MB NEWS-हभप बंडामहाराज कराडकर स्थानबद्ध

हभप बंडामहाराज कराडकर स्थानबद्ध


कराड , प्रतिनिधी : गेली चार दिवसांपासून पंढरपूर आषाढी पायी वारीला परवानगी द्यावी या मागणीसाठी व वारी करणारच असा आग्रह धरून बंडातात्या कराडकर व वारकर्‍यांनी आंदोलन सुरू केले होते. त्याचाच एक भाग म्हणून शुक्रवारी तात्यांनी आळंदी येथे पोहोचून पायी वारीला सुरुवात केली होती. परंतु पोलिसांनी शनिवारी सकाळी आळंदी जवळील तापेकरवाडी येथून बंडातात्या कराडकर यांना ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना कराड तालुक्यातील करवडी येथील श्रीकृष्ण गोपालन केंद्रामध्ये आणून स्थानबद्ध केले. 
 
दरम्यान याबाबत पत्रकारांशी बोलताना बंडातात्या कराडकर यांनी सांगितले की, पंढरपूर आषाढी पायीवारी व्हावी यासाठी आमचा आग्रह होता. याच मागणीसाठी चार दिवसांपासून आमचे शांतता व संयमाच्या मार्गाने आणि वारकरी संप्रदायाच्या चाकोरीत राहून आंदोलन सुरू होते. परंतु पोलिसांनी वारकर्‍यांचे हे आंदोलन आपल्या खाक्याप्रमाणे निपटून काढण्याचा दुर्दैवी प्रयत्न केला.त्यानंतर पोलिसांनी पांडुरंग तात्या घुले व मला स्थानबद्ध केले आहे. आषाढी वारी व कोरोनाचा विचार करता वारकऱ्यांचे आक्रमक आंदोलन न करता पोलिसांचा निर्णय आम्ही मान्य केला आहे. समस्त वारकऱ्यांचा विचार करून आम्ही सध्या वारकऱ्यांना शांततेचे आवाहन करत आहे. याबाबत नंतर आंदोलन केले जाईल. परंतु आता वारकऱ्यांनी संयम ठेवावा, असेही बंडातात्या कराडकर यांनी सांगितले.

टिप्पण्या

  1. कृपया वारकरी बांधव नी संयम बाळगावा करण हा काळ संकट चा आहे पांडुरंग सर्व काही ठीक करेल साध्या तरी वारी चा आग्रह धरू नये

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

Video: अमानुष मारहाण....धक्कादायक प्रकार!

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार