Public appeal:Blood donation camp
माजी नगराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांच्या वाढदिवसा निमित्त ११ रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन
Public appeal:मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन
परळी वैजनाथ/ प्रतिनिधी......
माजीमंत्री आ. धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली काम करणारे परळी शहरातील कर्तृत्ववान, उमदे युवा नेतृत्व व परळीच्या सर्वांगीण विकासाचा मुख्यदुवा म्हणून यशस्वी कारकीर्द निर्माण केलेले माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकप्रिय शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांच्या वाढदिवसा निमित्त (दि.११) रोजी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे.या शिबिरात मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.
माजीमंत्री ना. धनंजय मुंडे यांच्या प्रेरणेने बाजीराव भैय्या धर्माधिकारी मित्रमंडळाच्या वतीने माजी नगराध्यक्ष बाजीराव भैया धर्माधिकारी यांच्या वाढदिवसा निमित्त दिनांक ११ ऑगस्ट रोजी स्व. श्री. मणिक बाजीराव धर्माधिकारी सभागृह,आंबेवेस, परळी वैजनाथ येथे दि.११ ऑगस्ट २०२५ रोजी रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे. सकाळी १० वा.पासुन शिबिराचा शुभारंभ होणार आहे. दिवसभर रक्तदात्यांना रक्तदान करता येणार आहे.
दरवर्षी वाढदिवसा निमित्त रक्तदान शिबीर आयोजित करण्यात येते. गेल्या १२ वर्षांपासुन सातत्याने घेण्यात येणारे व मोठ्या सहभागाचे शिबीर म्हणून हा सामाजिक उपक्रम परळीत अग्रेसर ठरलेला आहे.दरवर्षी नवनविन रक्तदात्यांना प्रोत्साहित करून रक्तदानाचे कार्य रूजविणे बाबत जागृती करणारा परळीतील हा उपक्रम आहे.या शिबिरात मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे असे आवाहन बाजीराव भैय्या धर्माधिकारी मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
--------------------------------------
Blood donation camp organized on the 11th to mark the birthday of former Mayor Bajirao Bhaiya Dharmadhikari
--------------------------------------
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा