प्रत्येक बाधित कुटुंबाला मोफत धान्याच्या किटही देणार

 परळीत सरस्वती नदीच्या पुराने बाधित झालेल्या 550 हुन अधिक कुटुंबांना धनंजय मुंडेंच्या नाथ प्रतिष्ठान कडून प्रत्येकी 10 हजारांची मदत


तातडीच्या आपत्ती निधीतूनही प्रशासनाकडून प्रत्येक कुटुंबाला 5 हजारांची मदत; रविवारी धनंजय मुंडेंच्या उपस्थितीत एकत्रित होणार वितरण


प्रत्येक बाधित कुटुंबाला मोफत धान्याच्या किटही देणार


परळी वैद्यनाथ (दि.07) - परळी वैजनाथ शहरात मागच्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सरस्वती नदीला आलेल्या पुरात 550 पेक्षा अधिक कुटुंब बाधित होऊन त्यांच्या घरात पाणी शिरल्याने संसार उपयोगी साहित्य धान्य आदींचे नुकसान झाले होते. बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे अध्यक्ष असलेल्या नाथ प्रतिष्ठानच्या वतीने 550 पेक्षा अधिक कुटुंबांना प्रतिक कुटुंब दहा हजार रुपयांची तातडीची आर्थिक मदत रविवारी धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत देण्यात येणार आहे.


आपत्ती व्यवस्थापनाच्या तातडीच्या आपत्ती निवारण निधीतून देखील प्रशासनाच्या वतीने या प्रत्येक बाधित कुटुंबाला नियमाप्रमाणे प्रत्येकी 5000 रुपये याप्रमाणे तातडीची मदत देखील धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत देण्यात येणार आहे अशी माहिती तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांनी दिली आहे. सरस्वती नदीला आलेल्या पुरानंतर धनंजय मुंडे यांनी या भागात प्रत्यक्ष जाऊन नागरिकांच्या भेटी घेत त्यांना धीर व दिल्यास दिला होता तसेच प्रशासनाला तात्काळ मदत करण्याच्या सूचना दिल्या होत्या. 


शासनाच्या नियमानुसार पुराच्या पाण्याने नुकसान होऊन घरातील भांडी कपडे धान्य आदींचे नुकसान झाल्यानंतर प्रत्येक कुटुंबाला शासनाच्या वतीने प्रत्येकी पाच हजार रुपये मदत दिली जाते, शासनाच्या बरोबरीने किंबहुना त्याहूनही दुप्पट मदत नाथ प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेच्या वतीने धनंजय मुंडे यांच्याकडूनही दिली जात आहे. 


परळी वैजनाथ शहरातील बरकत नगर, रहिमत नगर, भीमा नगर, स.क्र.75  यांसह विविध भागातील बाधित कुटुंबीयांना यामुळे दिलासा व आधार मिळणार आहे. या दोन्ही मदतीचे रोखीने धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत रविवारी एकत्रितपणे दुपारी एक वाजता श्री वैद्यनाथ गणेश महोत्सवाच्या स्व.पंडित अण्णा मुंडे सभामंडपात वितरण करण्यात येणार असल्याची माहिती नाथ प्रतिष्ठानचे कार्यवाह वाल्मिक अण्णा कराड यांनी दिली आहे.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !