युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

वरिष्ठ व निवड श्रेणी मंजुरीसाठी विशेष शिबीर सर्व जिल्हाला आयोजित करण्याची शिक्षण उपसंचालकांना मराठवाडा शिक्षक संघाची मागणी




छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी:

विभागातील जालना बीड परभणी हिंगोली या सर्व जिल्ह्यांतील शिक्षक कर्मचाऱ्यांचे वरिष्ठ व निवड श्रेणी प्रस्ताव मंजुरीसाठी व प्रमाणित करण्यासाठी सर्व जिल्ह्यांतील लेखापरीक्षकांना आपल्या कार्यालयामार्फत तात्काळ आदेशित करावे याकरिता शिक्षण उपसंचालक श्री प्रकाश मुकुंद (शिक्षण उपसंचालक कार्यालय) यांना सर्वच जिल्ह्यांत विशेष शिबिराचे आयोजन करावे यासाठी आज दिनांक ०३ ऑक्टोबर २०२५ निवेदन देण्यात आले. मागील काही महिन्यापुर्वी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद ,महाराष्ट्र,पुणे यांनी वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण आयोजित केलेले होते. हजारोंच्या संख्येने प्रशिक्षणार्थी शिक्षक या प्रशिक्षणात सहभागी झाले होते. ज्यांना हे प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शिक्षकांसाठी हे पत्र दि. ०१ ऑक्टोबर २०२५ रोजी मराठवाडा शिक्षक संघ छत्रपती संभाजीनगर यांच्या पाठपुराव्यामुळे देण्यात आले मात्र विभागातील जिल्ह्यात अजूनही हे आदेश निघालेले नव्हते त्यांना त्वरीत आदेशीत यावे याचा फायदा सर्वच जिल्ह्यांतील शिक्षक कर्मचाऱ्यांना झाला पाहिजे याकरिता वेतनश्रेणी लागू करण्यात यावी यासाठी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष श्री सुर्यकांत विश्वासराव सर आणि जिल्हा सचिव भाई चंद्रकांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली संघटनेचे इतर पदाधिकारी महानगर सचिव नवनाथ मंत्री, अशोक ढमढेरे, विनोद केनेकर, विलास चव्हाण, बाळू पवार, कृष्णा गोंड, रावसाहेब बोरसे, अजित जाधव, अजय कदम हे सर्व मराठवाडा शिक्षक संघ छत्रपती संभाजीनगर चे पदाधिकारी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या