दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !
खळबळजनक घटना: बीड जिल्ह्यात पुन्हा एका आश्रमशाळा कर्मचाऱ्याची आत्महत्या !
दोन संस्थाचालकांच्या त्रासाला कंटाळून परळी तालुक्यात एका कर्मचाऱ्याने लावून घेतला गळफास
परळी वैजनाथ, प्रतिनिधी...
बीड जिल्ह्यातील केजच्या आश्रम शाळेवरील शिक्षक धनंजय नागरगोजे यांनी काही महिन्यांपुर्वी आत्महत्या केल्यानंतर हे प्रकरण संपूर्ण राज्यभर चर्चेत आले होते .याबाबत आश्रम शाळा शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या समस्या ऐरणीवर आल्या होत्या.त्यानंतर आता पुन्हा एकदा बीड जिल्ह्यात खळबळ उडवून देणारी घटना घडली असुन परळी तालुक्यात एका युवक कर्मचाऱ्याने स्वतःला गळफास लावून आपले जीवन संपवले आहे. नोकरीमध्ये संस्थाचालकांकडून गेले अनेक वर्षापासून सातत्याने होणारा मानसिक छळ, अगोदर केज आणि त्यानंतर परळी तालुक्यातील संस्थाचालकांनी पैसे न भरता अनुकंपावर नोकरी करतो म्हणून सातत्याने मानसिक त्रास दिला. यातूनच या कर्मचाऱ्याने आत्महत्या केली आहे.
परळी तालुक्यातील नंदागौळ येथील रहिवाशी वसंत नगर येथील आश्रम शाळेत कार्यरत मयत आश्रम शाळा कर्मचारी श्रीनाथ गोविंद गीते वय 25 वर्ष याने नंदागौळ येथील त्याच्या राहत्या घरी एका खोलीमध्ये दिनांक 22 ऑगस्ट रोजी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली. याबाबत त्याच्या आईने पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असुन सानेगुरुजी निवासी विद्यालय केज चे संस्थाचालक उद्धव माणिक कराड व प्राथमिक आश्रम शाळा वसंतनगर तांडा परळीचे संस्थाचालक संजय परशुराम राठोड या दोघांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आश्रम शाळा वसंत नगर येथे मयत श्रीनाथ गोविंद गीते कामाठी या पदावर सध्या कार्यरत होता. त्याचे वडील सहशिक्षक म्हणून केज येथील आश्रम शाळेत कार्यरत होते .नोकरीवर असताना 2010 मध्ये त्यांचे निधन झाले होते .त्यानंतर अनुकंपा तत्त्वावर श्रीनाथ गीते यांना घेण्यासाठी संस्थाचालक उद्धव कराड यांनी नकार देत सातत्याने हीन वागणूक दिली .पैशाची मागणी केली. आपण त्यास फुकट रुजू करून घेणार नाही अशी भूमिका घेतली होती. त्यानंतर सामाजिक न्याय विभागाकडे त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. 2024 पर्यंत याचा पाठपुरावा केल्यानंतरही न्याय मिळत नव्हता. त्यामुळे या कुटुंबाने सामाजिक न्याय विभागाकडे या मागणीसाठी पाठपुरावा केला तसेच उपोषणही केले. प्रशासनाने याची दखल घेत मयत श्रीनाथ गीते यास बीड जिल्ह्यातील कोणत्या शाळेत रिक्त असलेल्या जागेवर घ्यावे याबाबतचा निर्णय घेतला. त्या अनुषंगाने परळी तालुक्यातील वसंतनगर तांडा येथील आश्रम शाळेत रुजू होण्याबाबतचे लेखी पत्र काढले. परंतु या ठिकाणीही संस्थाचालकाच्या मानसिक त्रासाला त्याला सामोरे जावे लागले.वरिष्ठ कार्यालयाचे आदेश असताना सुद्धा वसंतनगर येथील आश्रम शाळेच्या संस्थाचालक यांनी त्यास सुरुवातीला रुजू करून घेण्यास नकार दिला. त्यानंतर या कुटुंबाने व त्याच्या आईने आत्मदहनाचा इशारा दिला होता. दरम्यानच्या काळात या कुटुंबाने या नोकरीसाठी 2010 ते 2025 पर्यंत संघर्ष केला. त्यानंतर वसंतनगर येथील आश्रम शाळेत कसेतरी त्यास रुजू करून घेण्यात आले. मात्र रुजू झाल्यापासून त्यास प्रचंड मानसिक त्रास व पगार न काढण्याच्या धमक्या देण्यात येत असल्याचे त्याच्या आईने फिर्यादीत म्हटले आहे .परळी तालुक्यातील वसंतनगर तांडा येथील आश्रम शाळेचे संस्थाचालक यांनी त्यास जाणून बुजून काम करताना त्रास देणे ,हीन वागणूक देणे ,इतर शिक्षक व कर्मचाऱ्यासमोर आपमानास्पद वागणूक देणे ,तू केजच्या संस्थाचालकाबरोबर भांडण का केलेस तुझा पगार निघू देणार नाही अशा सातत्याने धमक्या दिल्या. त्यामुळे मयत श्रीनाथ गीते हा सतत तणावातच राहत आला. या सर्व मानसिक तणावातूनच त्याने अखेर राहत्या घरी गळफास लावून आपले जीवन संपवले. त्याच्या आत्महत्येस आश्रमशाळा संस्थाचालक उद्धव कराड व संजय राठोड हे संस्थाचालक जबाबदार असल्याचे फिर्यादीत त्म्हटले आहे. या फिर्यादीवरून परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात या दोन संस्था चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास परळी ग्रामीण पोलीस करत आहेत.
सदर आश्रमशाळा संस्थापकांना पदावरून कायमच हटवा , तेथे प्रशासक नेमवा, मयताच्या कुटूंबाला आर्थीक मदत करा ,
उत्तर द्याहटवाशासनाच्या उदासीन धोरणामुळे कर्मचारी यांना आत्महत्या करायची वेळ आलेली आहे गेली 24 वर्षे झाले कर्मचारी बिनपगारी काम करतात तरी पण शासन 100% अनुदान वितरीत करण्याचा जी भार काढत नाही त्यामुळे कर्मचारो हतबल झालेले आहेत
उत्तर द्याहटवाकाही आश्रमशाळा संस्था चालक स्वःतला असे समजतात की नोकरी वर घेतले म्हणजे फार उपकार केले.हेच संस्था चालक याच कर्मचारी लोकांकडून पैसे घेउन संस्था चालवत आहे.भामटे लोक आहे पुन्हा ञास देऊन काहीच झाले नाही अशा अर्वीभावात वागतात
उत्तर द्याहटवा