MB NEWS-ट्राफिक ब्लाॅक: दि 13 ते 30 एप्रिल दरम्यान औरंगाबाद- हैदराबाद गाडीच्या वेळापत्रकात काहीसा बदल

 ट्राफिक ब्लाॅक: दि 13 ते 30 एप्रिल दरम्यान औरंगाबाद- हैदराबाद  गाडीच्या वेळा पत्रकात काहीसा बदल



परळी वैजनाथ, प्रतिनिधी...


       दक्षिण मध्य रेल्वे विभागाच्या औरंगाबाद-हैद्राबाद या रेल्वेच्या वेळापत्रकात काही बदल करण्यात आला असून दक्षिण मध्य रेल्वे विभागाकडून याबाबत माहिती देण्यात आली आहे.


     दक्षिण मध्य रेल्वे विभागाने प्रसिद्ध केलेल्या  दि 12 एप्रिल च्या पत्रकान्वये ट्रॅफिक ब्लॉकमुळे औरंगाबाद-हैदराबाद एक्सप्रेस ट्रेनचे वेळापत्रक  दि 13 ते 30 एप्रिल या कालावधीत चिकलठाणा औरंगाबाद विभाग - नांदेड विभागा दरम्यान प्रत्येक एक दिवस आड म्हणजे सोमवार, बुधवार, शनिवार गाडी क्रमांक 17650 औरंगाबाद- हैदराबाद एक्स्प्रेसची वेळ 2 तास 40 मिनिट उशीरा होणार आहे. सोमवार, बुधवार व शनिवार या दिवशी ही रेल्वे गाडी औरंगाबाद या रेल्वे स्थानकावरून 18.55 वा सुटणार आहे.या रेल्वे गाडीची नियोजित प्रस्थान होण्याची वेळ 16.15 वा आहे. दक्षिण मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी राकेश यांनी याबाबत माहिती दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !