पोस्ट्स

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर, महागाई भत्त्यात दोन टक्क्यांची वाढ.

इमेज
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर, महागाई भत्त्यात दोन टक्क्यांची वाढ. _________________________________ मोदी सरकारने केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शन धारकांना एक खूशखबर दिली आहे. सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात दोन टक्क्यांनी वाढ करण्यात आली असून, केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांना सध्या सात टक्के महागाई भत्ता मिळतो. मात्र आता त्यामध्ये दोन टक्क्यांची वाढ झाल्यामुळे 9 टक्के महागाई भत्ता मिळणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने याआधी मार्चमध्ये 2 टक्क्यांनी वाढ दिली होती. 1 जानेवारीपासून ती लागू करण्यात आली होती. सातव्या वेतन आयोगात निश्चित केलेल्या फॉर्म्युल्यानुसार महागाई भत्त्यात वाढ झाली. मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर एक जुलैपासून हा निर्णय लागू होईल. देशभरात 48 लाखांपेक्षा जास्त केंद्रीय कर्मचारी आहेत तर 61 लाखांपेक्षा अधिक पेन्शनधारक मंडळी आहेत.

भाजपच्या सत्ता परिवर्तनात रासपचे योगदान मोलाचे - ना. पंकजा मुंडे

इमेज
*भाजपच्या सत्ता परिवर्तनात रासपचे योगदान मोलाचे* *_ना. पंकजाताई मुंडे यांच्या उपस्थितीत नवी दिल्लीत पार पडला रासपचा स्थापना दिवस_* नवी दिल्ली दि. २९ ---- रासप हा अठरा पगड जाती जमातीला सोबत घेवून काम करणारा पक्ष असून भाजपच्या सत्ता परिवर्तनाच्या लढाईत त्यांचे मोलाचे योगदान ठरले आहे. या पक्षाचे भविष्य अतिशय उज्ज्वल आहे अशा शब्दांत राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री ना पंकजाताई मुंडे यांनी राष्ट्रीय समाज पक्षाला त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.    रासपचा पंधरावा स्थापना दिन समारोह आज दिल्लीतील काॅन्स्टीट्यूशन क्लब ऑफ इंडियाच्या सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडला त्यावेळी त्या बोलत होत्या. रासपचे अध्यक्ष तथा राज्याचे पशूसंवर्धन मंत्री महादेव जानकर व रासपचे वरिष्ठ नेते यावेळी उपस्थित होते.    रासपचे अध्यक्ष महादेव जानकर हे माझे बंधू आहेत, लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या पश्चात आमचे बहिण-भावाचे नाते अतूट असं आहे, मुंडे साहेबांच्या संघर्षाच्या लढाईतून आम्ही खूप कांही शिकलो, त्यांनी दाखविलेल्या साहस आणि संयमाच्या मार्गावर वाटचाल करत प...

ज्योतिर्लिंगक्षेत्र परळीच्या १३३ कोटीच्या विकास आराखड्यास जिल्हा स्तरीय समितीची मंजुरी !

इमेज
 बीड. ज्योतिर्लिंगक्षेत्र परळीच्या १३३ कोटीच्या विकास आराखड्यास जिल्हा स्तरीय समितीची  मंजुरी ! परळी वैजनाथ /प्रतिनिधी...       पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या पुढाकारातून होत असलेल्या या शंभर कोटींच्या विकास आराखड्यास जिल्हा स्तरीय समितीने मंजुरी दिली आहे. बीड जिल्ह्यातील परळी येथे बारा ज्योतीर्लिंगापैकी एक प्रभू वैद्यनाथाचे मंदिर आहे. या मंदिरामध्ये वर्षभर भाविकांची सतत दर्शनासाठी गर्दी असते. असे असले तरी या देवस्थानचा भीमाशंकर व घृष्णेश्‍वर प्रमाणे अद्यापही विकास झालेला नाही. त्यामुळे येथे येणार्‍या भाविकांना राहण्यासह इतर अनेक गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. येथे श्रावण महिना, महाशिवरात्री यासह इतर वेळीही भाविकांची मोठी गर्दी असते. येथे येणार्‍या भाविकांना दर्जेदार सुविधा मिळाव्यात, देवस्थानचा विकास व्हावा, यासाठी पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी पुढाकार घेतला असून त्यासाठी 133 कोटी 59 लाख 19 हजार रुपयांचा आराखडा तयार केला आहे.          यासाठीचा आराखडा जिल्हास्तरीय समितीने मंजूर केला असून तो नगरविकास खात्याकड...

संगीत क्षेत्रात यश..... परळीचा शंकर गुट्टे शिष्यवृत्तीस पात्र

इमेज
परळीचा शंकर गुट्टे शिष्यवृत्तीस पात्र  परळी वैजनाथ /प्रतिनिधी. ...          अतिशय बिकट परिस्थितीवर मात करीत यशाचे व ध्येयाचे उंच शिखर गाठता येते हे नेहमीच ग्रामीण भागातील सर्वसामान्यांनी सिद्ध केले आहे .अशीच प्रचिती संगीत क्षेत्राला येत आहे .चि. शंकर दामोदर गुट्टे हा परळी तालुक्यातील कासारवाडी या अतिशय दुर्गम भागातून अंबाजोगाईसारख्या विद्येच्या माहेरघरात संगीत शिक्षणासाठी दररोज ये-जा करतो .पं. शिवदासजी देगलूरकर यांच्या "बालगंधर्व संगीत महाविद्यालय व गुरुकुल "येथे श्री.प्रसाद कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली त्याचा सांगीतिक प्रवास चालू आहे. अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ मुंबई या सांगीतिक क्षेत्रातील अतिशय नामवंत संस्थेने संगीतक्षेत्रातील प्रतिभासंपन्न विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती जाहीर केली व त्यासाठी एका स्पर्धेचे आयोजन केले. त्या स्पर्धेमध्ये चि. शंकरने आपल्या गायनाने रसिकांना व परीक्षकांना मंत्रमुग्ध करत शिष्यवृत्ती मिळवली. याआधीही" झी टीव्हीच्या सारेगमप "या सांगीतिक कार्यक्रमात अंतिम 30 मध्ये जाण्याची किमया शंकरने साधली होती. श्री. बंडोपंत...

फसलेला नोटाबंदी निर्णय म्हणजे ..! विळा मोडून खिळा केला'.

इमेज
RBI च्या आजच्या अहवालातून #नोटाबंदी चा निर्णय फसला हे सिद्ध झाले आहे. 99.3% नोटा परत आल्या. रोजगार बुडाला,उद्योगधंदे, लघुउद्योग बुडाले, शेतकरी,शेतमजुर बुडाला.अर्थव्यवस्था उध्वस्त झाली.ग्रामीण भाषेत सांगायचे तर सरकारने हा विक्षिप्त निर्णय घेऊन 'विळा मोडून खिळा केला'.

भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण प्रवेश परीक्षा 23 नोव्हेंबरला

इमेज
भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण प्रवेश परीक्षा 23 नोव्हेंबरला * ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 17 सप्टेंबरपासून नागपूर, दि. 28 : केंद्रीय लोकसेवा आयोगाची नागरी सेवा परीक्षा देण्यास इच्छुक विद्यार्थ्यांसाठी भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण संस्थेच्या वतीने विनामुल्य परीक्षा पूर्व प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात येते. या प्रशिक्षणात प्रवेशाकरिता संस्थेच्या वतीने शुक्रवार, दिनांक 23 नोव्हेंबर रोजी लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण संस्थेच्या वतीने घेण्यात येणारी परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येईल. परीक्षेत प्रवेशाकरिता इच्छूक विद्यार्थी दिनांक 17 सप्टेंबर ते 31 संस्थेच्या संकेतस्थळ www.preiasnagpur.org.in वरुन ऑनलाईन अर्ज सादर करू शकतील. दिनांक 12 ते 23 नोव्हेंबर दरम्यान विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षा पत्र उपलब्ध करून देण्यात येईल. परीक्षेचा अभ्यासक्रम, ऑनलाईन अर्ज सादर करण्यासंबंधीची माहिती, परिक्षेसंबंधी सूचनेची विस्तृत माहिती संस्थेच्या संकेतस्थळ www.preiasnagpur.org.inवर उपलब्ध असल्याचे भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण संस्थेचे संचालक ...

परळी वैजनाथ : आजचे पर्जन्यमान. .....

इमेज
दि. 29- 08 -2018 परळी तालुका पर्जन्यमान सिरसाळा        -  निरंक नागापुर           - 5.00 पिंपळगाव गा.  - निरंक धर्मापुरी           - 7.00 परळी वै .         - 8.00