पोस्ट्स

अन्यथा करावी लागणार तुरुंगवारी...

इमेज
  बीड जिल्ह्यात निवडणूक निकालानंतर मिरवणुकांवर बंदी - पोलीस अधीक्षकांनी दिले सक्त निर्देश बीड : पोलीस अधीक्षक नवनीत कावत, बीड जिल्हा यांच्याकडून सर्व नगरपरिषद उमेदवारांना तसेच त्यांच्या समर्थकांना सक्त निर्देशित करण्यात आले आहे.बीड जिल्ह्यात निकालानंतर मिरवणुकांवर बंदी असुन कायद्याच्या विरोधात जाईल असे कोणतेही कृत्य करण्याचे टाळावे असे पोलीस अधीक्षकांनी  सक्त निर्देश दिले आहेत.        आज होणाऱ्या मतमोजणीच्या निकालानंतर कोणत्याही प्रकारची मिरवणूक, रॅली, विजयी जल्लोष, घोषणा, फटाके फोडणे किंवा जमाव जमविण्यास पोलीस प्रशासनातर्फे कोणतीही परवानगी देण्यात येणार नाही.तसेच  जिल्हाधिकारी, बीड यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 चे कलम 37(1)(3) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश निर्गमित केले असून, सदर आदेश दि. 19/12/2025 रोजी रात्री 00.01 वा. पासून ते दि. 02/01/2026 रोजी रात्री 24.00 वा. पर्यंत लागू राहतील. विनापरवाना मिरवणूक काढणे, जमाव करणे, रस्ते अडविणे किंवा सार्वजनिक शांतता भंग होईल असा कोणताही प्रकार पूर्णतः प्रतिबंधित आहे.         आदेशाचे उल...

रामरक्षा गोशाळेने गो सेवेत आदर्श निर्माण निर्माण केला: प्रशासनाकडून कौतुक !

इमेज
  रामरक्षा गोशाळेला पशुसंवर्धन व दुग्धविकास सचिव डॉ. एन. रामास्वामी यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट रामरक्षा गोशाळेचे गो संगोपनाचे काम अतिशय चांगले आणि कौतुकास्पद- पशुसंवर्धन व दुग्धविकास सचिव डाॅ. एन .रामास्वामी रामरक्षा गोशाळेने गो सेवेत आदर्श निर्माण निर्माण केला: प्रशासनाकडून कौतुक ! परळी वैजनाथ, प्रतिनिधी..             पशुसंवर्धनाच्या क्षेत्रात गोशाळा महत्त्वाची भूमिका पार पाडत असतात. या अनुषंगाने परळी वैजनाथ येथील रामरक्षा गोशाळेने गो संगोपनाचे अतिशय नीटनेटके आणि सर्व दृष्टीने चांगले संगोपन केले आहे. ही गोशाळा एक आदर्श गोशाळा असून हे काम कौतुकास्पद असल्याचे महाराष्ट्र राज्याच्या पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्रालयाचे सचिव डाॅ. एन. रामास्वामी यांनी गौरवोद्गार काढले.डाॅ. एन रामास्वामी यांच्यासह पशुसंवर्धन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रामरक्षा गोशाळेला भेट देऊन पाहणी केली. या ठिकाणची व्यवस्था आणि गोसेवेचे आदर्श काम पाहून प्रशासनाकडून या गोशाळेचे कौतुक करण्यात आले.       परळी व परिसरामध्ये आपल्या गो सेवेतून एक आदर्श निर्माण ...

प्रशासनाकडे निवेदनाद्वारे मागणी....

इमेज
  नगर परिषद निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर ईदगाहच्या संरक्षणाची मागणी परळी / प्रतिनिधी  दि. 21 डिसेंबर 2025 रोजी परळी नगर परिषदेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार असून, त्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आवश्यक खबरदारी घेण्याची मागणी एका निवेदनाद्वारे  करण्यात आली आहे. निवडणूक निकालानंतर विजयी उमेदवारांचे समर्थक गुलाल उधळत जल्लोष करत असतात. हा जल्लोष परळी शहर पोलीस ठाण्यासमोरील नेहरू चौक तळ परिसरातील ईदगाह परिसरातून जात असताना गुलाल अथवा इतर साहित्य ईदगाहवर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे धार्मिक भावना दुखावल्या जाऊन शहरातील शांतता व सुव्यवस्थेला बाधा पोहोचू शकते, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.      यासंदर्भात तहसीलदार नगर परिषदेचे मुख्याधिकारी व पोलीस ठाणे यांना निवेदन देण्यात आले असून, निवडणूक निकालाच्या दिवशी ईदगाहला तात्पुरत्या पडद्याने झाकण्यात यावे तसेच परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करून संभाव्य अनुचित प्रकार टाळावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. शहरात सलोखा, शांतता व सुव्यवस्था कायम राहावी, तसेच कोणताही अनुच...

गोदावरी खोऱ्यात मोठ्या प्रमाणावर धर्मांतरण....महाराजांनी केलं महत्त्वपूर्ण भाष्य...

इमेज
नाशिकच्या कुंभाआधीच परळीत दोन दिवस कुंभमेळ्या सारखे धार्मिक वातावरण : मुलुक पीठाधिश्वरांसोबत 700 साधूंचा मेळा वैद्यनाथ चरणी नतमस्तक ! हिंदुस्थानात ना कोणी इसाई ना कोणी मुस्लिम, इथले सगळे मूळ हिंदूच - मुलुकपीठाधीश्वर राजेंद्रदास देवाचार्य महाराज यांचं खळबळजनक व्यक्तव्य परळी वैजनाथ,  प्रतिनिधी...          वृंदावनच्या मुलुकपिठाचे पीठाधीश्वर प्रसिद्ध गोसेवक संत स्वामी राजेंद्रदास देवाचार्य महाराज हे सातशे साधुंसह गोदावरी परिक्रमा यात्रा करत आहेत. ही यात्रा पंचम ज्योतिर्लिंग परळी वैजनाथ येथे दाखल झाली. एक दिवसाचा मुक्काम आणि प्रभू वैद्यनाथला रुद्राभिषेक असा दोन दिवसाचा धार्मिक सोहळा साजरा झाला. साधुसंत, भगवी वस्त्र परिधान केलेले, पिवळे वस्त्र परिधान केलेले, जटा वाढलेले वेगवेगळ्या मुद्रा धारण केलेले असे वेगवेगळ्या सांप्रदायाचे साधू यांनी वैद्यनाथ मंदिर परिसर गजबजुन गेला होता. नाशिक येथे पुढच्या वर्षी कुंभमेळा होणार आहे. मात्र या कुंभाआधीच परळीच्या वैद्यनाथ मंदिरात दोन दिवसाचा कुंभमेळाच भरल्यासारखे चित्र बघायला मिळाले. या गोदावरी परिक्रमा यात्रेचे परळीकर भाविकां...

दिल्लीतील 'शहा' भेटीतून... परळीला 'प्रसाद' मिळणार !

इमेज
  धनंजय मुंडे दिल्लीत: अमित शहांची भेट :भेटीचे कारण आले समोर  नवी दिल्ली....     महाराष्ट्राचे माजी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची दिल्ली येथे जाऊन भेट घेतली. या भेटीची माहिती समोर येताच राज्यातील राजकारण ढवळून निघाले. दिल्ली वारी आणि अमित शहा यांची घेतलेली भेट यावरून अनेक राजकीय तर्क वितर्क अशा चर्चा सुरू झाल्या. मात्र केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी का घेतली? याबाबतचे कारण आता समोर आले आहे. धनंजय मुंडे यांनी अमित शहा यांची भेट घेऊन पंचम ज्योतिर्लिंग वैजनाथ तीर्थक्षेत्राचा केंद्र सरकारच्या प्रसाद योजनेत समावेश करावा अशी प्रमुख मागणी एका निवेदनाद्वारे केली आहे. त्याचबरोबर परळी व मतदार संघातील विविध प्रश्न आणि एकात्मिक विकासाबाबतच्या अनेक गोष्टींवर त्यांनी अमित शहा यांच्याशी चर्चा केली आहे.         केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना धनंजय मुंडे यांनी भेटून दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाने २०१४-१५ मध्ये तीर्थयात्रा पुनरुज्जीव...

पोलीस पाटील भरती प्रक्रिया......

