१२८ जणांचे शासकीय नोकरीचे स्वप्न साकार

पालकमंत्री ना.पंकजा मुंडे यांनी व्हीसीद्वारे सहभाग घेऊन केले सर्व उमेदवारांचे अभिनंदन! जालन्यात १२८ अनुकंपा उमेदवारांना शासन नियुक्तीचे आदेश वितरित जालना ।दिनांक ०४। मुख्यमंत्री महोदयांच्या १५० दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून शिफारस प्राप्त लिपिक- टंकलेखक संवर्गातील एकुण १२८ उमेदवारांना आज शासकीय नियुक्ती आदेशाचे वितरण करण्यात आले. राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री तथा जिल्हयाच्या पालकमंत्री ना. पंकजा मुंडे यांनी व्हीसीद्वारे यात सहभाग घेऊन शासकीय नोकरी मिळालेल्या सर्व उमेदवारांचे अभिनंदन केले आहे. अनुकंपा नियुक्ती प्रक्रियेस गती आणून पात्र उमेदवारांना रोजगार उपलब्ध करून देणे हा प्रमुख उद्देश असलेल्या या कार्यक्रमातंर्गत अनुकंपा नियुक्ती (गट-क व गट-ड) उमेदवार व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून शिफारस प्राप्त लिपिक- टंकलेखक संवर्गातील एकुण १२८ उमेदवारांना नियुक्ती आदेशाचे वितरण आज जिल्हाधिकारी कार्यालयात मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी एकुण १२८ उमेदवारांचे शासकीय नोकरीचे स्वप्न साकार झाले, असा सुर कार्यक्रमातून उमटला. ...