युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

 परळी जवळ पावनणेचार लाखांचा गुटखा पकडला


परळी (प्रतिनिधी)

 धर्मापुरी येथुन परळीकडे आणण्यात येत असलेला ४ लाख ७८ हजार ५०० रुपयांचा गुटखा परळी ग्रामीण पोलिसांनी शुक्रवार दि.१० जानेवारी रोजी रात्री पकडला.याप्रकरणी परळी ग्रामीण पोलिस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 महाराष्ट्रात बंदी घातलेल्या गुटख्याची परळी शहरात सर्रासपणे विक्री होत असते.परळी हे गुटखा विक्रीचे केंद्र बनले होते.जिल्हा पोलिस अधिक्षक नवनीत कॉवत यांनी पदभार घेताच बीड जिल्ह्यात गुटखाबंदी केल्यानंतरही परळी शहरात गुटख्याची आवक सुरुच आहे.धर्मापुरी येथुन परळीकडे गुटखा येत असल्याची माहिती मिळताच पोलिस उपअधीक्षक चोरमले यांच्या पथकाने परळी-धर्मापुरी मार्गावरील सिमेंट फॅक्ट्रीजवळ नवनाथ हरगावकर,आर.पी.केकान,जी.ए.येलमटे,जी.व्ही.भताने,आर.टी.मुंडे, यांच्या पथकाने वाहनांची तपासणी केली असता शुक्रवार दि.१० जानेवारी रोजी रात्री ८.५० वाजता हुंडाई कार क्र.एम.एच.३८ झेड २१२१ या कारमधून धर्मापुरीहुन परळीकडे आणण्यात येत असलेला २ लाख १० हजार ६०० रुपयांचा विमल पानमसाला,५२ हजार ५०० रुपयांचा नवरत्न पान मसाला,५३ हजार ८२० व्ही १ टोबॅको,६ हजार ६०० रुपयांचा व्ही १ टोबॅको,५५ हजार रुपयांचा पान मसाला असा एकुण ३ लाख ७८ हजार ५०० रुपयांचा गुटखा जप्त केला.याप्रकरणी रहेमतअली कटुमियॉं सय्यद,मतीन समदानी शेख दोघेही रा.मलिकपुरा, परळी,अजिजलाला कुरेशी,हकीम कुरेशी या.आझादनगर,अनंत मुंजाजी फले कृष्णानगर या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या