परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!
नगर परिषद निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर ईदगाहच्या संरक्षणाची मागणी
परळी / प्रतिनिधी
दि. 21 डिसेंबर 2025 रोजी परळी नगर परिषदेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार असून, त्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आवश्यक खबरदारी घेण्याची मागणी एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
निवडणूक निकालानंतर विजयी उमेदवारांचे समर्थक गुलाल उधळत जल्लोष करत असतात. हा जल्लोष परळी शहर पोलीस ठाण्यासमोरील नेहरू चौक तळ परिसरातील ईदगाह परिसरातून जात असताना गुलाल अथवा इतर साहित्य ईदगाहवर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे धार्मिक भावना दुखावल्या जाऊन शहरातील शांतता व सुव्यवस्थेला बाधा पोहोचू शकते, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.
यासंदर्भात तहसीलदार नगर परिषदेचे मुख्याधिकारी व पोलीस ठाणे यांना निवेदन देण्यात आले असून, निवडणूक निकालाच्या दिवशी ईदगाहला तात्पुरत्या पडद्याने झाकण्यात यावे तसेच परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करून संभाव्य अनुचित प्रकार टाळावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.
शहरात सलोखा, शांतता व सुव्यवस्था कायम राहावी, तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाने वेळीच आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा