दिलासादायक......!

टीईटी' परीक्षेचा अर्ज भरण्यास मुदतवाढ; परीक्षा परिषदेकडून पात्रताधारकांना दिलासा





राज्य परीक्षा परिषदेने महा टीईटी अर्ज भरण्यास मुदतवाढ दिली आहे. आता ९ ऑक्टोबर रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत विद्यार्थी ऑनलाइन अर्ज व शुल्क भरू शकतील. मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील अतिवृष्टी व पूरस्थितीमुळे अर्ज भरण्यात तांत्रिक अडचणी येत होत्या. युवा शैक्षणिक व सामाजिक न्याय संघटनांसह अनेक विद्यार्थ्यांनी मुदतवाढीची मागणी केली होती. २३ नोव्हेंबर रोजी टीईटी परीक्षा घेण्यात येणार आहे.

शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) अर्ज भरण्यास राज्य परीक्षा परिषदेने मुदतवाढ दिली आहे. सुधारित वेळापत्रकानुसार ९ ऑक्टोबरपर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज भरता येणार आहे. राज्यात मराठवाड्यासह विविध जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी, महापूर यामुळे ऑनलाइन अर्ज भरण्यास तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यामुळे मुदतवाढ देण्याची मागणी पुढे आली होती. परिषदेच्या निर्णयाने विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

परीक्षा परिषदेतर्फे २३ नोव्हेंबर रोजी 'टीईटी' घेण्यात येणार आहे. त्यासाठी १५ सप्टेंबरपासून अर्ज भरण्याची प्रकिया सुरू आहे. अर्ज भरण्याची मुदत शुक्रवार ३ ऑक्टोबर रोजीपर्यंत होती. परंतु, काही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी व पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात आलेल्या पूरस्थितीमुळे अतोनात नुकसान झाले आहे. वाहतूक व्यवस्था आणि इतर तांत्रिक समस्या निर्माण झाल्या आहेत. 'महा-टीईटी' परीक्षा अर्ज भरण्यास अडचणी येत आहेत, अशा तक्रारी होत्या.

युवा शैक्षणिक व सामाजिक न्याय संघटना, स्पर्धा परीक्षा विद्यार्थी असोसिएशन अशा अनेक संघटना, विद्यार्थ्यांनी राज्यातील परिस्थितीमुळे मुदतवाढ देण्याची मागणी परीक्षा परिषदेकडे केली होती. अर्ज भरण्यास येणाऱ्या अडचणी लक्षात घेत परीक्षा परिषदेने शुक्रवारी मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला. ९ ऑक्टोबर पर्यंत विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज भरणे, परीक्षा शुल्क भरणे यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. परीक्षा परिषदेने म्हटले आहे, ऑनलाइन अर्ज भरण्यास ९ ऑक्टोबर रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत अर्ज व शुल्क भरता येईल.




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !