परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!
धनंजय मुंडेंच्या माध्यमातून परळी मतदारसंघातील ५ ग्रामपंचायत बांधकामास निधी मंजूर
स्व. बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेतून परळी मतदारसंघातील ५ ग्रामपंचायत बांधकामास १ कोटी १५ लाख निधी मंजूर
परळी वैद्यनाथ (प्रतिनिधी) - परळीचे आमदार तथा माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून परळी वैद्यनाथ विधानसभा मतदारसंघातील आणखी ५ ग्रामपंचायतींचे रुपडे पालटणार असून, स्वतःची ग्रामपंचायत इमारत नसलेल्या ५ ग्रामपंचायतींच्या ग्रामपंचायत बांधकामास राज्य सरकारच्या वतीने एकूण १ कोटी १५ लाख रुपये निधी ग्रामविकास विभागाच्या वतीने मंजूर करण्यात आले आहेत.
धनंजय मुंडे यांच्या निर्देशानुसार मतदारसंघातील स्वतःची इमारत नसलेल्या ग्रामपंचायत इमारत बांधकामासाठी निधी मागणी प्रस्तावित करण्यात आली होती. त्यानुसार ग्रामविकास विभागाने परळी तालुक्यातील मरळवाडी (२० लाख), लाडझरी (२५ लाख), रेवली (२५ लाख), तसेच अंबाजोगाई तालुक्यातील धानोरा बुद्रुक (२५ लाख) व निरपणा (२० लाख) याप्रमाणे निधी मंजूर केला असून, याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.
दरम्यान याआधी काही दिवसांपूर्वी आणखी ४ ग्रामपंचायत इमारतीस देखील याच योजनेतून निधी मंजूर करण्यात आलेला आहे. धनंजय मुंडे यांनी राज्य सरकार सह ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे आभार व्यक्त केले आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा