अन्यथा करावी लागणार तुरुंगवारी...

इमेज
  बीड जिल्ह्यात निवडणूक निकालानंतर मिरवणुकांवर बंदी - पोलीस अधीक्षकांनी दिले सक्त निर्देश बीड : पोलीस अधीक्षक नवनीत कावत, बीड जिल्हा यांच्याकडून सर्व नगरपरिषद उमेदवारांना तसेच त्यांच्या समर्थकांना सक्त निर्देशित करण्यात आले आहे.बीड जिल्ह्यात निकालानंतर मिरवणुकांवर बंदी असुन कायद्याच्या विरोधात जाईल असे कोणतेही कृत्य करण्याचे टाळावे असे पोलीस अधीक्षकांनी  सक्त निर्देश दिले आहेत.        आज होणाऱ्या मतमोजणीच्या निकालानंतर कोणत्याही प्रकारची मिरवणूक, रॅली, विजयी जल्लोष, घोषणा, फटाके फोडणे किंवा जमाव जमविण्यास पोलीस प्रशासनातर्फे कोणतीही परवानगी देण्यात येणार नाही.तसेच  जिल्हाधिकारी, बीड यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 चे कलम 37(1)(3) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश निर्गमित केले असून, सदर आदेश दि. 19/12/2025 रोजी रात्री 00.01 वा. पासून ते दि. 02/01/2026 रोजी रात्री 24.00 वा. पर्यंत लागू राहतील. विनापरवाना मिरवणूक काढणे, जमाव करणे, रस्ते अडविणे किंवा सार्वजनिक शांतता भंग होईल असा कोणताही प्रकार पूर्णतः प्रतिबंधित आहे.         आदेशाचे उल...

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

उद्या(26मे)पासून परळीतील उड्डाणपुलाच्या दुरुस्तीची कामे सुरु होणार पण...

परळी वैजनाथ, प्रतिनिधी...

    येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी रेल्वे उड्डाणपुलाच्या दुरुस्ती चे काम उद्या दिनांक 26 मे पासून सुरू करण्यात येणार आहे. याबाबत राष्ट्रीय महामार्ग उपविभाग लातूर यांनी दोन दिवसापूर्वीच पत्र जारी करून माहिती दिलेली आहे. त्या अनुषंगाने हे काम दिनांक 26 मे पासून पुढे एक महिना म्हणजेच 30 जून पर्यंत सुरू राहणार आहे. परंतु उड्डाण पुलावरील वाहतूक बंद करण्याबाबतच्या निर्णयात अंशतः बदल करण्यात आला आहे. त्यानुसार आता पुढील सहा दिवस म्हणजेच 31 मे पर्यंत उड्डाण पुलावरील वाहतूक सुरू राहणार आहे. एक जून नंतर मात्र संपूर्णतः उड्डाणपुलावरील वाहतूक बंद असणार आहे.

    डाॅ. श्यामाप्रसाद मुखर्जी रेल्वे उड्डाणपूल वाहतुकीसाठी तब्बल एक महिन्यापेक्षा अधिक दिवसांसाठी बंद करण्यात येणार असल्याची सूचना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने नुकतीच जारी केली होती.त्यानुसार काम सुरु होणार असले तरी 31 तारखेपर्यंत उड्डाणपुलावरुन वाहतूकही सुरु ठेवण्यात येणार आहे.परळी वैजनाथ शहरातील डाॅ. श्यामाप्रसाद मुखर्जी उड्डाणपूलाची दुरुस्ती करण्याकरिता पुलावरील वाहतूक एक महिना चार दिवस बंद ठेवण्यात येणार आहे. याबाबत उपविभागीय अभियंता, रा. म. उपविभाग लातूर यांनी जा.क्र.रा.म.उ. बि.ला/तां. शा/२०२/२०२५ दि.२९/ ०४/२०२५पत्र निर्गमित केले आहे. संदर्भीय विषयाच्या अनुषंगाने परळी वैजनाथ शहरातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८ ब वरील डाॅ.श्यामाप्रसाद मुखर्जी उड्डाणपूलाची तांत्रिक दुरावस्था लक्षात घेता त्या पुलाचे दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येत आहे. दुरुस्तीच्या कामास अडथळा येऊ नये व वाहतुकीतील अपघाताचा धोका टाळण्यासाठी पुलावरील सर्व प्रकारची वाहतूक दि.२६/०५/ २०२५ पासून दि. ३०/०६/२०२५ पर्यंत कालावधीत बंद ठेवावी लागणार आहे.असे पत्र निर्गमित करण्यात आले होते. त्या अनुषंगाने उद्या दि.२६ मे पासून उड्डाणपूल दुरुस्तीच्या कामांना सुरुवात होणार आहे मात्र ३१ मे पर्यंत उड्डाणपुलावरुन वाहतूक सुरु ठेवण्यात येणार आहे. रात्री उशीरा वाहतूक कमी असण्याच्या काळात ही कामे करण्यात येणार आहेत.३१ मे पर्यंत दिवसा ही कामे  न करता रात्रीच्यावेळी करण्यात येतील.१ जुनपासून मात्र उड्डाणपुलावरुन होणारी वाहतूक संपूर्णत: बंद केली जाणार आहे. त्यामुळे आता परळीच्या उड्डाणपुलावरुन  दि.१.२६/२०२५ पासून दि. ३०/०६/२०२५ पर्यंत वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे अशी माहिती राष्ट्रीय महामार्ग उपविभाग लातूर यांच्या सुत्रांनी दिली आहे.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!