जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इंदपवाडी येथे बालसभा उत्साहात
राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इंदपवाडी येथे इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांनी शुक्रवारी बालसभा घेतली. या सभेच्या अध्यक्षस्थानी इयत्ता सहावीचा विद्यार्थी चि अभिजीत कैलास मुंडे याची निवड करण्यात आली होती. व्यासपीठावर शाळेचे मुख्याध्यापक श्री सुभाष केंद्रे यांच्यासह सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते.
सर्वप्रथम राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमांचे पूजन अध्यक्ष व सर्व शिक्षक वृंद यांच्या हस्ते करण्यात आले.
इयत्ता सातवीच्या विद्यार्थिनींनी स्वागत गीत सादर केले. सर्व शिक्षक वृंदांच्या स्वागतानंतर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या बद्दल इयत्ता सहावीची विद्यार्थिनी कु आनंदी विष्णू मुंडे हिने आपले विचार व्यक्त केले तर कु गायत्री भागवत मुंडे हिने लालबहादूर शास्त्री यांच्या विषयी आपले विचार व्यक्त केले. मुख्याध्यापक श्री सुभाष केंद्रे यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांचे कौतुक केले आणि यापुढे अशा बाल सभा दर महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी प्रत्येक वर्गाच्या नियोजनाखाली संपन्न होतील आणि वकृत्व कलेला वाव देण्यासाठी त्याच बरोबर विद्यार्थ्यांना आपले विचार व्यक्त करण्याची संधी दिली जाईल असे सांगितले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी सिद्धी आश्रुबा मुंडे आणि यशश्री भरत मुंडे यांनी केले. या बालसभेचे आभार प्रदर्शन चि युवराज मुंडे याने केले.
शाळेतील शिक्षक सर्वश्री चंद्रप्रकाश लोखंडे, चंद्रशेखर फुटके, विष्णू ढाकणे, जगदीश चौधरी, दीपक खंदारे, श्रीमती संध्या नागरगोजे यांची यावेळी व्यासपीठावर उपस्थिती होती. बाल सभेसाठी इयत्ता पहिली ते सातवीचे सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा