परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!
कापूस, सोयाबीन जाचक अटी दूर करत तात्काळ खरेदी करा-किसान सभा
परळी / प्रतिनिधी....
अतिवृष्टीमुळे व सततच्या पावसामुळे जिल्ह्यातील प्रमुख पीक असलेल्या कापूस आणि सोयाबीन शेत मालाची खरेदी हमीभावाने खरेदी करताना जाचक अटी टाकून केंद्र आणि राज्य सरकारने बाजार पेठेतील शेत मालाच्या समतोल राखण्यापेक्षा, शासकीय हमीभावाने खरेदी करण्यास सरकार असमर्थ असल्याने हमीभावाने खरेदी टाळण्यासाठी जाचक अटी घालत आहे. उत्पादन खर्चापेक्षा कमी भावात खुल्या बाजारात व्यापा-याकडे विक्री करण्याचे हे षडयंत्र सरकार करत असून शासकीय खरेदी करताना येणाऱ्या अडचणी दूर करून कापूस, सोयाबीन शेतमाल हमीभावाने खरेदी करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अथवा याकरिता किसान सभेकडून आंदोलनाचा प्रवित्रा घेण्यात येईल असा इशारा किसान सभेच्या पदाधिकारी यांनी मंगळवार दि 16 रोजी जिल्हाधिकारी यांना निवेदन करत मागणी केली.
यंदाच्या खरिपात झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाहाचे प्रमुख पीक असलेल्या सोयाबीन आणि कापूस उत्पादनात कमालीची घट झाली आहे. वारंवार मागणी करून शासनाने सीसीआय, पणन महासंघ यांनी उशिरा खरेदी केंद्र सुरू केली मात्र मुदतीत नोंदणी न करणे, सातबारावर कापूस पिकाचा पीक पेरा नसणे, हेक्टरी 21 क्विंटलची मर्यादा, कापसातील जास्त आर्द्रता तर सोयाबीन खरेदी करण्यासाठी बारदाने नसणे, शेतकऱ्यांना बायोमेट्रिक बंधनकारक असणे, प्रत्यक्ष शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रावर उपस्थित असणे आदी जाचक अटी शासकीय खरेदी केंद्रावर सुरू आहेत. सर्व जाचक अटी दूर करून खरेदी केंद्र मोठ्या संख्येने सुरू करून शेतकऱ्यांच्या कापूस, सोयाबीन तात्काळ खरेदी करावी या मागणीसाठी बीड किसान सभेने मंगळवार दि 16 रोजी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले असून याबाबत योग्य ती कार्यवाही न झाल्यास किसान सभेकडून आंदोलन करण्यात येईल असा इशारा एड.अजय बुरांडे, कॉ.मुरलीधर नागरगोजे, कॉ.दत्ता डाके यांच्यासह शिष्टमंडळाने यावेळी दिला आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा