इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

MB NEWS-तीस हजार रुपये लाच प्रकरणी परळी महावितरणच्या कनिष्ठ लिपिकावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई ;एका खाजगी व्यक्ती विरुद्धही गुन्हा दाखल

 तीस हजार रुपये लाच प्रकरणी परळी महावितरणच्या कनिष्ठ लिपिकावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई ;एका खाजगी व्यक्ती विरुद्धही गुन्हा दाखल



परळी वैजनाथ, प्रतिनिधी......

      वीजबिल भरणा नियमित केल्यानंतरही बिलावर थकबाकी दिसते, व्यावसायिक मिटरचा प्रकार असताना औद्योगिक वीजाकारणी होणे आदी तांत्रिक बाबी पुर्ण करून वीजबिलाचे दुरुस्तीचे वरिष्ठांकडुन काम करुन देण्यासाठी  एका नागरिकाकडून तब्बल तीस हजार रुपये लाच स्विकारल्या प्रकरणी आज दि.१ जुलै रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून परळी महावितरण कार्यालयातील कनिष्ठ लिपिक  व एक खाजगी व्यक्ती अशा दोघांवर कारवाई केली.

        याबाबत प्राप्त माहिती अशी की, परळी शहरातील तक्रारदार वीज ग्राहक यांचे मिटरचा प्रकार हा इंडस्ट्रियल मिटरचा होता. व्यावसायिक वीज मिटरला आकारण्यात येणारे वीजबीलही ते नियमितपणे भरणा करीत होते. तरीही वीजबिलावर थकबाकी दाखवली जात होती.याबाबत वारंवार लेखी व तोंडी सांगुनही या ग्राहकाचा वीजबिलाचा गुंता सुटत नव्हता. वेळोवेळी या कार्यालयात चकरा माराव्या लागत होत्या.वीजबील भरणा करुनही विनाकारण मनस्ताप सहन करण्याची वेळ आली होती.शेवटी कंटाळून या ग्राहकाने वीजवितरण चे कनिष्ठ लिपिक सचिन सुर्यवंशी यांच्याशी तडजोड केली. वीज बील दुरुस्ती प्रस्ताव वरिष्ठांकडुन मंजुरी घेऊन काम करुन देण्यासाठी लिपिक सुर्यवंशी यांनी 30 हजार रुपये लाचेची मागणी केली. याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे लेखी तक्रार अर्ज दिला होता. ठरल्याप्रमाणे  लिपिक सुर्यवंशी यांनी व खाजगी व्यक्ती नामे आरोपी शेख सगिर फकीर महमद हे आज दि.१ रोजी वीज भरणा केंद्राजवळ ३० हजार रुपये लाच स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून कारवाई केली.या प्रकरणात परळी शहर पोलिस ठाण्यात  आरोपीं विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया  उशिरापर्यंत चालू होती.लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या उस्मानाबाद घटकाच्या पथकाने ही कारवाई केली.पोलीस अधीक्षक डॉ राहूल खाडे, अप्पर पोलीस अधीक्षक मारोती पंडित, डिवाय एसपी प्रशांत संपते उस्मानाबाद, डिवाय एसपी श्री. हनपुडे, पीआय अशोक हुलगे, पोलीस हवालदार शेख, पोलीस शिपाई बेळे, चालक करडे आदींचा या कामगिरीत समावेश आहे.


टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!