परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!
परळी वैजनाथ उपविभागातील 99 गावांच्या प्रस्तावित रिक्त पोलीस पाटील पदासाठी 19 डिसेंबर रोजी आरक्षण सोडत
परळी वैजनाथ, प्रतिनिधी...
परळी वैजनाथ उपविभागा अंतर्गत येणाऱ्या गावांमधील पोलीस पाटील पदाची रिक्त पदे भरण्याच्या अनुषंगाने गावनिहाय आरक्षण निश्चितीबाबत जिल्हाधिकारी बीड यांनी दिनांक 14 रोजी परिपत्रक काढले आह. या अनुषंगाने रिक्त पदे भरण्यासाठी पोलीस पाटील रक्त पदांचे प्रवर्गनिहाय समांतर आरक्षण घोषित करण्यात येणार आह. परळी उपविभागातील 99 गावांच्या प्रस्तावित रिक्त पोलीस पाटील पदासाठी दिनांक 19 डिसेंबर रोजी दुपारी एक वाजता प्रशासकीय इमारत परळी वैजनाथ येथे सोडत होणार आहे.
बीड जिल्हाधिकारी यांनी दिनांक 14 डिसेंबर रोजी परिपत्रक काढले असून पोलीस पाटील भरती प्रक्रियेच्या अनुषंगाने गावनिहाय आरक्षण निश्चित करण्यासाठी वेळापत्रक ठरवून दिलेले आहे. या भरती प्रक्रियेचे टप्पेही जाहीर करण्यात आले आहेत. दिनांक 15 डिसेंबर ते २० डिसेंबर 2025 या कालावधीत जाहीर नोटीस प्रसिद्ध करणे व गावनिहाय आरक्षण निश्चित करणे, दिनांक 22 डिसेंबर ते 26 डिसेंबर 2025 या कालावधीत आरक्षणावर आक्षेप मागविणे, ३० डिसेंबर 2025 रोजी प्राप्त आक्षेपावर निर्णय घेऊन गावनिहाय अंतिम आरक्षण जाहीर करणे या वेळापत्रकानुसार आरक्षणाची सोडत दिनांक 19 12 2019 रोजी दुपारी एक वाजता मध्यवर्ती प्रशासकीय इमारत परळी वैजनाथ येथे काढण्यात येणार आहे. इच्छुक नागरिकांनी आरक्षण सोडत काढण्याकरिता उपस्थित रहावे असे आवाहन उपविभागीय अधिकारी परळी वैजनाथ यांनी केले आहे.
परळी उपविभागातील रिक्त पोलीस पाटील पदाकरिता प्रस्तावित गावे:
१वाघाळा२ माळहिवरा३ परचुंडी ४वडखेल५ मांडेखेल ६गोपाळपूर ७तडोळी ८नाथरा ९टाकळी देशमुख १०तळेगाव ११डाबी १२डाबी तांडा १३टोकवाडी १४ब्रह्मवाडी १५संगम १६वागबेट १७लोणारवाडी १८बेलंबा १९दाऊदपूर २०कौठळी २१कौठळी तांडा २२जिरेवाडी २४इदपवाडी २५नागापूर २६बहादुरवाडी २७लिंबोटा २८कन्हेरवाडी २९भोपला ३०सेलू प.३१लोणी ३२दगडवाडी ३३मलकापूर ३४वसंत नगर ३५वैजवाडी ३६धारावती तांडा ३७मरळवाडी ३८मांडवा ३९मिरवट ४०कासरवाडी ४१नंदनज ४२सारडगाव ४३खोडवा सावरगाव ४४हेळंब ४५हाळब ४६दैठणा घाट ४७ धर्मापुरी ४८भोजनकवाडी ४९लाडझरी ५०आनंदवाडी ५१नागदरा ५२दौंडवाडी ५३मैदवाडी ५४लेंडेवाडी ५५इंदिरानगर ५६चांदापूर ५७नंदागौळ ५८करेवाडी ५९मोहा ६०वंजारवाडी ६१बोधेगाव ६२कावळ्याची वाडी ६३वाका ६४मलकापूर ६५भिलेगाव ६६खामगाव ६७कानडी ६८जयगाव ६९औरंगपूर ७०तपोवन ७१पाडोळी ७२पिंपळगाव गाढे ७३सफदराबाद ७४कवडगाव साबळा ७५कवडगाव घोडा ७६आचार्य टाकळी ७७कवडगाव हुडा ७८श्रीकृष्ण नगर ७९श्रीराम नगर ८०बोरखेड ८१तेलसमुख ८२ममदापूर ८३जळगाव ८४पिंपरी ८५हिवरा गो ८६कासारवाडी रामवडी ८७पोहनेर ८८दिग्रस ८९गोवर्धन हिवरा ९०खारी तांडा ९१हसनाबाद ९२नागपिंपरी, ९३दौनापूर ९४सोनहिवरा ९५गडदेवाडी ९६सर्फराजपुर ९७वानटाकळी तांडा ९८वानटाकळी ९९अस्वलंबा.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा