परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

रामरक्षा गोशाळेने गो सेवेत आदर्श निर्माण निर्माण केला: प्रशासनाकडून कौतुक !

 रामरक्षा गोशाळेला पशुसंवर्धन व दुग्धविकास सचिव डॉ. एन. रामास्वामी यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट

रामरक्षा गोशाळेचे गो संगोपनाचे काम अतिशय चांगले आणि कौतुकास्पद- पशुसंवर्धन व दुग्धविकास सचिव डाॅ. एन .रामास्वामी



रामरक्षा गोशाळेने गो सेवेत आदर्श निर्माण निर्माण केला: प्रशासनाकडून कौतुक !


परळी वैजनाथ, प्रतिनिधी..     

       पशुसंवर्धनाच्या क्षेत्रात गोशाळा महत्त्वाची भूमिका पार पाडत असतात. या अनुषंगाने परळी वैजनाथ येथील रामरक्षा गोशाळेने गो संगोपनाचे अतिशय नीटनेटके आणि सर्व दृष्टीने चांगले संगोपन केले आहे. ही गोशाळा एक आदर्श गोशाळा असून हे काम कौतुकास्पद असल्याचे महाराष्ट्र राज्याच्या पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्रालयाचे सचिव डाॅ. एन. रामास्वामी यांनी गौरवोद्गार काढले.डाॅ. एन रामास्वामी यांच्यासह पशुसंवर्धन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रामरक्षा गोशाळेला भेट देऊन पाहणी केली. या ठिकाणची व्यवस्था आणि गोसेवेचे आदर्श काम पाहून प्रशासनाकडून या गोशाळेचे कौतुक करण्यात आले. 

     परळी व परिसरामध्ये आपल्या गो सेवेतून एक आदर्श निर्माण करणारी गोशाळा म्हणून रामरक्षा गोशाळेची ओळख आहे. या ठिकाणी धर्मप्रेमी, गोप्रेमी नेहमीच भेट देत असतात. त्याचबरोबर गो सेवेचे संबंधित सर्व कार्ये या ठिकाणाहून चालतात. आज रामरक्षा गोशाळेला महाराष्ट्र राज्याच्या पशुसंवर्धन व दुग्धविकास  मंत्रालयाचे सचिव डाॅ.एन. रामास्वामी यांच्यासह नागपूर पशुसंवर्धन कुलगुरू डॉ. नितीन पाटील, पशुसंवर्धन व दुग्धविकास पुणे आयुक्त डॉ. प्रवीण कुमार देवरे, पशुसंवर्धन व दुग्धविकास पुणे अतिरिक्त आयुक्त डाॅ. शितलकुमार मुकणे, पशुसंवर्धन विभागाचे लातूर सह आयुक्त डॉ. नानासाहेब सोनवणे, छत्रपती संभाजीनगर पशुसंवर्धन सह आयुक्त डॉ. नानासाहेब कदम, बीड जिल्हा पशुसंवर्धन व दुग्ध विकासअधिकारी डॉ. आर. डी. कदम, पशुसंवर्धन सहाय्यक आयुक्त औसा डॉ. विजय देशमुख, साकुड तालुका अंबाजोगाई प्रक्षेत्र व्यवस्थापक डॉ. नामदेव आघाव, जिल्हा प्रकल्प अधिकारी बीड डॉ. रमण देशपांडे, परळीचे पशुसंवर्धन सहाय्यक आयुक्त डॉ. एच. बी. पांडे, अंबाजोगाई पशुसंवर्धन सहाय्यक आयुक्त डॉ. अनिल केंद्रे, परळी पशुधन विकास अधिकारी डॉ. प्रकाश आघाव, पशुधन विकास अधिकारी डॉ. श्रीनिवास पाथरकर, पशुधन विकास अधिकारी डॉ. विठ्ठल मुंडे यांच्यासह पशुसंवर्धन विभागातील सर्व अधिकारी, कर्मचारी यावेळी उपस्थित होते पशुसंवर्धन विभागाचे सेवादाता ज्योतीराम मुंडे, निवृत्ती मुंडे यांचीही उपस्थिती होती.

     यावेळी सचिव डाॅ. एन. रामास्वामी यांच्या सह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रामरक्षा गोशाळेची संपूर्ण पाहणी केली. या ठिकाणच्या पशुधनाची पाहणी केली. या ठिकाणच्या व्यवस्था आणि संगोपनाचे काम चांगले असल्याचे यावेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. रामरक्षा गोशाळेच्या वतीने सचिव डाॅ. एन. रामास्वामी यांच्यासह उपस्थित सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांचा यथोचित गौरव करण्यात आला. रामरक्षा गोशाळेच्या वतीने गोपालदास कोठारी, शिवप्रसाद शर्मा, रतन कोठारी, विश्वजीत तोतला, नागेश स्वामी, रामलिंग चलोदे, नवनाथ दराडे, संजय शर्मा, गिरी महाराज आदींनी उपस्थित सर्व अधिकारी वर्गाचे स्वागत केले. रतन कोठारी यांनी संपूर्ण गोशाळेच्या कामकाजाची माहिती उपस्थित अधिकाऱ्यांना दिली. या ठिकाणी 330 गाईंचे अतिशय काळजीपूर्वक संगोपन केले जाते, गोसेवा हेच ध्येय असून त्या दृष्टिकोनातून तन-मन- धनाने रामरक्षा गोशाळा कार्यरत असल्याची माहिती त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिली. रामरक्षा गोशाळेची वाटचाल ही आदर्श गोशाळेकडे असून हे कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार उपस्थित सर्वच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यावेळी काढले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!