इमेज
परळी वैजनाथ उपविभागातील 99 गावांच्या प्रस्तावित रिक्त पोलीस पाटील पदासाठी 19 डिसेंबर रोजी आरक्षण सोडत परळी वैजनाथ, प्रतिनिधी...       परळी वैजनाथ  उपविभागा अंतर्गत येणाऱ्या गावांमधील पोलीस पाटील पदाची रिक्त पदे भरण्याच्या अनुषंगाने गावनिहाय आरक्षण निश्चितीबाबत जिल्हाधिकारी बीड यांनी दिनांक 14 रोजी परिपत्रक काढले आह.  या अनुषंगाने रिक्त पदे भरण्यासाठी पोलीस पाटील रक्त पदांचे प्रवर्गनिहाय समांतर आरक्षण घोषित करण्यात येणार आह. परळी उपविभागातील 99 गावांच्या प्रस्तावित रिक्त पोलीस पाटील पदासाठी दिनांक 19 डिसेंबर रोजी दुपारी एक वाजता प्रशासकीय इमारत परळी वैजनाथ येथे सोडत होणार आहे.       बीड जिल्हाधिकारी यांनी दिनांक 14 डिसेंबर रोजी परिपत्रक काढले असून पोलीस पाटील भरती प्रक्रियेच्या अनुषंगाने गावनिहाय आरक्षण निश्चित करण्यासाठी वेळापत्रक ठरवून दिलेले आहे. या भरती प्रक्रियेचे टप्पेही जाहीर करण्यात आले आहेत. दिनांक 15 डिसेंबर ते २० डिसेंबर 2025 या कालावधीत जाहीर नोटीस प्रसिद्ध करणे व गावनिहाय आरक्षण निश्चित करणे, दिनांक 22 डिसेंबर ते 26 डिसेंबर 2025 या काल...

दुःखद वार्ता....भावपूर्ण श्रद्धांजली

इमेज
  सेवानिवृत्त तहसीलदार शशिकांत देशपांडे यांचे निधन बीड -येथील सेवानिवृत्त तहसीलदार शशिकांत देशपांडे यांचे वृद्धापकाळाने राहत्या घरी निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय 87 वर्ष होते. बीड येथे तहसीलदार म्हणून सेवानिवृत्त झालेले शशिकांत देशपांडे हे मनमिळाऊ स्वभावाचे, कडक शिस्तीचे म्हणून परिचित होते. आपल्या नोकरीच्या काळात प्रामाणिकपणा आणि सचोटी मुळे ते लोकप्रिय होते.गेल्या तीन साडेतीन वर्षांपासून ते आजारी होते. मंगळवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. बीड येथील प्रसिद्ध डॉक्टर सुहास देशपांडे यांचे तर वडील होते.

किसान सभेचा आंदोलनाचा प्रवित्रा...

इमेज
कापूस, सोयाबीन जाचक अटी दूर करत तात्काळ खरेदी करा-किसान सभा परळी / प्रतिनिधी.... अतिवृष्टीमुळे व सततच्या पावसामुळे जिल्ह्यातील प्रमुख पीक असलेल्या कापूस आणि सोयाबीन शेत मालाची खरेदी हमीभावाने खरेदी करताना जाचक अटी टाकून केंद्र आणि राज्य सरकारने बाजार पेठेतील शेत मालाच्या समतोल राखण्यापेक्षा, शासकीय हमीभावाने खरेदी करण्यास सरकार असमर्थ असल्याने हमीभावाने खरेदी टाळण्यासाठी जाचक अटी घालत आहे. उत्पादन खर्चापेक्षा कमी भावात खुल्या बाजारात व्यापा-याकडे विक्री करण्याचे हे षडयंत्र सरकार करत असून शासकीय खरेदी करताना येणाऱ्या अडचणी दूर करून कापूस, सोयाबीन शेतमाल हमीभावाने खरेदी करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अथवा याकरिता किसान सभेकडून आंदोलनाचा प्रवित्रा घेण्यात येईल असा इशारा किसान सभेच्या पदाधिकारी यांनी मंगळवार दि 16 रोजी जिल्हाधिकारी यांना निवेदन करत मागणी केली.           यंदाच्या खरिपात झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाहाचे प्रमुख पीक असलेल्या सोयाबीन आणि कापूस उत्पादनात कमालीची घट झाली आहे. वारंवार मागणी करून शासनाने सीसीआय, पणन महासंघ यांनी...

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!