरोग्य केंद्रावर उभे राहून सुद्धा नागरिकांना लस मिळत नसून,ऑनलाईन नोंद केलेल्या नागरिकांना ऑफलाईन नोंद करा असे तर ऑफलाईन नोंद असलेल्या नागरिकाला ऑनलाईन नोंद करा असे सांगितले जात असून नागरिकांनी नेमकी कशी नोंद करावी याचे स्पष्टीकरण जिल्हा व परळी आरोग्य विभागाने स्पष्ट करावे असे आवाहन भाजपा नगरसेवक प्रा पवन मुंडे यांनी केले आहे.

     शहरात लसीकरणात प्रचंड गोंधळ निर्माण होत सामान्य नागरिकां बरोबर जेष्ठ नागरिकांची सुद्धा लसीकरण केंद्रावर तासंनतास रांगेत उभा राहून लस मिळत नसल्याने नागरिक परेशान होत आहेत,लसीकरण केंद्रावर "सोशल डिस्टन्स " पूर्णपणे फज्जा उडाल्याने एखाद्या लक्षणं नसणारा कोविड रुग्ण लस घेण्यासाठी आला असेल तर त्याच्या कडून इतर लोकांना सुद्या संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही ,त्याच बरोबर आरोग्य केंद्रात लसीकरण करणे बाबत संभ्रम निर्माण होईल असे मार्गदर्शन करण्यात येत असल्याने अगोदर लस नेमकी ऑनलाईन का ऑफलाईन नोंद करणाऱ्या नागरिकाला मिळणार हे सुद्धा आरोग्य प्रशासनाने स्पष्ट करावे असे आवाहन नगरसेवक प्रा पवन मुंडे यांनी केले आहे.

टिप्पण्या

  1. Ho Na सर्व मूर्खचा बाजार लावलाय.की आज 3 तास वेटींग ल थांबून आलोय TPS.la. एकतर ऑनलाइन shedule sathi 5/6 दिवस मोबाईलवर बोट ठेऊन थांबायचं एकदम तिकडून shedule भेटला तर लस फक्त ऑफलाईन नोंदणी केली त्यांनाच मिळणार.त्यात अजून सोशल दिस्तांसिंग मुळीच नाहीये.कसं काय करायचं.असला फालतू पण आरोग्य विभागाचा अजिबात खपून घेतला जाणार नाही.असे असेल तर प्रत्येक ग्रामपंचायत ल लसीकरण करण्यात यावे.जेणेकरून गर्डा कमी होईल.आणि लसीकरण सुद्धा व्यवस्थित होईल.ऑनलाइन बुकिंग करून गेलाय नंतर लिस्ट मद्ये त्यांची नावे नाहीयेत .तर ऑनलाइन बुकिंग ठेवलीच कशाला.लसीचे घोटाळे करायला का? निव्वळ माणुसकी शिल्लक राहिलेली नाहीये.एकीकडे लस न घेता लोकांना लसीकरणाचे प्रमाणपत्र देण्यात येते अरे काय चालू आहे तरी काय हे.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

Video: अमानुष मारहाण....धक्कादायक प्रकार!

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार