Vaidyanath bank election: Public appeal...
वैद्यनाथ बँकेच्या मजबूत व प्रगतीशील वाटचालीसाठी लोकनेते गोपीनाथराव मुंडे पॅनेलच्या उमेदवारांनाच विजयी करा - बाजीराव भैय्या धर्माधिकारी
Vaidyanath bank election: Public appeal...
परळी वैजनाथ, प्रतिनिधी...
परळीतून सुरु झालेल्या व आज राज्यभरात विस्तार असणाऱ्या आणि सभासदांचे हित कायम जपणाऱ्या वैद्यनाथ बँकेचे संचालक मंडळ हे जबाबदार, विकासाची क्षमता, मजबूत आर्थिक स्थिती आणि प्रगतीशील वाटचाल करणारे असावे यासाठी लोकनेते गोपीनाथराव मुंडे पॅनेलच्या उमेदवारांनाच विजयी करा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी केले आहे.
राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे व माजी मंत्री आ.धनंजय मुंडे यांच्या खंबीर नेतृत्वाखाली लोकनेते गोपीनाथराव मुंडे जनसेवा पॅनल वैद्यनाथ बँक संचालक मंडळाची निवडणूक लढवत आहे. यापूर्वीच या पॅनलचे चार उमेदवार बिनविरोध निवडून आलेले आहेत. सहकारी बँकांमधील एक अग्रगण्य व परळीच्या अर्थकारणातील महत्त्वाचे आर्थिक केंद्र ठरलेल्या वैद्यनाथ बँकेशी परळीकरांचा एक स्नेहबंध आहे. परळीतील सर्वसामान्य नागरिक, छोटे,मोठे व्यावसायिक व सर्वच क्षेत्रातील नागरिकांनी सभासद या नात्याने आपली बँक म्हणून या बँकेच्या प्रगतीसाठी आणि बँकेचे राज्यभरात अग्रगण्य बँकेत रूपांतर होण्यासाठी सहयोग व योगदान दिलेले आहे. दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या नेतृत्वाखाली बँकेने राज्यभर आपला विस्तार व भरभराट केलेली आहे. पंकजाताई मुंडे व धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वातून भविष्यात बँक देशभरात आपला लौकिक करु शकते याचा सर्व सभासदांना विश्वास आहे. त्यामुळेच सभासदांचे हित जपणाऱ्या संचालक मंडळावर वर्षानुवर्षे सभासदांनी जबाबदारी टाकलेली आहे. या निवडणुकीतही ना. पंकजाताई मुंडे व धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखालील लोकनेते गोपीनाथराव मुंडे जनसेवा पॅनलला सभासद भरभरून आशीर्वाद देऊन बँकेचा सुरक्षित व प्रगतिशील कारभार करणाऱ्या उमेदवारांना निवडून देणार आहेत यात तिळमात्र शंका नाही. दहा ऑगस्ट रोजी होणाऱ्या निवडणुकीत लोकनेते गोपीनाथराव मुंडे जनसेवा पॅनलच्या सर्व उमेदवारांना विमान चिन्हावर ठसा मारुन विजयी करावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैया धर्माधिकारी यांनी केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा