MB NEWS-परळी तालुक्यातील 80 पैकी 50 तर अंबाजोगाई तालुक्यातील 49 पैकी 31 ग्रामपंचायती धनंजय मुंडेंच्या नेतृत्वात राष्ट्रवादीच्या ताब्यात

 परळी विधानसभा मतदार संघातील ग्रामपंचायत निवडणुकीत धनंजय मुंडे यांचे निर्विवाद वर्चस्व, 130 पैकी 81 ग्रामपंचायतीत एकहाती विजय!


परळी तालुक्यातील 80 पैकी 50 तर अंबाजोगाई तालुक्यातील 49 पैकी 31 ग्रामपंचायती धनंजय मुंडेंच्या नेतृत्वात राष्ट्रवादीच्या ताब्यात


परळी (दि. 20) - परळी विधानसभा मतदारसंघातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालात माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांनी पुन्हा एकदा आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. मतदारसंघातील 130 पैकी निकाल जाहीर झालेल्या आतापर्यंत 81 ग्रामपंचायतीत धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वात एकहाती विजय मिळाला आहे.


परळी मतदारसंघात परळी तालुक्यातील 81 पैकी 50 ग्रामपंचायती तसेच अंबाजोगाई तालुक्यातील 49 पैकी 31 ग्रामपंचायती आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आल्या आहेत. त्याचबरोबर उर्वरित निकालांमध्येही राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत पॅनलच्या उमेदवारांनी निर्णायक आघाड्या घेतलेल्या आहेत.


आपल्या मतदारसंघात निर्णायक असा विजय ग्रामपंचायत निवडणुकीत मिळणार असल्याचा विश्वास असल्याने विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असून देखील आपल्या कार्यकर्त्यांसमवेत विजय उत्सव साजरा करून आपल्या कार्यकर्त्यांना शुभेच्छा देण्यासाठी धनंजय मुंडे हे काल रात्री नागपूर ते परळी असा प्रवास करून आज परळी येथे दाखल झाले होते.


परळी येथील धनंजय मुंडे यांच्या जगमित्र या संपर्क कार्यालयासमोर विजयी जल्लोष साजरा करण्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली होती. वाजत गाजत व गुलाल उधळत विजयी होऊन आलेल्या सरपंच व उमेदवारांचे स्वतः धनंजय मुंडे हे स्वागत करत होते व त्या सर्वांना शुभेच्छा देताना दिसत होते.


'परळी विधानसभा मतदारसंघ हा मागील अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला सिद्ध झाला असून ग्रामपंचायत निवडणुकीत आपल्याला अपेक्षित यश मिळाले आहे; हा विजय माझा नसून गाव पातळीवर काम करणाऱ्या, सर्वसामान्य लोकांच्या अडचणी सोडवणाऱ्या स्थानिक कार्यकर्त्यांचा आहे. भविष्यातही आमच्यावर विश्वास टाकलेल्या प्रत्येक गावाला विकास रुपी ताकद देण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहू,' असे मत यावेळी धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले आहे.


परळी मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत पॅनलच्या विजयाची घोडदौड सुरूच असून सिरसाळा या ग्रामपंचायतीतील सरपंच पदाच्या उमेदवाराचा जरी पराभव झाला असला तरी 17 पैकी तब्बल 13 जागा ह्या राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकल्या असल्याने एक प्रकारे इथेही राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व असणार आहे.


