इमेज
  परळीजवळील चांदापूर तलावात बुडालेल्या युवकाचा दोन दिवसांनंतरही शोध लागेना; शोधकार्य युद्धपातळीवर सुरू परळी वैजनाथ: प्रतिनिधी... परळी शहराजवळील चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेलेला सुमित कलशेट्टी (वय ३७, रा. सुर्वेश्वर नगर, परळी वैजनाथ) हा युवक पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तलावात बुडाला. या दुर्दैवी घटनेला तब्बल दोन दिवस उलटून गेले आहेत. मात्र, अद्यापही या युवकाचा कोणताही पत्ता लागलेला नाही. स्थानिक प्रशासन आणि नागरिकांच्या वतीने तलावात शोधकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.      सुमित कलशेट्टी हे मंगळवारी (दि. २३ जून) सकाळी चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेले होते. पोहत असताना अचानक पाण्याचा अंदाज चुकल्यामुळे ते तलावाच्या खोल भागात गेले आणि बेपत्ता झाले. ते बराच वेळ बाहेर न आल्याने उपस्थित नागरिकांच्या लक्षात ही बाब आली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासकीय पथकाने तातडीने तलावाकडे धाव घेतली. गेल्या दोन दिवसांपासून स्थानिक  आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने तलावाच्या कानाकोपऱ्यात शोध घेतला जात आहे. मात्र, अद्याप यश आलेले नाही. या अत्यंत दुर्दैवी आण...

आवर्जून या - सावरगांव ग्रामस्थांचे आवाहन

आपला दसरा, आपली परंपरा..भगवान भक्तीगडावर दसरा मेळाव्याची तयारी 



आवर्जून या - सावरगांव ग्रामस्थांचे आवाहन

पाटोदा । दिनांक ३०।

राष्ट्रसंत भगवान बाबा यांचे जन्मस्थान असलेल्या सावरगांव घाट येथील भगवान भक्तीगडावर  दसरा मेळाव्याची तयारीने पूर्ण झाली आहे. राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत दरवर्षी हा परंपरागत दसरा मेळावा अलोट जनसागराच्या साक्षीने मोठया उत्साहात पार पडत असतो. लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांचा आदर्श ठेवून राष्ट्रसंत भगवान बाबा यांचे दर्शन घेण्यासाठी व ना. पंकजाताईंचे मार्गदर्शन ऐकण्यासाठी सर्वांनी मोठया संख्येने मेळाव्यास उपस्थित रहावे असे आवाहन सावरगांव घाट ग्रामस्थांनी केले आहे.

      येत्या २ ऑक्टोबर रोजी दसरा आहे, त्या अनुषंगाने 'आपला दसरा, आपली परंपरा' जपण्यासाठी संपूर्ण सावरगांव नगरी झाली असून सर्व ग्रामस्थ एकजुटीने कामाला लागले आहेत. मेळाव्याच्या तयारीसाठी कार्यकर्त्यांच्या राज्यभरात ठिक ठिकाणी बैठका पार पडल्या आहेत. लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांनी दसरा मेळाव्याची परंपरा सुरू केली होती ती परंपरा पुढे ना. पंकजा मुंडे यांनी अखंडपणे सुरू ठेवली आहे. मागील दहा  वर्षांपासून संत भगवान बाबा यांचे जन्मस्थान असलेल्या सावरगांव  येथे हा दसरा मेळावा होत असून त्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने याठिकाणी संत भगवान बाबा यांचे भव्य दिव्य स्मारक उभारून परिसराला 'भगवान भक्तीगड' असे नांव दिलेले आहे.

तयारीला पूर्ण ; ना. पंकजा मुंडेंच्या स्वागताचा उत्साह

-----

भगवान भक्तीगडावरील १८ एकर परिसरात हा मेळावा होणार असून  डागडूजी, परिसराची स्वच्छता, हेलपॅड, वाहनतळ, स्टेज, बॅरेकेटिंग आणि इतर कामांनी वेग घेतला आहे. पंकजाताई मुंडे यांच्या स्वागताची देखील ग्रामस्थांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. मेळाव्यास राज्याच्या कानाकोपर्‍यातून तसेच बाहेरूनही लाखोंच्या संख्येने भाविक येतात, त्यांची गैरसोय होऊ नये याची खबरदारी घेण्यात येत आहे.

पंकजाताईंचे मार्गदर्शन

-----------

हा मेळावा म्हणजे भक्ती आणि शक्तीचा संगम मानला जातो. मेळाव्याच्या व्यासपीठावर अध्यात्मिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहतात. संत भगवान बाबा आणि लोकनेते मुंडे साहेबांना मानणारा मोठा वर्ग दरवर्षी पंकजाताई  मुंडे यांचे विचार ऐकण्यासाठी येत असतो. प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी देखील   पंकजाताई मुंडे यांचे २ तारखेला हेलिकॉप्टरने सावरगांवला आगमन होणार आहे.  संत भगवान बाबांचे दर्शन घेऊन सकाळी ११ वा. त्या मेळाव्यास संबोधित करतील. दरम्यान मेळाव्यात येणाऱ्या भक्तांसाठी सावरगांव ट्रस्टच्या वतीने नव्यानेच बांधण्यात आलेल्या लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब सभागृहात नाश्ता, जेवण व पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे.

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या