इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

MB NEWS:पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लॉन्च केली 'स्वामित्व योजना

 आता जागेवरील मालकी हक्काबाबतचे वाद संपुष्टात येतील !



⭕पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लॉन्च केली 'स्वामित्व योजना', महाराष्ट्राला महिनाभरात मिळणार लाभ

 -----------------------------------     

*नवी दिल्ली, 11 ऑक्टोबर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून 'स्वामित्व योजना' (Swamitva Yojana) लॉन्च केली. या योजनेंतर्गंत जमिनीच्या मालकांना प्रॉपर्टी कार्ड वितरित करण्यात येणार आहे. सुरुवातीच्या टप्प्यात 6 राज्यातील 673 गावांमध्ये प्रॉपर्टी कार्ड वाटप करण्यात येईल. 1 लाख 32 हजार प्रॉपर्टीधारकांना याचा लाभ मिळणार आहे. महाराष्ट्राला महिनाभरात प्रॉपर्टी कार्ड मिळणार आहे. मोदी सरकारनं ग्रामीण भागाचं रुपडं पालटण्यासाठी स्वामित्व योजनेच्या माध्यमातून ऐतिहासिक पाऊल उचललं आहे. योजनेनुसार 1 लाख 32 हजार प्रॉपर्टीधारकांना मालमत्ता कार्ड मिळणार आहे. सुरुवातीला जमीन मालकांच्या मोबाईलवर एसएमएसद्वारे (SMS) एक लिंक पाठवण्यात येणार आहे. त्यावरून प्रॉपर्टी कार्ड डाऊनलोड करता येईल. त्यानंतर संबंधित राज्य सरकारद्वारा प्रॉपर्टी कार्टचं वितरण करण्यात येणार आहे.सुरूवातीच्या टप्प्यात या योजनेतून 6 राज्यांतील 673 गावांतील नागरिकांना लाभ मिळणार आहे. या राज्यांमध्ये उत्तर प्रदेश- 347, हरियाणा-221, महाराष्ट्र- 100, उत्तराखंड-50, मध्य प्रदेश- 44, आणि कर्नाटक 2 गावांचा समावेश आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २४ एप्रिल म्हणजेच राष्ट्रीय पंचायत दिनी 'स्वामित्व' योजनेची घोषणा केली होती. या योजनेचा मुख्य उद्देश गावात राहणाऱ्या नागरिकांनी आत्मनिर्भर बनवण्यासाठी उपयेगी पडणार असून जागेवरील मालकीहक्कांबाबतचे वाद संपुष्टात येतील. असं मोदी म्हणाले.शिवाय, या योजमुळे गावात राहणाऱ्या लोकांच्या जीवनात मोठ्या प्रमाणात बदल होणार आहे. एक कायदेशीर दस्तावेज म्हणून 'संपत्ती कार्ड'चा वापर करता येणार आहे. या योजनेत दिल्या जाणाऱ्या संपत्तीच्या मालकीच्या कार्डमुळे बँकेतून कर्ज घेणं किंवा इतर कामांसाठी त्या कार्डचा उपयोग केला जाऊ शकतो.

ग्रामीण भागातल्या जनतेसाठी ऐतिहासिक राहणार असल्याचं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे. योजनेची घोषणा करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याआधी सत्तेत असलेल्या काँग्रेसवर टीका केली. याआधी सत्तेत असलेल्या पक्षाने मोठी-मोठी आश्वासनं जनतेला दिली. परंतू त्यांच्या वाट्याला कायम निराशा आली. मात्र आता 'स्वामित्व' योजनेमुळे ते आत्मनिर्भर होतील असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला. 

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!