इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

MB NEWS-*परळी : खा. शरदचंद्र पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त धनंजय मुंडे हस्ते 200 विधवा महिलांना मोफत पिठाच्या गिरणीचे वाटप* *रोजगाराची संधी मिळाल्याने महिलांच्या चेहऱ्यावर उमटले समाधान!* परळी (दि. 11) ---- : परळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मतदारसंघातील 200 विधवा महिलांना खा. शरदचंद्र पवार साहेबांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते मोफत पिठाच्या गिरणीचे वाटप करण्यात आले. यावेळी रोजगाराची संधी उपलब्ध झाल्याने महिलांच्या चेहऱ्यावर समाधान उमटलेले पाहायला मिळाले. उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त 15 जुलै ते 22 जुलै दरम्यान आयोजित सेवा सप्ताहात या महिलांची नाव नोंदणी करण्यात आली होती व आज खा. पवार साहेबांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला या 200 महिलांना ना. धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली व हस्ते तसेच नगर परिषद गटनेते वाल्मिक अण्णा कराड यांच्या मार्गदर्शनाखाली पिठाच्या गिरणीचे वाटप करण्यात आले. *राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेतील 7 लाभार्थीना धनादेश वितरित* याच कार्यक्रमात राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेतील 7 लाभार्थींना प्रत्येकी 20 हजार रुपयांच्या धनादेशाचे वितरण देखील ना. धनंजय मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ना. धनंजय मुंडे यांच्या सह, जिल्हा परिषद गटनेते अजय मुंडे, न.प. गटनेते वाल्मिक अण्णा कराड, राष्ट्रवादी परळी मतदारसंघाचे अध्यक्ष गोविंदराव देशमुख, शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सौ. संगीताताई तुपसागर, संजय गांधी निराधार योजनेचे तालुकाध्यक्ष राजाभाऊ चाचा पौळ, नगरसेवक दिपक नाना देशमुख, वैजनाथ सोळंके, सुरेश टाक, गोविंद कराड, सय्यद सिराज, अनंत इंगळे, चित्रा देशपांडे, अर्चना रोडे, श्रीकृष्ण कराड, नाझेर हुसैन, अनिल आष्टेकर, अझिज कच्छी, जयराज देशमुख, अय्युब पठाण, जाबेर खान पठाण, गोविंद कुकर, राजेंद्र सोनी, केशव गायकवाड, जयप्रकाश लड्डा, किशोर पारधे, तहसीलदार सुरेश शेजुळ, नायब तहसीलदार बाबुराव रुपनर यांसह आदी उपस्थित होते.

 *परळी : खा. शरदचंद्र पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त धनंजय मुंडे हस्ते 200 विधवा महिलांना मोफत पिठाच्या गिरणीचे वाटप*


*रोजगाराची संधी मिळाल्याने महिलांच्या चेहऱ्यावर उमटले समाधान!*


परळी (दि. 11) ---- : परळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मतदारसंघातील 200 विधवा महिलांना खा. शरदचंद्र पवार साहेबांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते मोफत पिठाच्या गिरणीचे वाटप करण्यात आले. यावेळी रोजगाराची संधी उपलब्ध झाल्याने महिलांच्या चेहऱ्यावर समाधान उमटलेले पाहायला मिळाले.



उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त 15 जुलै ते 22 जुलै दरम्यान आयोजित सेवा सप्ताहात या महिलांची नाव नोंदणी करण्यात आली होती व आज खा. पवार साहेबांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला या 200 महिलांना ना. धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली व हस्ते तसेच नगर परिषद गटनेते वाल्मिक अण्णा कराड यांच्या मार्गदर्शनाखाली पिठाच्या गिरणीचे वाटप करण्यात आले.



*राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेतील 7 लाभार्थीना धनादेश वितरित*


याच कार्यक्रमात राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेतील 7 लाभार्थींना प्रत्येकी 20 हजार रुपयांच्या धनादेशाचे वितरण देखील ना. धनंजय मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले.


यावेळी ना. धनंजय मुंडे यांच्या सह, जिल्हा परिषद गटनेते अजय मुंडे, न.प. गटनेते वाल्मिक अण्णा कराड, राष्ट्रवादी परळी मतदारसंघाचे अध्यक्ष गोविंदराव देशमुख, शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सौ. संगीताताई तुपसागर, संजय गांधी निराधार योजनेचे तालुकाध्यक्ष राजाभाऊ चाचा पौळ, नगरसेवक दिपक नाना देशमुख, वैजनाथ सोळंके, सुरेश टाक, गोविंद कराड, सय्यद सिराज, अनंत इंगळे, चित्रा देशपांडे, अर्चना रोडे, श्रीकृष्ण कराड, नाझेर हुसैन, अनिल आष्टेकर, अझिज कच्छी, जयराज देशमुख, अय्युब पठाण, जाबेर खान पठाण, गोविंद कुकर, राजेंद्र सोनी, केशव गायकवाड, जयप्रकाश लड्डा, किशोर पारधे, तहसीलदार सुरेश शेजुळ, नायब तहसीलदार बाबुराव रुपनर यांसह आदी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!