धनंजय मुंडे यांचे जन्मगाव असलेल्या नाथरा येथून त्यांचे चुलत बंधू अभय मुंडे हे सरपंच पदासाठी तब्बल 648 मतांनी विजयी झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ऍड. राजेश्वर चव्हाण यांच्या हातोला गावात देखील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅनलचा दणदणीत विजय झाला. तालुकाध्यक्ष लक्ष्मणतात्या पौळ यांचेही पिंप्री मध्ये वर्चस्व राहिले. आणखी एक मोठी ग्रामपंचायत असलेली धर्मापुरी ही देखील ग्रामपंचायत मोठ्या फरकाने बाजार समितीचे सभापती ऍड. गोविंद फड यांच्या नेतृत्वात धनंजय मुंडे यांच्या ताब्यात आली आहे, महत्वाची मानली जाणारी पांगरी (गोपीनाथगड) ही ग्रामपंचायत याआधीच वाल्मिक अण्णा कराड यांच्या नेतृत्वात बिनविरोध विजयी झालेली आहे. शिवाय सूर्यभान नाना मुंडे यांनी सलग सहाव्यांदा तळेगाव ग्रामपंचायत निवडणुकीत वर्चस्व राखले, टोकवाडी येथेही पंचायत समिती सभापती पिंटू मुंडे यांनी वर्चस्व प्रस्थापित केले, तसेच जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष शिवाजीराव सिरसाट यांनीही आपल्या तेलघणा गावात वर्चस्व कायम राखले. सुंदर गित्ते यांनी देखील नंदागौळ निवडणुकीत एकहाती सत्ता स्थापन केली आहे.


कपाळी गुलाल लावत विजयाचा आनंद साजरा करत असताना धनंजय मुंडे यांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ऍड. राजेश्वर चव्हाण यांनी नवनिर्वाचित सरपंच, उमेदवार, पॅनल प्रमुख तसेच ग्रामस्थांचे अभिनंदन केले असून आगामी काळात गावच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध राहावे अशा सूचनाही केल्या आहेत. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अजय मुंडे, ज्येष्ठ नेते वाल्मिक अण्णा कराड हेही उपस्थित होते.


परळी विधानसभा मतदार संघ ;राष्ट्रवादी काँग्रेस ने आता पर्यंत जिंकलेल्या जागा


*परळी तालुका* 


1 नाथ्रा

2 तळेगाव

3 ब्रम्हवाडी

4 डाबी

5 पांगरी

6 भिलेगाव

7 चांदापूर

8 कासारवाडी प.

9 कौडगाव हुडा

10 लेंडेवाडी

11 लोणारवाडी

12 मैंदवाडी

13 सेलू सबदराबाद

14 तेलसमुख

15 वाघबेट

16 बोरखेड

17 दौंडवाडी

18 बोधेगाव

19 दैठणाघाट

20 हाळंब 

21 इंदपवाडी

22 जयगाव

23 मिरवट

24 नागदरा

25 भोजनकवाडी

26 मालेवाडी

27 ममदापूर

28 संगम

29 तडोळी

30 तपोवन

31 वडखेल

32 मांडवा

33 खामगाव

34 धर्मापूरी

35 लमाणतांडा प.

36 जिरेवाडी

37 टोकवाडी

38 बेलंबा

39 हेळंब 

40 इंजेगाव

41 कौडगाव घोडा

42 सारडगाव

43 वाका

44 वाघाळा प.

45 दाऊतपूर

46 पोहनेर 

47 पिंप्री बु.

48 नंदागौळ

49 नंदनज

50 हसनाबाद/पाडोळी


 *अंबाजोगाई तालुका*


1सुगाव 

2 सेलू आंबा

3  तेलघना

4  मुरंबी 

5 चंदनवाडी 

6 पिंपला धायगुडा 

7 गिरवली बावणे 

8 गीता 

9 धानोरा बु

10  तडोळा

11 अकोला

12 मुडेगाव

13 दैठणा राडी

14 अंबलटेक

15 सातेफळ

16 उजनी

17 पट्टीवडगाव

18 बाभळगाव

19 निरपणा

20 कातकरवाडी

21 धसवाडी

22 सौंदणा

23 खापरटोन


24 हातोला

25 चौथेवाडी

26 दरडवाडी

27 तळेगावघाट

28 भतानवाडी 

29  सांळुकवाडी

30 पिंप्री

31 लिंबगाव



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !