MB NEWS:संजय गांधी निराधार व श्रावण बाळ योजनेच्या लाभार्थ्यांना 7 कोटी 91 लाख 96 हजार रूपयांचे अनुदान वर्ग

 संजय गांधी निराधार व श्रावण बाळ योजनेच्या लाभार्थ्यांना 7 कोटी 91 लाख 96 हजार रूपयांचे अनुदान वर्ग


परळी/प्रतिनिधी

संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थी संख्या 6929 एवढी असून जानेवारी ते मार्च 2023 चे अनुदान 3 हजार रूपये तर श्रावण बाळ योजनेचे अनुदान प्रत्येकी चार हजार नुसार विविध बँकांत वर्ग करण्यात आले असून 21 हजार 417 लाभार्थींना 7कोटी 91 लाख 96 हजार एवढे अनुदान उपलब्ध करून देण्यात आले आहे. 

जानेवारी ते मार्च 2023 पर्यंत देय असलेल्या संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेतील लाभार्थ्यांना 7 कोटी 91 लाख 96 हजार एवढे अनुदान बँकामध्ये वर्ग करण्यात आले आहे. दिव्यांग लाभार्थी, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा लाभार्थी, इंदिरा गांधी, राष्ट्रीय वृद्धापकाळ अशा विविध अनुदानही बँकामध्ये वर्ग करण्यात येणार आहेत. आतापर्यंत संजय गांधी निराधार योजनेतील 5 हजार 929 व श्रावण बाळ योजनेतील 16022 अशा एकुण 21951 लाभार्थ्यांना 7 कोटी 91 लाख रूपयांचे अनुदान वर्ग करण्यात आले आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !