MB NEWS-ग्रामीण भागात विभागवार लसीकरण न करता प्रत्येक गावात लसीकरण मोहीम सुरू करा अन्यथा प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन करू - राजेश गिते

 ग्रामीण भागात विभागवार लसीकरण न करता  प्रत्येक गावात लसीकरण मोहीम सुरू करा अन्यथा प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन करू   - राजेश गिते   



            परळी वैजनाथ..... तालुका ग्रामीण भागात सध्या कोरोनाचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहेत.कोरोना मुळे अनेक लोकांनी आपला जीव गमावला आहे.मधल्या काळात काही गावांमध्ये अल्प प्रमाणात लसीकरण मोहीम राबविण्यात आली.

लसीकरण करण्यासाठी ग्रामीण भागात गावोगावी लोक लसीकरण केंद्र या ठिकाणी जात होती.प्रशसनाने नंतर लस तुटवडा असल्याचे कारण सांगून लसीकरण मोहीम बंद केली.आज च्या परिस्थिती गावोगावी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.प्रशासन मोठ्या गावात जसे नागापूर, धर्मापुरी, सिरसाळा,आशा ठिकाणी बर्याच गावातील लोकांना बोलवुन लसीकरण मोहीम राबवित आहे ज्या मुळे एकाच ठिकाणी लोकांची गर्दी होऊन कोरोना संसर्ग वाढण्याचा धोका निर्माण होतो आहे.

प्रशास्नाने याची दखल घेऊन त्वरित बंद केलेली लसीकरण मोहीम गावोगावी पुन्हा सुरू करावी अन्यथा आमच्या नेत्या भाजपा राष्ट्रीय सचिव  पंकजाताई गोपीनाथराव मुंडे आणि भाजपा प्रदेश उपाध्यक्ष खा डॉ प्रितमताई गोपीनाथराव मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागातील लोकांना घेऊन प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा भाजपा नेते राजेश गिते यांनी दिला आहे.

टिप्पण्या

  1. Yes ग्रामीण भागात ग्रामपंचायतीला लसीकरण देण्यात यावे हाच यावरील एकमेव उपाय आहे. आरोग्य विभागाचा लसीकरण मोहीम मी स्वतः डोळ्यांनी पाहून आलेलो आहे मला आजच्या तारखेचा शेड्युल मिळून सुद्धा ऑनलाइन तीन ते चार चार दिवस आम्ही मोबाईलवर बोटे ठेवून बसायचं इकडून तिकडून अपॉईंटमेंट बुक झाल्याचे नंतर आम्ही ज्या वेळेस लसीकरण केंद्रावर जातो तिथे गेल्यानंतर आमची नावे त्या लिस्टमध्ये नाही तो ऑफलाईन नोंदणी ज्यांनी केली त्यांनाच लस देण्यात येते मग ऑनलाइन आज कशाला लोकांची दिशाभूल करण्यासाठी का लसी चे घोटाळे करण्यासाठी.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !